पिल्लांची शेडवर आगमन होण्याच्या दहा दिवस अगोदर शेड स्वच्छ करून घ्यावे.सर्वप्रथम शेडमधील जाळे काढून घ्यावे व त्यानंतर जमिनीचा भाग स्वच्छ करावा.पृष्ठभाग स्वच्छ केल्यानंतर त्यावर चुन्याचे पाणी शिंपडून घ्यावे व आजूबाजूच्या भिंतीला चुना मारून घ्यावा.
त्यानंतर शेडच्या आतील व बाहेरील बाजूस चांगल्या कंपनीचे जंतुनाशक फवारावे.Spray the inside and outside of the shed with a disinfectant from a good company.
पावसाचा जोर या तारखेपर्यंतच, इतक्या दिवसानंतर मात्र कल उघडीपीकडे
जंतुनाशक फवारल्यानंतर शेड दोन दिवस पूर्णपणे बंद ठेवावे जेणेकरून जंतुनाशक अधिक प्रभावी ठरेल.पिल्लू येण्याचे एक दोन दिवस अगोदर जमिनीवर एक ते दोन इंचाचा लिटरचा थर पसरवावा.
लिटर पूर्णपणे कोरडे असणे आवश्यक आहे.चिक्स येण्याआधीच चिक्सगार्ड व्यवस्थित लावून घ्यावे.300 पक्षांसाठी एका चिक्सगार्ड वापर करावा.पक्षी येण्याच्या 24 तास अगोदर पडदे बंद करून लाईट चालू करून द्यावे जेणेकरून पक्षी आल्यानंतर
त्यांना योग्य तापमान मिळेल.शेडमधील तापमान योग्य आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही डिजिटल थरर्मा मीटरचा वापर करू शकता.शेडमधील तापमान साधारण 35 डिग्री एवढे असावे.शेड मध्ये जंतुनाशक वापरतांना फॉर्मुलिन किंवा कर्सोलिन हे जंतुनाशक तुम्ही वापरू शकतो
Published on: 13 October 2022, 01:57 IST