सध्या फळबागांमध्ये विविध रोग आणि किडींचा प्रादुर्भाव (Insect infestation) मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. पिकांचे योग्य व्यवस्थापन व किडींचे नियंत्रण कसे केले पाहिजे? याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया.
फलबागेचे व्यवस्थापन व किडीचे नियंत्रण
केळी
केळी बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करा. नविन लागवड (Cultivation) केलेल्या केळी बागेत 13:00:45 200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. शेतकरी मित्रांनो फवारणी करताना पावसाचा अंदाज घेऊन करा.
द्राक्ष :
द्राक्ष बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करा. द्राक्ष बागेत करपा आणि डाउनी मिल्ड्यू च्या नियंत्रणासाठी थायोफेनेट मिथाईल 1 ग्रॅम + मॅन्कोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे पावसाची उघाड बघून फवारणी करा.
महत्वाचे म्हणजे द्राक्ष बागेत जिवाणूजन्य करपा नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
हे ही वाचा
Horoscope: 'या' राशीच्या लोकांसाठी आज धनलाभाचा योग; जाणून घ्या...
सिताफळ
सिताफळ बागेत पिठया ढेकून किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास निंबोळी तेल 50 मिली किंवा व्हर्टिसीलीयम लॅकेनी (Verticillium laccanii) जैविक बुरशी 40 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारा. फवारणी करताना पावसाचा अंदाज घेणे गरजेचे आहे, अन्यथा मेहनत वाया जाईल.
भाजीपाला
भाजीपाला पिकात आंतरमशागतीची व्यवस्थित करणे गरजेचे आहे. तण नियंत्रणाकडे विशेष लक्ष द्या. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा.
फुलशेती
फुल पिकात आंतरमशागतीची व्यवस्थित कामे करून तण नियंत्रण करा. चांगले उत्पन्न मिळेल.
महत्वाच्या बातम्या
Animal Husbandry: पशुपालकांनो सावधान! जनावरांना होतेय विषबाधा; 'या' वनस्पतीपासून ठेवा लांब, जाणून घ्या
Rain Condition: मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यातील पाऊस खरीप पिकांसाठी फायद्याचा ठरेल का? जाणून घ्या
50 Thousand: शेतीमध्ये चांगले उत्पादन घ्या आणि 50 हजार रुपये जिंका; जाणून घ्या पिकस्पर्धा योजनेबद्दल
Published on: 03 August 2022, 03:42 IST