Agripedia

शेतकरी चांगले उत्पादन घेण्यासाठी नवनवीन पिकांचा समावेश करत असतात. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना कमी मेहनतीतून जास्त उत्पादन मिळणाऱ्या पिकांविषयी माहिती नसते. आपण अशा पालेभाजी विषयी सविस्तर माहिती घेऊया.

Updated on 04 August, 2022 11:54 AM IST

शेतकरी चांगले उत्पादन (product) घेण्यासाठी नवनवीन पिकांचा समावेश करत असतात. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना कमी मेहनतीतून जास्त उत्पादन मिळणाऱ्या पिकांविषयी माहिती नसते. आपण अशा पालेभाज्या विषयी सविस्तर माहिती घेऊया.

पालक पालेभाजी लागवडीतून (Cultivation of spinach leafy vegetables) शेतकरी चांगला पैसा कमवू शकतात. या पिकामद्धे खूप कमी मेहनत लागते आणि पालक वर्षभर खाल्ला जातो. ही एक सदाहरित भाजी आहे, जी वर्षभर पिकवता येते. जगभर त्याची लागवड (Cultivation) केली जाते. याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. त्वचा, केस, डोळे आणि मेंदूच्या आरोग्यासाठी, पचनासाठी चांगले आहे.

हे ही वाचा 
Onion Rate: कांद्याच्या दरात चढ की उतार? जाणून घ्या आजचा कांदा बाजारभाव...

पालकाच्या बियांची पेरणी अशी करा

पालकाची पेरणी दोन्ही पद्धतींनी केली जाते. त्याच्या पेरणीसाठी, आधीच तयार केलेल्या शेतात बेड आणि बंधारे तयार करा. हे बेड तयार करताना बेडमध्ये एक फूट अंतर ठेवावे आणि बेडमध्ये लावलेल्या बियांमध्ये 5 ते 10 सेंटीमीटर अंतर ठेवा.

त्याच्या बिया जमिनीत दोन ते तीन सें.मी. खोलीवर पेरल्या पाहिजेत. जेणेकरून बिया चांगल्या प्रकारे उगवतील. याशिवाय फवारणी पद्धतीने बियाणे लागवडीसाठी (Seed planting) शेतात योग्य आकाराचे बेड तयार करून त्या वाफ्यांमध्ये फवारणी केली जाते. यानंतर हाताने किंवा डेंटलीच्या साहाय्याने बिया जमिनीत गाडल्या जातात.

बियांची (Seed) चांगली उगवण आणि विकास होण्यासाठी जमिनीत ओलावा असणे अत्यंत आवश्यक आहे. जमिनीतील ओलावा चांगला नसल्यास पेरणीपूर्वी पाणी द्यावे किंवा पेरणीनंतर पहिले पाणी द्यावे. उन्हाळी महिन्यात ४ ते ६ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. हिवाळ्यात 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाणी द्या.

हे ही वाचा 
Groundnut Cultivation: शेतकरी मित्रांनो भुईमुगाच्या 'या' वाणाची करा लागवड; मिळेल दुप्पट उत्पन्न

उत्पन्न

पालेभाजीची लागवड (Cultivation of leafy vegetables) प्रतिहेक्‍टरी अंदाजे केली तर 150 ते 250 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते. जे बाजारात 15 ते 20 रुपये किलो दराने विकले जाऊ शकते. अशाप्रकारे हेक्टरी 25 हजार रुपये खर्च काढला तरी 200 क्विंटल 1500 रुपये प्रति क्विंटल या दराने 3 महिन्यांत सुमारे 2 लाख 75 हजार रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.

महत्वाच्या बातम्या 
Cultivation Of Agriculture: शेतकरी मित्रांनो 'या' शेतीची करा लागवड; वर्षाला ८ ते १० लाखांचा होतोय नफा
Gas Cylinder Subsidy: तुम्हाला गॅस सिलिंडरवर सबसिडी किती मिळते? जाणून घ्या घरबसल्या..
Horoscope: ऑगस्टमध्ये 'या' चार राशींचे भाग्य उजळणार; वाचा सविस्तर

English Summary: Cultivation Of Vegetables Effort Yield Plant vegetable anytime
Published on: 04 August 2022, 11:41 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)