Agripedia

शेतकरी चांगले उत्पादन काढण्यासाठी नवनवीन खतांचा वापर करतात, परंतु खत देताना काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते. जेणेकरून पिकांमधून भरघोस उत्पन्न कमवता येईल. याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया...

Updated on 02 August, 2022 12:28 PM IST

शेतकरी चांगले उत्पादन काढण्यासाठी नवनवीन खतांचा (Fertilizers) वापर करतात, परंतु खत देताना काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते. जेणेकरून पिकांमधून भरघोस उत्पन्न कमवता येईल. याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया...

शेतकरी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा माती परीक्षण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे आणि यासाठी कोणते खत (Fertilizers) घालणे गरजेचे आहे, हे माती परीक्षण केल्यावरच समजेल.

नत्राचा पुरवठा करण्यासाठी नीम कॉटेड युरीयाचा (Neem Coated Urea) वापर करणे महत्वाचे आणि गरजेचे आहे. स्फुरद कमतरता जर मातीत असेल तरच स्फुरदयुक्त खतांचा वापर करा.

काही पिके कमी वेळात उत्पादन देतात तर काही पिके (crop) जास्त काळ लावतात. त्यामुळे कमी वेळात पिकणाऱ्या पिकांना अन्नद्रव्य उपलब्ध होणारी खते वापरावीत तर पीक उगवण्यासाठी जास्त काळ लागणाऱ्या पिकांना हळूहळू अन्नद्रव्य उपलब्ध होणाऱ्या खतांचा वापर करा.

हे ही वाचा 
Farmers Fund: शेतकऱ्यांचे अच्छे दिन! खात्यात जमा होणार 50 हजारांचा निधी

कमी कालावधीत येणाऱ्या पिकांसाठी फॉस्फेटीक खत (Phosphatic fertilizer) टाका तर जास्त कालावधीत येणाऱ्या पिकांसाठी साइट्रेट विरघळणारे खत वापरणे गरजेचे आहे. शेतात पीक घेताना या पिका आधी नेमके कोणते पीक घेतले होते, त्या पिकाला कोणते खत जास्त वापरलेले हे माहीत असणे गरजेचे आहे.

ओलसरपणा कमी असणाऱ्या जमिनीत नायट्रेट युक्त तर जास्त पाऊस असणाऱ्या भागात अमोनीकल किंवा अमाइडयुक्त नायट्रोजन (amide nitrogen) ही खते वापरा. ओलसर असणाऱ्या क्षेत्रात सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करताना कॅल्शियम (Calcium) तसेच मॅग्नेशिअम अश्या प्रकारच्या खतांचा वापर करा.

विशेष म्हणजे आम्लयुक्त जमिन असेल तर त्यामध्ये नायट्रोजन युक्त खते (Nitrogen rich fertilizers) वापरावी लागतील. वालुकामय जमीन तसेच चिकन मातीची जमीन असेल तर त्यामध्ये जैविक खतांचा वापर करा.

हे ही वाचा 
Land Survey Application: शेतकऱ्यांनो काही मिनिटात मोबाईलद्वारे करा जमिनीची मोजणी; नवीन अँप लॉन्च

खतांचा वापर अशा पद्धतीने करा

1) शेतकऱ्यांनो (farmers) शेतात कंपोस्ट खत आणि शेणखत टाकायचे असेल तर ते पेरणीपूर्वीच टाका.

2) पीक पेरणी करताना फोस्फेटिक आणि पोटॅशियम युक्त खत (Nitrogen fertilizers) जमिनीत मिसळून घ्या.

3) उभ्या पिकात जर खतांचे मिश्रण करून फवारणी केली तर नायट्रोजन वायूविजन, स्थिरीकरण, डीनायट्रीफिकेशन द्वारे जे नुकसान होते ते नुकसान होणार नाही.

महत्वाच्या बातम्या 
Crop Production: 'या' पाच पिकांच्या शेतीमधून शेतकरी कमवतोय लाखों रुपये; जाणून घ्या 'या' पिकांविषयी...
Ration Card Holders: रेशन कार्ड धारकांना मोठा धक्का; मोफत धान्य सुविधा बंद होणार
Horoscope Today: 'या' राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

English Summary: Farmer attention fertilizing crops benefit
Published on: 02 August 2022, 12:16 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)