सध्या राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकरी शेतातील कामे उरकून घेत आहेत. खते, बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबल सुरु आहे. असे असताना आता बनावट किटकनाशक बाजारात दाखल झाली आहेत. यामुळे खतासह (Purchase of pesticides) किटनाशकांची खरेदी करताना शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.
यवतमाळमध्ये पांढरकवडा तालुक्यात बनावट कीटकनाशक आणि खताचा साठा जप्त करण्यात आला आहे. कृषी विभागाने ही कारवाई केली आहे. यामध्ये 7 लाख 26 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच दोन आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. आतापर्यंत (fake fertilizer) बनावट खत आणि बोगस बियाणे बाजारात दाखल होत होते पण आता बनावट किटकनाशकही दाखल झाले आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
दरम्यान, बनावट कीटकनाशके विक्री करुन शेतकऱ्यांची फसवणूक तर होणारच आहे पण पिकांनाही याचा धोका आहे. यामुळे आता खरेदी करताना काळजी घ्यावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना रीतसर आणि पक्की पावती घेणे गरजेचे आहे. शिवाय कृषी सेवा केंद्राची नोंदणी क्रमांक असलेलीच पावती, बियाणे किंवा खते यांचे पॅकिंगवर दिले तेवढेच वजन आहे का नाही याची तपासणी करणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांनो दूध डेअरी उघडण्यासाठी सरकारकडून 7 लाख रुपये मिळणार, असा करा अर्ज
तसेच छापील पावतीचे बिल घेणे गरजेचे आहे. त्यामुळे खरेदी करताना काळजी घेतली तर फसवणूक टळणार आहे. ग्रामीण भागात अशा पध्दतीने बोगस खत आणि किटकनाशकांच्या विक्रीचे प्रमाण वाढले आहे. याठिकाणी शेतकरी बिल घेताना जास्त काळजी घेत नाही. तसेच याठिकाणी मोठ्या प्रमाणावर उधारीवर खरेदी केली जाते. यामुळे फसवणुकीचे प्रमाण जास्त आहे.
तरुणांनो संधीचे करा सोनं! रेल्वेत कोणतीही परीक्षा न देता थेट मेगाभरती...
दरम्यान, तालुकास्तरावर कृषी विभागाने भरारी पथकांची नेमणूक केली आहे. पांढरवाडा तालुक्यातून याबाबत तक्रार दाखल होताच भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी याचा शोध घेण्यास सुरवात केली. जावेद अन्सारी आणि दिनेश कुंडलवार हे गुजरात व तेलंगाना राज्यातून आणलेल्या बोगस किटकनाशक व बनावट खताची विक्री करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या;
आता 25 वर्ष येणार नाही वीज बिल, मोदी सरकारची मोठी घोषणा..
आता बिअरच ठरणार तुमच्या शरीरासाठी फायदेशीर, संशोधनातून आली फायद्याची माहीती समोर
शेतकऱ्यांनो मुख्य पिकांसोबत कडेला ही शेती करा, व्हाल लखपती
Published on: 09 July 2022, 02:28 IST