Agripedia

शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 मध्ये दुप्पट करणार असे आश्वासन अच्छे दिनवाल्या सरकारने दिले होते, मात्र अच्छे दिनवाल्या सरकारच्या काळातच शेतकऱ्यांना आतबट्ट्याच्या शेतीला सामोरे जावे लागत असताना पाहायला मिळत आहे.

Updated on 21 August, 2022 11:38 AM IST

शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 मध्ये दुप्पट करणार असे आश्वासन अच्छे दिनवाल्या सरकारने दिले होते, मात्र अच्छे दिनवाल्या सरकारच्या काळातच शेतकऱ्यांना आतबट्ट्याच्या शेतीला (agriculture) सामोरे जावे लागत असताना पाहायला मिळत आहे.

भारतातील शेती ही नेहमीच आतबट्ट्याची शेती ठरली आहे. हे चित्र शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील फ्लॉवर उत्पादक शेतकऱ्याकडे पाहायला मिळाले. या शेतकऱ्याच्या हाती फक्त साडे नऊ रुपयांची पट्टी असल्याचे त्याने साडे नऊ रुपयांचा चेक परत व्यापाऱ्याला दिला.

शिरूर तालुक्यातील पूर्व भागात तरकारी उत्पादक शेतकऱ्यांचे (farmers) प्रमाण अधिक आहे. या भागात मिरची, भेंडी, वांगी, फ्लॉवर, टोमॅटो, कोबी इ. पिके शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेत आहेत.शेतकरी ही तरकारी पिके पुणे, मुंबई, सुरत ,आदी ठिकाणी दररोज पाठवली जातात.

Onion Market Price: कांद्याच्या दरात चढ की उतार? जाणून घ्या बाजारभाव

शेतकरी किसन फराटे यांनी मांडवगण फराटा येथे मोठ्या आशेने फ्लॉवर ची लागवड (Cultivation of flowers) केली. त्यासाठी खते व औषधे देत पीक देखील चांगले आले होते. तोडणी केल्यानंतर त्यांनी नवी मुंबई येथे फ्लॉवर विक्री (Flower sales) साठी पाठवले असता, यावेळी त्यांचा सर्व खर्च वजा जाता हाती फक्त ९ रुपये ५० पैसे इतकी पट्टी आली.

ड्रोन बनवण्यात स्वदेशी नारा!! भारतात तयार होत आहेत मोठ्या प्रमाणावर ड्रोन, अनुदानही जास्त

शेतकरी किसन फराटे काय म्हणाले?

"फ्लॉवरची चांगला बाजारभाव मिळेल म्हणून लागवड (cultivation) केली होती. मात्र हे उलट झाले, उत्पादन खर्च सुद्धा निघाला नाही. संपूर्ण पिकावर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. तसेच व्यापाऱ्याकडून फसवणूक होत असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला असून शेतमालात जर फसवणूक होत राहिली, तर भविष्यात शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही", असे यावेळी बोलताना ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 
शेतकरी मित्रांनो 'या' यंत्राने करा कमी खर्चात पीक फवारणी; पैशांची होईल मोठी बचत
शेतकऱ्यांनो 'या' कारणाने दुधाची फॅट होते कमी; फॅट वाढविण्यासाठी वापरा हे तंत्र
'या' राशीच्या लोकांचे भाग्य सूर्य प्रकाशासारखे चमकणार; वाचा तुमचे राशीभविष्य

English Summary: farmer presented check nine half rupees
Published on: 21 August 2022, 11:28 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)