पावसाळी आणि उन्हाळी हंगामात भेंडीची लागवड करता येते उन्हाळी हंगामासाठी भेंडी लागवड १५ जानेवारी ते फेब्रुवारी अखेर या कालावधी पूर्ण झालेली असेल. मुळात भेंडी या पिकाला उष्ण आणि दमट हवामान चांगले मानवते. विशेषतः २० ते ४० अंश सेल्सिअस तापमानात हे पीक चांगले येते तापमान १५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी असेल, तर बियांची उगवण चांगली होत नाही.
जिवाणू खतांचा वापर केल्यास पीक उत्पादनात ७ ते १० टक्के वाढ झाल्याचे आढळले आहे. बियाण्याला ॲझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळवणारे जिवाणू (पीएसबी) या संवर्धकांची प्रति किलो २५ ग्रॅम या प्रमाणे प्रक्रिया करावी. बियाणे सावलीत वाळवून त्वरित वापरावे. बीजप्रक्रिया करताना जैविक घटक बियाण्यावर हाताने जोरात चोळू नये.
बियाण्याचे बाहेरील नाजूक आवरण निघून बियाण्याची उगवणक्षमता कमी होते. म्हणून बियाणे प्लॅस्टिक पिशवीवर किंवा गोणीवर पातळ थरामध्ये पसरावे. त्यावर संवर्धके टाकून प्लॅस्टिक पिशवी किंवा गोणी दोन व्यक्तींच्या साह्याने टोके धरून अलगद हलवावी, यामुळे संवर्धकाचा लेप बियाण्यावर एकसारखा चिकटण्यास मदत होते. प्रक्रिया केल्यानंतर बियाणे २४ तासांच्या आत पेरावे. या प्रक्रियेमुळे नत्र व स्फुरदयुक्त खतांच्या मात्रेमध्ये सुमारे २५ ते ३० टक्के बचत होते.
कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ! रुग्णसंख्या 16 हजारांपेक्षा जास्त, विमानतळावर चाचणी होणार..
भेंडीसाठी कसदार किंवा पोयट्याची, चांगल्या निचऱ्याची, सामू ६ ते ७ दरम्यान असलेली जमीन योग्य मानली जाते. जमिनीत सेंद्रिय व जैविक खताचा वापर करावा. उच्च प्रतिची गुणवत्ता आणि हिरव्या कोवळ्या लुसलुशीत भेंडी फळांची नियमित तोडणी करण्याच्या उद्देशाने लागवड ४०×१० किंवा ४५×२० सेमी अंतरावर करणे फायदेशीर दिसून आले आहे.
पहिले पाणी लागवडीनंतर लगेच आणि आंबवणीचे पाणी दुसऱ्या ते चौथ्या दिवसांनी द्यावे. हलक्या जमिनीसाठी ५ ते ७, तर भारी जमिनीसाठी ७ ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला तर पाणी व खतांची ही बचत होते. उन्हाळ्यात जमिनीत पुरेसा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी ठिबक सिंचन वेळापत्रकाबरोबर १२-१५ दिवसांतून एकदा पाट पाणी द्यावे.
कडब्यास पाच हजार रुपयांवर दर, शेतकऱ्यांची खरेदीसाठी लगबग..
लागवडीपासून साधारणतः ४५ दिवसात भेंडीस फुले येण्यास सुरुवात होते. त्यानंतर आठवडाभरात फळे लागण्यास सुरुवात होते. काढणी सकाळच्या किंवा व संध्याकाळच्या वेळेत केल्यास फळे बराच काळ ताजी टवटवीत राहतात. १०-१२ सें.मी. लांबीच्या हिरव्या कोवळ्या लुसलुशीत फळांची काढणी करावी. त्यासाठी एक दिवसाच्या अंतराने किंवा दररोज तोडणी गरजेची असते.
माती परीक्षणामध्ये उपलब्ध अन्नद्रव्ये (किलो/हे.) मध्यम प्रमाणात असल्यास शिफारशीत खतमात्रा द्यावी. त्यापेक्षा कमी किंवा अत्यंत कमी असल्यास शिफारशीपेक्षा अनुक्रमे २५ टक्के किंवा ५० टक्के अधिक खतमात्रा द्यावी.
मेक इन इंडियाच्या जयघोषात चीनी फुलांचा शिरकाव, मोदी सरकार शेतकऱ्याबरोबर असं का वागतय? राजू शेट्टी आक्रमक
शेतकऱ्यांनो आडसाली ऊस व्यवस्थापन...
वाढत्या मागणीने लिंबू दरात सुधारणा, शेतकऱ्यांना दिलासा
Published on: 03 April 2023, 11:13 IST