Agripedia

जमिनीमध्ये जीवाणू, बुरशीसारखे असंख्य उपयुक्त सूक्ष्मजीव आढळून येतात. हे जीवाणू जमिनीमध्ये अन्नद्रव्य व इतर उपयुक्त घटक पिकाला उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात. जीवाणूंचे प्रमाण अधिक असलेल्या मातीला जिवंत माती असे म्हटले जाते. मातीची सुपीकता व उत्पादकता वाढविण्यासाठी या उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढणे गरजेचे आहे.

Updated on 23 March, 2023 12:56 PM IST

जमिनीमध्ये जीवाणू, बुरशीसारखे असंख्य उपयुक्त सूक्ष्मजीव आढळून येतात. हे जीवाणू जमिनीमध्ये अन्नद्रव्य व इतर उपयुक्त घटक पिकाला उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात. जीवाणूंचे प्रमाण अधिक असलेल्या मातीला जिवंत माती असे म्हटले जाते. मातीची सुपीकता व उत्पादकता वाढविण्यासाठी या उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढणे गरजेचे आहे.

प्रयोगशाळेत उपयुक्त कार्यक्षम जीवाणूंची स्वतंत्ररीत्या वाढ करून योग्य वाहकता मिसळून तयार होणाऱ्या मिश्रणाला "जीवाणू खत', "जीवाणू संवर्धन', "बॅक्‍टेरीयल कल्चर' किंवा बॅक्‍टेरियल इनॉक्‍युलंट म्हणतात.
नत्र, स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्म मूलद्रव्ये पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी सक्रिय आणि सूक्ष्म अशा उपयुक्त जीवाणूंचा वापर करता येतो, त्यांना जैविक खते असे म्हणतात. शेतात असणाऱ्या सेंद्रिय पदार्थांचा जलदरीत्या विघटनासाठी ते उपयुक्त ठरतात.

जैविक खतांमुळे रासायनिक खताचा कार्यक्षम वापर होऊन, त्यात बचत होऊ शकते.
जैविक खते पर्यावरणपूरक आहेत.
जैविक खतांमुळे बियाण्याची उगवणशक्ती वाढते.
जैविक खते सूक्ष्म अन्नद्रव्याबरोबरच जिब्रेलिक ऍसिड, सायटोकायनिन इन्डॉल ऍसिटीक ऍसिड, यासारखी संप्रेरके व विटामीन "बी' झाडांना मिळवून देतात.

गारपिटीत शेतकऱ्याने वाचवली द्राक्ष बाग, उत्पादकाने चालवले डोकं, आणि....

जैविक खतांद्वारे जमिनीत प्रतिजैविके सोडली गेल्याने काही प्रमाणात बुरशीजन्य रोगांचेदेखील नियंत्रण होते.
जैविक खते वापरल्याने जमिनीचा पोत सुधरतो.
उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते, तसेच उत्पादन खर्च कमी होतो.
जैविक खतांचे प्रकार :
नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू - रायझोबियम, ऍसिटोबॅक्‍टर, ऍझोटोबॅक्‍टर, अझोस्पिरीलम, निळे-हिरवे शेवाळ, ऍझोला
स्फुरद विरघळविणारे जीवाणू
पालाश विरघळविणारे जीवाणू
सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारे जीवाणू
सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध करणारे जीवाणू

अवकाळीमुळे पिकांची मोठी नासाडी, २५ जिल्ह्यांना फटका, एक लाख ३९ हजार हेक्टरवर नुकसान..

नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू :
रायझोबियम:या जीवाणूंचे कार्य सहजीवी पद्धतीने चालते. हे जीवाणू कडधान्यवर्गीय पिकांच्या मुळामध्ये स्थिर होऊन गाठी बनवतात. मुळावर वाढलेले जीवाणू हवेतील नत्राचे स्थिरीकरण करून पिकांना उपलब्ध करून देतात.
एकाच प्रकारचे रायझोबियम जीवाणू खत सर्व शेंगवर्गीय पिकांना उपयोगी पडत नाहीत. त्यामध्ये वेगवेगळे सात गट आहेत. वेगवेगळ्या गटातील विशिष्ट पिकांना त्याच गटाचे रायझोबियम जीवाणू खत वापरावे.
चवळी गट - तूर, भुईमूग, बाग, चवळी, मूग, उडीद इत्यादी
हरभरा गट - हरभरा
वाटाणा गट - वाटाणा, मसूर
घेवडा गट - घेवडा
सोयाबीन गट - सोयाबीन

रोपांच्या मुळावर अंतरक्षीकरण: ऍझोटोबॅक्‍टर किंवा ऍझोस्पिरीलम किंवा स्फुरद विरघळविणारे जीवाणू आणि ट्रायकोडर्मा बुरशी संवर्धनाकरिता, जीवाणू संवर्धने प्रत्येकी ५०० ग्रॅम प्रत्येकी ५ लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात रोपांची मुळे ५ मिनिटे बुडवून ठेवावी. त्यानंतर त्वरित रोपांची लागवड करावी. पिकांना पाणी द्यावे.

अवकाळी पावसाने नुकसान, पण राज्यांनी अहवाल पाठवले नाहीत: केंद्र सरकारची माहिती
शिर्डीच्या महापशुधन एक्सपो मध्ये पशुपालकांना मिळणार धेनू ॲपचे आधुनिक तंत्रज्ञान...
शेतकऱ्याने काढले एकरी १३३ टन ऊस उत्पादन, जाणून घ्या कसे..

English Summary: Farmers, know the importance and effective use of biological fertilizers in agriculture.
Published on: 23 March 2023, 12:56 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)