Agripedia

जमिनी माती परीक्षणानुसार सल्फर अथवा जिप्समचा वापर, भूमिगत निचरा पद्धती, हिरवळीची खते इत्यार्दीचा वापर करून सुधारता येतात. बिघडलेल्या जमिनीचा तिसरा प्रकार हा चोपण जमिनीच्या रुपाने ओळखला जातो. या जमिनीमध्ये विरघळलेल्या क्षाराचे प्रमाण मर्यादित परंतु मातीच्या कणावर सोडीयमचे प्रमाण जास्त असल्याने जमिनीच्या पृष्ठभागावर कडक पापुद्रे तयार होऊन बियाण्याची उगवण क्षमता कमी होते.

Updated on 26 June, 2023 2:23 PM IST

जमिनी माती परीक्षणानुसार सल्फर अथवा जिप्समचा वापर, भूमिगत निचरा पद्धती, हिरवळीची खते इत्यार्दीचा वापर करून सुधारता येतात. बिघडलेल्या जमिनीचा तिसरा प्रकार हा चोपण जमिनीच्या रुपाने ओळखला जातो. या जमिनीमध्ये विरघळलेल्या क्षाराचे प्रमाण मर्यादित परंतु मातीच्या कणावर सोडीयमचे प्रमाण जास्त असल्याने जमिनीच्या पृष्ठभागावर कडक पापुद्रे तयार होऊन बियाण्याची उगवण क्षमता कमी होते.

संरचना अतिशय कडक होते. या जमिनी अतिशय विम्लधर्मीय (सामू८.५ पेक्षा जास्त) असून पावसाळ्यात चिबड तर उन्हाळ्यात अतिशय कठीण होतात. या चोपण जमिनी सुधारविण्यासाठी जिप्समचा शेणखतातून वापर केल्यास मातीच्या कणांवर कॅल्शियम येतो व सोडियम सल्फेट निच-याद्वारे निघून जातो. अशा पद्धतीने जिप्समचा शेणखताबरोबर वापर केल्यास चोपण जमिनी सुधारविता येतात.

या चोपण जमिनीत चुनखडीचे प्रमाण जास्त असते अशा जमिनीमध्ये जिप्समऐवजी सल्फरचा वापर करावा. भविष्यातील शाश्वत उत्पादनासाठी जमिनीचे आरोग्य व्यवस्थापनात खालील गोष्टींचा अवलंब करणे गरजेचे आहे. पिकांची फेरपालट करून कडधान्य पिकांचा समावेश केल्याने पालापाचोळा जमिनीत पडून सेंद्रिय पदार्थाचे चक्रीकरण होते. तसेच सेंद्रिय खते जसे जमिनीतून द्यावे.

आंतरराष्ट्रीय योग दिनाची यंदाची थीम, महत्त्व आणि इतिहास, जाणून घ्या..

माती परिक्षणाद्वारे कमतरतेनुसार सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर जमिनीतून सेंद्रिय खतात मिसळून करावा. माती परीक्षण करून विद्राव्य खतांद्वारे ठिबक सिंचनातून अन्नद्रव्ये पीक वाढीच्या अवस्थेत गरजेनुसार द्यावीत. पाण्याचा अमर्याद वापर न करता, बागायत क्षेत्रामध्ये ठिबक, तुषार, मायक्रोस्प्रिकलर पद्धतीचा वापर वाढवावा.

मृद व जलसंधारणाची उपाययोजना लोक सहभागातून कोरडवाहू भागात शासनाच्या मदतीने वाढविणे गरजेचे आहे, कारण पावसाचा प्रत्येक थेंब हा जमिनीत मुरविला गेला पाहिजे. शेततळी तयार करून संरक्षित पाण्याचा उपयोग करावा. बागायत क्षेत्रात दोन ते तीन वर्षातून एकदा तरी हिरवळीची पिके म्हणून धंचा किंवा ताग गाड़ला गेला पाहिजे.

अंजीराची शेती कशी करावी, किती उत्पन्न मिळेल, जाणून घ्या...

क्षारपड जमिनीचे क्षेत्र सुधारविण्यासाठी एकात्मिक पद्धतीने पाणलोट क्षेत्रात जिप्सम शेणखतात मिसळून जमिनीत टाकावे. जादा पाण्याचा पश्चिम महाराष्ट्रातील हलक्या जमिनीचे क्षेत्र ठिबक सिंचनावर आणून कोरडवाहू फळबाग लागवड करणे गरजेचे आहे. जास्त पाणी कमी क्षेत्रावर देण्याऐवजी कमी पाणी जास्त क्षेत्रावर विभागून दिल्यास जमिनी खराब होणार नाहीत तसेच उत्पादनात वाढ होईल आणि सामाजिक समतोल राखला जाईल.

शेतकऱ्यांना मोठा झटका! गायीच्या दूधदरात 8 रुपयांची घसरण, पशुखाद्याच्या दर वाढले, शेतकरी आंदोलनाच्या तयारीत
सरकारी वाळू आली! पुणे जिल्ह्यात ११ ठिकाणी सरकारी वाळू उपलब्ध..
नेपियर गवत कोळसा आणि सीएनजी गॅस तयार करणार, जाणून घ्या दुहेरी फायदा..

English Summary: Farmers how to increase soil fertility?, know...
Published on: 26 June 2023, 02:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)