केंद्र सरकार व राज्य सरकार (state government) शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवून आर्थिक दिलासा देत असते. अशाच एका वनस्पती लागवडीविषयी जाणून घेऊया, ज्या वनस्पतीला लागवडीसाठी सरकार प्रोत्साहन देत आहे.
आपण अश्वगंधा लागवडीविषयी माहिती घेणार आहोत. हे नगदी पीक आहे. या पिकातून शेतकरी खूप कमी वेळात चांगला आर्थिक नफा मिळवत आहेत. या पिकातून खरोखर भरपूर उत्पन्न मिळवता येते.
भरघोस उत्पन्न
अश्वगंधाच्या लागवडीसाठी (Cultivation of Ashwagandha) सप्टेंबर महिना सर्वात योग्य मानला जातो. त्याची फळे, बिया आणि साल वापरून अनेक प्रकारची औषधे बनवली जातात. विशेष म्हणजे अश्वगंधाचा वापर तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी देखील केला जातो.
अश्वगंधाची लागवड करून शेतकरी 50 टक्के अधिक नफा मिळवू शकतात. चांगल्या उत्पादनामुळे अलीकडच्या काळात उत्तर भारतातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर अश्वगंधाची लागवड करत असल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा
Horoscope: ऑगस्टमध्ये 'या' चार राशींचे भाग्य उजळणार; वाचा सविस्तर
अश्वगंधाची लागवड
अश्वगंधाची लागवड (Cultivation of Ashwagandha) एक हेक्टरमध्ये करायची असल्यास 10 ते 12 किलो बियाणे आवश्यक आहे. हे बिया 7-8 दिवसात उगवण अवस्थेत पोहोचतात. नंतर ते रोप ते रोप अंतर 5 सेमी आणि रेषा ते रेषा अंतर 20 सेमी अंतराने शेतात (Agriculture in Maharashtra) लावले जातात. अश्वगंधा ही मूळ औषधी वनस्पती मानली जाते.
हे ही वाचा
Gas Cylinder Subsidy: तुम्हाला गॅस सिलिंडरवर सबसिडी किती मिळते? जाणून घ्या घरबसल्या..
भारतीय वैद्यकीय प्रणालींमध्येही याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. विशेष म्हणजे आयुर्वेद आणि युनानी औषधे बनवण्यासाठीही त्याची मुळे वापरली जातात. पेरणीनंतर 160-180 दिवसांनी अश्वगंधा पीक काढणीसाठी तयार होते. त्यांना कापून, त्यांची मुळे, पाने आणि साल वेगळी करून आणि बाजारात विकून तुम्ही श्रीमंत होऊ शकता.
महत्वाच्या बातम्या
Modern Agriculture: आधुनिक शेतीतून 'हे' गाव करतय लाखोंची कमाई; जाणून घ्या सविस्तर
Cultivation Of Vegetables: कमी मेहनत जास्त उत्पन्न; 'या' भाजेपाल्याची कधीही करा लागवड
Cultivation Of Agriculture: शेतकरी मित्रांनो 'या' शेतीची करा लागवड; वर्षाला ८ ते १० लाखांचा होतोय नफा
Published on: 04 August 2022, 01:47 IST