Agripedia

गाजर गवत कोणाला माहिती नाही, शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. या गवताच्या संपर्कात आल्यास अनेक अडचणी निर्माण होतात. यामुळे त्वचारोग, ऍलर्जीं होते तर जनावरांनी हे गवत खाल्ल्यास दुधाला कडवटपणा येतो. यामुळे शेतकऱ्यांसाठी हे गवत अडचणीचे ठरू शकते.

Updated on 30 July, 2022 1:14 PM IST

गाजर गवत कोणाला माहिती नाही, शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. या गवताच्या संपर्कात आल्यास अनेक अडचणी निर्माण होतात. यामुळे त्वचारोग, ऍलर्जीं होते तर जनावरांनी हे गवत खाल्ल्यास दुधाला कडवटपणा येतो. यामुळे शेतकऱ्यांसाठी हे गवत अडचणीचे ठरू शकते.

यासाठी शेतकरी अनेक उपाय करत असतात. मात्र त्यांना यश मिळत नाही. असे असताना आता आज आपण अशा एका मित्रकीटकाविषयी जाणून घेणार आहोत ज्यामुळे गाजर गवत नाहीशे होईल. आता मेस्किकन भुंगे म्हणजेच झायगोग्रामा बायकोलरॅटा या मित्रकिटकाद्वारे गाजर गवतावर नियंत्रण ठेवणे सोपे झाले आहे.

मेक्सिकन भुंग्याचे प्रौढ भुंगे मळकट पांढऱ्या रंगाचे असतात. त्यावर काळसर रंगाच्या रेषा असतात. ही अंडी अळ्या गाजर गवताच्या वरील भागातील पाने खातात. कोष अवस्थेत मातीत गेलेले भुंगे जमिनीतून निघून गाजर गवताच्या पानावर जगतात. पावसाळ्यात हे भुंगे गाजर गवत फस्त करतात. नोव्हेंबर नंतर हे भुंगे जमिनीत जाऊन बसतात.

धनंजय मुंडे, पंकजा मुंडे , बबनराव पाचपुते यांच्या कारखान्यांना नोटिसा, रक्कम थकवल्याने आयुक्तांचा दणका

पुन्हा पुढच्या पावसाळ्यात जमिनीतून निघून गाजर गवताचा नाश करण्यास सुरुवात करतात. यासाठी प्रती हेक्टरी ५०० भुंगे सोडावेत. तसेच तरोटा ही वनस्पती सुध्दा गाजर गवताला नियंत्रित करु शकते त्यामुळे ऑक्टोंबर महिन्यात तरोट्याच्या बिया गोळा कराव्यात. या बियाची एप्रिल, मे महिन्यात गाजर गवताच्या पसिरात धूळफेक करावी. यामुळे तुम्ही यावर सहज नियंत्रण मिळवू शकता.

महत्वाच्या बातम्या;
खत म्हणून कोळसा आणि वाळू, बोगस कंपन्यांचा राज्यात धुमाकूळ...
'तारीख लक्षात ठेवा 30 जुलैला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देणार'
'बांधावरुनच समजतात शेतकऱ्यांच्या समस्या, राजकारणाची वेळ नाही अन्यथा दरेकरांना...'

English Summary: Farmers, get rid of carrot grass forever, simple method..
Published on: 30 July 2022, 01:14 IST