Agripedia

कोरोनाच्या (corona) आजारानंतर आयुर्वेदिक औषधांकडे (Ayurvedic medicines) अनेकांचे लक्ष वेधले आहे. च्यवनप्राश ते घरातील धूप अगरबत्ती तसेच साबणात सुद्धा तुळशीच्या अर्काला विशेष मागणी आहे.

Updated on 05 August, 2022 5:29 PM IST

कोरोनाच्या (corona) आजारानंतर आयुर्वेदिक औषधांकडे (Ayurvedic medicines) अनेकांचे लक्ष वेधले आहे. च्यवनप्राश ते घरातील धूप अगरबत्ती तसेच साबणात सुद्धा तुळशीच्या अर्काला विशेष मागणी आहे.

अर्थात या साऱ्यामुळे तुळशीची शेती (Cultivation of Tulsi) ही नफ्याचे स्रोत ठरत आहे. सध्या तुळशीचा वापर जास्त आणि पुरवठा कमी असल्याने शेतकरी चांगले उत्पादन घेऊ शकतात.

जर शेतकऱ्यांनी वैयक्तिक स्तरावर शेती (agriculture) करण्यापेक्षा तुळशीची उत्पादने तयार करणाऱ्या कंपनीशी करार करून लागवड (cultivation) केली तर जास्त फायद्याचे ठरेल. तुळशीचा लागवड खर्च प्रति एकर 15 हजार रुपये आहे.

सर्वसामान्यांना मोठा दिलासा; खाद्य तेल होणार स्वस्त, जाणून घ्या आजच्या किमती

तर सरासरी महिन्याला किमान 30 हजार ते लाख रुपयांपर्यंत म्हणजेच तीन महिन्यांत 3 लाख रुपये इतकी मिळकत सहज तुळशीच्या लागवडीतून शक्य होऊ शकते. विशेष म्हणजे वैद्यनाथ, डाबर, पतंजली या कंपन्या तुळशीच्या लागवडीसाठी बाजारात करार करीत आहेत.

ऊसतोडणी यंत्राला मोठी मागणी; शेतकऱ्यांचा कल ऊसतोडणी यंत्राकडे..

कंत्राटी शेतीशिवाय तुम्ही तुमचे पीक मार्केट (crop market) एजंटांनाही विकू शकता. जवळपासच्या बाजारात आपला माल विकण्यासाठी तुम्ही विविध व्यापाऱ्याशी संपर्क साधू शकता. तसेच, कॉन्ट्रॅक्ट शेती (contract agriculture) करणे हा एक शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय आहे.

तुळशीची लागवड (tulasi cultivation) साधारण जुलै महिन्यापासून करणे फायद्याचे ठरते. रोपांवर फुले येण्यास सुरूवात होते त्याचवेळेस कापणी केल्यास रोपांना नवीन फांद्या येतील आणि जास्त तेल काढता येईल. अशावेळी तुम्हाला चांगली मिळकत मिळू शकते.

महत्वाच्या बातम्या 
Mixed Fisheries: मिश्र मत्स्यपालन तंत्राचा लावला शोध; शेतकरी यातून घेतोय लाखोंमध्ये उत्पन्न, जाणून घ्या..
Cotton Crop: कापूस पिकावर 'या' किडींचा प्रादुर्भाव; त्वरित करा उपाय अन्यथा होईल मोठे नुकसान
Agriculture Cultivation: ऑगस्टमध्ये करा 'या' शेतीची लागवड; मिळेल दुप्पट उत्पन्न

English Summary: Farmers agriculture profitable Earning millions investment
Published on: 05 August 2022, 05:19 IST