भारतातील शेतकरी रब्बी हंगामात ज्वारी पिकाची लागवड (Cultivation of sorghum crop) मोठ्या प्रमाणात करतात. मात्र अधिक उत्पादनासाठी ज्वारीची तंत्रशुद्ध पद्धतीने लागवड करणे अत्यंत गरजेचे आहे. या पद्धतीने अनेक शेतकरी ज्वारी लागवड करून बक्कळ पैसा कमवत आहेत.
रब्बी हंगामात केलेल्या ज्वारीच्या लागवडीचा फायदा म्हणजे रब्बी ज्वारीची प्रत (Copy of Rabbi Zwari) चांगली मिळते. आपण पाहिले तर कडब्याची प्रत देखील दर्जा असते. सुधारित तंत्राने रब्बी ज्वारीची लागवड कशी करावी? याची तंत्रशुध्द माहिती आज आपण जाणून घेऊया.
'या' बाजारसमितीत सोयाबीनला मिळाला सर्वाधिक बाजारभाव; जाणून घ्या
सुधारित तंत्राने ज्वारी लागवड करा
1) सुधारित तंत्राने ज्वारीची लागवड केल्यास कोरडवाहू हलक्या जमिनीवर हेक्टरी (hectare) ८-१० क्विंटल, मध्यम जमिनीवर २०-२५ क्विंटल, भारी जमिनीवर २५-३० क्विंटल, तर बागायती ज्वारीचे ३०-३५ क्विंटल उत्पादन घेता येते. ज्वारीसाठी मध्यम ते भारी जमीन निवडा. साधरणत: जास्त ओलसर असलेल्या जमिनीत रब्बी ज्वारीची पेरणी केल्यास त्याचा शेतकर्यांना फायदा होतो.
2) १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरपर्यंत रब्बी ज्वारीची पेरणी करा. रब्बी ज्वारीला हेक्टरी १० किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ४ ग्रॅम गंधक (३०० मेश पोताचे) चोळावे तसेच, २५ ग्रॅम अॅझोटोबॅक्टर व पी.एस.बी. जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करा.
3) ज्वारीच्या अपेक्षित उत्पादनासाठी हेक्टरी रोपाची संख्या १.४८ लाख ठेवणे जरुरीचे आहे. त्यासाठी ज्वारीची पेरणी दोन ओळीत ४५ सें.मी. व दोन रोपांत १५ सें.मी. अंतर ठेवून करा.
गव्हाच्या 'या' ३ जाती शेतकऱ्यांना करतील मालामाल; फक्त १२० दिवसात देतील तब्बल ९० क्विंटल उत्पादन
रब्बी ज्वारीसाठी खतांची योग्य मात्रा
कोरडवाहू रब्बी ज्वारीकरिता ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश (११० किलो युरिया + १५६ किलो सिंगल सुपर फॉस्फेट + ४२ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) हेक्टरी याप्रमाणे खत द्या.
कोरडवाहू रब्बी ज्वारीला खताची संपूर्ण मात्रा पेरणीच्या वेळीच द्या. परंतु जर रब्बी ज्वारी ओलिताखाली घ्यावयाची असेल, तर ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० किलो पालाश (२०० किलो सुफला २० : २० : ० + ६७ किलो म्युरेट ऑफ पोटॅश अथवा ८७ किलो युरिया + २५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट + ६७ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) हेक्टरी द्या.
यापैकी ४० किलो नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीसोबतच द्यावे व उरलेली ४० किलो नत्राची मात्रा (८७ किलो युरिया) पीक पेरणीनंतर २५-३० दिवसांनी द्या. मृद चाचणीत आवश्यकता भासल्यास पालाशची मात्रा द्या.
याचबरोबर शेतकऱ्यांनी पिकामधील तण व्यवस्थापन करणे देखील तितकेच गरजेचे आहे. वेळीच तणनाशक फवारणी करत रहा, शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने ज्वारी पिकाची लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते.
महत्वाच्या बातम्या
आता CIBIL स्कोअरशिवाय कर्ज मिळणार; एलआयसीची 'ही' योजना शेतकऱ्यांना देतेय मोठी संधी
पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; दरवर्षी मिळणार 1 लाख 11 हजार रुपये
सरकारकडून तेलबियांच्या लागवडीला प्रोत्साहन; 8 लाख बियाणांचे मिनीकिट्सचे शेतकऱ्यांना मोफत वाटप
Published on: 23 September 2022, 03:05 IST