Agripedia

हा रोग कोरडवाहू तसेच ओलिताखालील अशा दोन्ही मिरची पिकांमध्ये आढळून येतो.

Updated on 19 September, 2022 3:04 PM IST

हा रोग कोरडवाहू तसेच ओलिताखालील अशा दोन्ही मिरची पिकांमध्ये आढळून येतो. या रोगाचा प्रसार बियाण्याद्वारे तसेच हवेद्वारे होऊन पिकाची फांदी शेंड्याकडून खालच्या दिशेने वाळत येते. नुकसानग्रस्त फांदीची साल प्रथम करड्या रंगाची होऊन फांदीवर घट्ट काळ्या रंगाचे ठिपके आढळतात. पक्र झालेल्या फळावर गोलाकार किंवा अंडाकृती काळे ठिपके आढळतात. नुकसानग्रस्त फळे सुकतात आणि वाळतात.

नियंत्रण - हा रोग बियाण्यापासून होत असल्यामुळे रोगमुक्त बियाण्याचाच वापर करावा. Since this disease is transmitted from seeds, only disease-free seeds should be used. मॅन्कोझेब तीन ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

हे ही वाचा - पावसात वाचवा पिके अशापद्धतीने, अवश्य वाचा

भुरी रोग - पिकामध्ये भुरी रोग साधारणतः डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यादरम्यान आढळतो. पांढरी पावडर पानाच्या खालच्या बाजूला आढळते. अधिक प्रमाणात प्रादुर्भाव असल्यास पाने पिवळी पडून गळतात फुलांची निर्मिती पूर्णतः बंद होते.

नियंत्रण - पाण्यात विरघळणारे गंधक ३0 ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी.ट्रायडिमेफोन किंवा पेनकोनझोल किंवा मायकोबुटानिल हे बुरशीनाशक १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.विषाणुजन्य रोग - विषाणुजन्य रोगाचा (काकडी मोझाक विषाणू, बटाटा विषाणू तंबाखू मोझाक विषाणू आणि पर्णगुच्छ विषाणू इ.) प्रादुर्भाव हा

बियाण्यामार्फत किंवा मावा, फुलकिडे व तुडतुडे या रसशोषण करणा-या किडींद्वारे होतो. त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रोगामुळे पानाच्या आकारात बदल होतो. पानाच्या पृष्ठभागावर हलक्या आणि गर्द हिरव्या रंगाचे ठिपके आढळतात. तसेच पाने काठाने गुंडाळतात आणि झाडाची वाढ खुटते आणि फुलांची निर्मिती बंद होते.नियंत्रण - मिरची पिकामध्ये स्वच्छता ठेवून पीक

तणमुक्त ठेवावे. रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगग्रस्त झाडे मुळासकट उपटून टाकावीत व जाळून नष्ट करावीत. जेणेकरून या रोगाचा संपूर्ण पिकामध्ये प्रादुर्भाव होणार नाही.रसशोषण करणा-या किडीच्या नियंत्रणासाठी गरजेनुसार ऍसिफेट १0 ग्रेम किंवा फिप्रोनिल २0 मि.लि. प्रति १0 लिटर पाUयात घेऊन फवारणी करावी. मिरची पीक क्षेत्राच्या कडेला दोन-तीन ओळींमध्ये मका पिकाची लागवड करावी. मिरची पिकावरील रोग व उपाय. 

English Summary: Diebank and fruit rot on chillies Solution
Published on: 18 September 2022, 08:11 IST