शेती क्षेत्रात दिवसेंदिवस मोठा अमूलाग्र बदल नमूद केला जात आहे. शेतकरी बांधव आता पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देत नगदी पिकांची लागवड करीत आहेत. नगदी पिकांची लागवड शेतकरी बांधवांना मोठा नफा कमवून देत असल्याने शेतकरी बांधव आता नगदी पिकांच्या लागवडीकडे वळले आहेत. पारंपरिक पिकांपेक्षा नगदी पिकांच्या लागवडीतून चांगला मोठा नफा मिळत असल्याने याची लागवड मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे.
अल्प कालावधीत नगदी पीक तयार होत असल्याने या पिकाच्या लागवडीतून अल्प कालावधीत मोठा नफा कमावला जाऊ शकतो. आज आपण नगदी पिकांपैकी एक काकडीच्या लागवडीविषयी जाणून घेणार आहोत, काकडीची लागवड करून अल्प कालावधीतच उत्पादन घेतले जाऊ शकते त्यामुळे शेतकरी बांधव या पिकाच्या लागवडीकडे वळले आहेत. आज आपण काकडी पिकाच्या लागवडी विषयी काही महत्त्वपूर्ण बाबी जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणुन घेऊ याविषयी सविस्तर.
महत्वाच्या बातम्या
Successful Farmer : सिव्हिल इंजिनिअरिंग केल्यानंतर सुरु केला पशुपालन व्यवसाय; आता करतोय जंगी कमाई
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, काकडी पिकाची लागवड केल्यानंतर केवळ 80 दिवसात यापासून उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. तसं बघायला गेलं तर काकडी पिकाची लागवड उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात केली जाते, मात्र अलीकडे पावसाळ्यात देखील या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड बघायला मिळत आहे.
काकडीची लागवड जवळपास सर्व प्रकारच्या जमिनीत करता येणे शक्य आहे. काकडीची लागवड अशा जमिनीत केली जाऊ शकते ज्या जमिनीचा पीएच 5.5 ते 6.8 या दरम्यान असते. काकडीची लागवड नदीकिनारी असलेल्या जमिनीत केल्यास त्यापासून अधिक उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते.
काकडीची लागवड करून लाखो रुपयांचा नफा कमावला जाऊ शकतो याचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे ते उत्तर प्रदेश राज्यातून. उत्तर प्रदेश राज्यातील दुर्गा प्रसाद यांनी काकडी लागवड करून केवळ चार महिन्यात आठ लाख रुपयांचे घसघशीत उत्पन्न प्राप्त केले आहे. या शेतकऱ्याने नेदरलँडच्या काकडीची लागवड केली होती, दुर्गाप्रसाद यांच्या मते उत्तर प्रदेश मध्ये नेदरलँड जातीच्या काकडीची लागवड करणारे ते पहिलेच शेतकरी आहेत.
या जातीच्या काकडी ची विशेषता म्हणजे या जातीच्या काकडीमध्ये बिया नसतात त्यामुळे या जातीच्या काकडीची मागणी ही सामान्य काकडी पेक्षा अधिक असते. या जातीच्या काकडीची सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या जातीच्या काकडीला इतर जातींच्या काकडी पेक्षा अधिक भाव असतो. सामान्य काकडी 20 रुपये किलो प्रमाणे विकली जाते मात्र नेदरलँड जातीची काकडी ही जवळपास 45 रुपये किलोप्रमाणे विकली जाते. त्यामुळे या जातीची लागवड शेतकरी बांधवांना विशेष लाभप्रद सिद्ध होत आहे.
Published on: 30 April 2022, 11:04 IST