Agripedia

नमस्कार मित्रांनो ग.दि माडगुळकर सरांची कविता आहे थोडं समजून घ्या "दैवाने नियम पाडलीl दिवसा मागे रात्रं जोडलीl सुखा मागे दुःख योजीले कधी उण तर कधी सावलीl असेच आपल्या शेती च आहे कारण शेती हा व्यवसाय निसर्गावर आधारीत आहे.

Updated on 08 May, 2022 10:50 PM IST

नमस्कार मित्रांनो ग.दि माडगुळकर सरांची कविता आहे थोडं समजून घ्या "दैवाने नियम पाडलीl

दिवसा मागे रात्रं जोडलीl

सुखा मागे दुःख योजीले

 कधी उण तर कधी सावलीl असेच आपल्या शेती च आहे कारण शेती हा व्यवसाय निसर्गावर आधारीत आहे.

या निसर्गाचे चक्राचा  अभ्यास केल्याशिवाय आपल्याला शेती व्यवसाय हा नीट करताच येणार नाही. केवळ ढोरं मेहनत करून व काबाडकष्ट केल्यानं शेती पिकतं नाही राजे हो. शेतीत जर मनापासून काम केले पाहिजे त्याच बरोबर दिमाखाने काम करणे आवश्यक आहे. कोणत्याही क्षेत्रातील व्यवसायात काम करताना त्या क्षेत्राच्या कामाच ज्ञान असणं आवश्यक आहे. नाही परीणाम वेगळे मिळतात. शेती या क्षेत्रात   निसर्गाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे बुद्धी चां वापर  शेती मधे करावा लागतेच निसर्गाचे आपले नियम आहे  पावसाळा होतो पाणी पडते त्याच पाण्याची वाफ होऊन तिचे ढग बनतात. त्या ढगातून पुन्हा पाऊस पडतो. तेच पावसाचे पाणी वाफ होऊन ढगात रूपांतरित होत असते. असे हे पाण्यापासून पाण्यापर्यंत हे निसर्गाचं चक्र आहे.तशिच अवस्था पिकाची आहे.आपल्या शेतीमध्ये आपण पीक घेतो ! ते पीक काय करतं की शेतीतल्या मातीची सुपीकता वापरून आपल्याला उत्पादन देतो.

ज्या मातीमधला कर्ब हे पिकं  घेत असते. ते पीक काय करतं की त्या मातीतला त्याने ओढून घेतलेली ताकद परत करीत असते. प्रत्येक पिकाची वेगवेगळी भूमिका असते आपली कस परत करण्याची ताकद कमी जास्त असते पण ते पीक समाधानी असते. ति वनस्पती मातीला काही ना काही देत रहाते.जसे मुग हे पीक जमिनीचा कस ओढून घेते आणि आपल्याला उत्पादन देतं पण जाताजाता आपल्या मातीला मुळं खोड पाने हे देते. तेच काष्ठ पुन्हा जमिनीत कुजतात व खत म्हणून काम करत असते. आता हेच बघा आपन हरबरा, तूर, भुईमूग, गहु, उडीद ही पिके तर आपल्या मुळाशी असलेल्या गाठीतून जमिनीला भरपूर सुपिकता देत असतात. पीक घेणे, त्याने टाकून दिलेेले अवशेष पुन्हा कूजणे  त्यातून पुन्हा पीक काढणे हे चक्र आहे. नैसर्गिक शेती मधे याच चक्राचा वापर केला जात असतो. शेतातली केवळ पिकेच हे चक्र चालवत असतात असे नाही तर कीटक, प्राणी हेही अशाच प्रकारे या चक्रात सहभागी होत असतात. गाय, म्हैस, बैल हे प्राणी शेतात निर्माण झालेला चारा, कडबा किंवा गवत खातात आणि आपले पोट भरतात. हे प्राणी आपले पोट फुकट भरत नाहीत. ते तो चारा पुन्हा उगवावा यासाठी आवश्यक असलेले शेण आणि मूत्र पुन्हा शेतात टाकतात.

गाय चारा खाते, शेण देते, शेणातून पुन्हा चारा तयार होतो. हे निसर्गाचे चक्र आहे. पक्षीही असाच व्यवहार करीत असतात. आपण कधी शेतात नांगरणी करतो तेव्हा जमिनीतले खालचे मातीचे थर उलथून वर येतात. त्या थरात

काही कीडी असतात काही कृमी असतात. त्यांना वेचून खाण्यासाठी बगळे आणि अन्य पक्षी जमा व्हायला लागतात. त्यांना शेतातून हे खाद्य मिळते. पण ते वेचून खाऊन उडून जाताना ते पक्षी शेतात व जातात. आपली विष्ठा ते जमिनीला देतात. त्यांचेही मलमूत्र शेताला खत म्हणून उपयोगी पडत असते. पण आता चित्रं वेगळं आहे आपन निसर्गाला मात देण्याच स्वप्न बघत आहे.झाडे चे निसर्गाने दिलेली भेट आहे त्या गोष्टी चां अपव्यय चालु आहे.आपन जर निसर्गाच चक्र जर तोडले तर परीनाम खुप भयंकर होईल एकदा पाणी पिऊन जगता येईल पण झाडेच नसेल तर काय होईल याचा विचार करा...........!

धन्यवाद

मिलिंद जि गोदे

Mission agriculture soil information

Save the soil all together

milindgode111@gmail.कॉम

महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:मदर्स डे' स्पेशल! आजच्या दिनी या योजनांच्या माध्यमातून तुमच्या आईला द्या आर्थिक सुरक्षेची हमी

नक्की वाचा:शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी! केंद्र सरकारची 'ही' योजना देईल शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज, वाचा सविस्तर या योजनेबद्दल

नक्की वाचा:बियाणे खरेदी करण्यापूर्वी सर्वसाधारणपणे ही काळजी घ्यावी, ना तोटा फक्त नफा

English Summary: cycling of nature is so important to farming and soil fertility
Published on: 08 May 2022, 10:50 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)