माती आणि पिकांचे दर्जेदार उत्पादन या एकमेकांशी निगडीत गोष्टी असून त्यांचे एकमेकांशी असलेले संतुलन योग्य असणे उत्पादनवाढीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. आपल्याला माहित आहे कि मातीची सुपीकता ही वेगवेगळ्या पोषक घटकांच्या प्रमाणावर अवलंबून असते. सगळ्या घटकांचे प्रमाण व्यवस्थित असेल तर त्या मातीतून येणारे पिका पासून मिळणारे उत्पादन देखील हे दर्जेदार व भरपूर असते.
आता मातीची जी काही प्रक्रिया असते तिच्यावर मातीमधील असलेले भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांचा परिणाम होत असतो आणि या मातीच्या प्रक्रियेवरच लागवड केलेल्या पिकाची वाढ, मातीची सुपीकता आणि सूक्ष्मजीवांचे वैशिष्ट्य अवलंबून असते.
मातीची जी काही प्रतिक्रिया असते ती वनस्पतींच्या पोषण द्रव्यांची विद्राव्यता वाढवून किंवा कमी करून वनस्पतींच्या वाढीसाठी लागणारे सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करत असते.
मातीमध्ये जे काही विरघळणारे लवण असतात त्यांची मात्रा ही जमीन किती खारट आहे याचे संकेत देते. क्लोरीन, कार्बोनेट, बायकार्बोनेट आणि सल्फेट सारख्या घटक तसेच सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम यासारखे केशन्स हे सर्वसामान्य जमीन आहे.
हे सर्व घटक एकत्रित करून लवण तयार करतात. जर जमिनीमध्ये केशन्सचे प्रमाण जास्त असेल तर पिकाला हानी पोहोचते तर या जमिनीला आपण खारट जमीन म्हणतो.
खारट माती म्हणजे मातीत विद्राव्य मीठ आहे जे वनस्पती वाढीस प्रतिबंध करते.खारट मातीत सर्वात सामान्य ॲनायन आहेत.क्लोरीन, सल्फेट, कार्बनेट आणि बायकार्बोनेट सर्वसामान्य कॅटायन आहेत.
तसेच सोडियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियम हे ॲनायन आणि कॅटायन एकत्रितपणे लवण तयार करतात. मातीमधील आपण मिठाचा विचार केला तर ते सर्वात सामान्य मीठ हे सोडियम क्लोराइड आहे.
साधारणपणे कोरड्या प्रदेशांमध्ये तसेच सिंचनाखाली आलेली जी काही शेती आहे तिच्या निम्मे क्षेत्रांमध्ये जमिनीत असलेल्या क्षारांचे प्रमाण हे वेगवेगळ्या स्वरूपात असते.
झालेल्या एका अभ्यासानुसार जगभरात मिठाने ग्रासलेल्या मातीच्या आकारमान एक अब्ज हेक्टरपेक्षा जास्त आहे. आपल्या भारतात देखील जवळपास चार टक्के लागवडीखालील भागात खारवट जमिनीचे समस्या आहे.
जी जमीन मीठाणे प्रभावित असते त्या मातीचा पीएच आणि त्याची सोडियम सामग्री वर अवलंबून असते. क्लोरीन, बायकार्बोनेट आणि सल्फेट सारख्या घटक आणि सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम यासारख्या केशन्स हे सर्वात सामान्य जमीन आहे.
Published on: 28 July 2022, 12:50 IST