Agripedia

सध्या सगळीकडे पाऊस चालू आहे. त्या पावसाचा परिणाम हा कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात होतो. कपाशी पिकाचे पाते गळ होणे, बोंडे सडणे, कपाशी पिवळी होणे इत्यादी समस्या कपाशी पिकावर निर्माण होतात. त्यातील पाते गळ ही समस्या फारच महत्त्वपूर्ण आहे.

Updated on 24 February, 2021 4:07 PM IST


सध्या सगळीकडे पाऊस चालू आहे. त्या पावसाचा परिणाम हा कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात होतो. कपाशी पिकाचे पाते गळ होणे, बोंडे सडणे, कपाशी पिवळी होणे इत्यादी समस्या कपाशी पिकावर निर्माण होतात.  त्यातील पाते गळ ही समस्या फारच महत्त्वपूर्ण आहे.  कारण पात यांवरच कपाशीचे उत्पादन हे अवलंबून असते.  जर जास्तीची पाते गळ झाली तर कापसाच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. कपाशी वाढीच्या कालावधीमध्ये पात्यांची आणि बोंडांची संख्या जास्त झाल्यास जमिनीतून उपलब्ध अन्नसाठा मिळविण्यासाठी दोन झाडांमध्ये स्पर्धा निर्माण होते. त्याचा परिणाम असा होतो की अन्नद्रव्याचा पुरवठा न झाल्यामुळे बहुतेक पाते व बोंडांची गळ होते.

कपाशी पिकाच्या बोंडावर हवामानाचे घटक, किडींचा प्रादुर्भाव व झाडातील क्रिया इत्यादी घटकांचा परिणाम जास्त होते. हवामान, तापमानातील चढ-उतार, कमी दिवसात पाऊस होणे किंवा पावसाचा जास्त खंड पडणे इत्यादी बहुसंख्य कारणांमुळे झाडामध्ये तयार होणारे अन्नघटकांचे पात्या, फुले व बोंडे या भागांकडे अन्नघटकांचे हवे तेवढ्या प्रमाणात वहन होऊ शकत नाही व परिणामी पात्यांची व बोंडांची गळ होते. वाढणाऱ्या तापमानामुळे किंवा उमलणार्‍या फुलांवर पाऊस पडल्यामुळे परागसिंचन आवश्यक त्या प्रमाणात होत नाही. तसेच कपाशीच्या फुलांवरील किडी इत्यादीमुळे पाते गळ मोठ्या प्रमाणात होते. उशिरा लागवड झालेल्या पिकांमध्ये पाते आणि बोंडे गळण्याचे प्रमाण अधिक असते.  अजून बरीचशी कारणे पातेगळ होण्यासाठी कारणीभूत असतात.

हेही वाचा  : कपाशी पिकावरील एकात्मिक कीड व्यवस्थापन; जाणून घ्या ! किडींची सर्व माहिती

कपाशीचे व्यवस्थापन 

 कपाशी लागवड करताना जमिनीत पाणी साचणार नाही जमीन ही पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी.  फुले लागण्याच्या कालावधीमध्ये अधिक तापमान, ढगाळ हवामान किंवा पावसाचा खंड येणार नाही अशाप्रमाणे लागवड करणे आवश्‍यक असते. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनात द्वारे आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा आणि महत्वाचे म्हणजे फवारणीद्वारे विद्राव्य खतांचा योग्यवेळी वापर करावा.  कपाशीतील शरीरक्रियात्मक कारणांमुळे होणाऱ्या पातेगळसाठी २० पीपीएम नॅप्थ्यालीन  ऍसिटिक ऍसिडची फवारणी करणे कधीही चांगले. जेव्हा कपाशी पिकाचा पाते लागण्याचा व फुले लागण्याचा कालावधी असतो तेव्हा दोन टक्के डीएपी २०० ग्रॅम प्रति १० लिटर खताची एक-दोनवेळा फवारणी करावी.  

एन ए ए आणि डीएपीची फवारणी शक्‍यतो सकाळी करावी. नत्रयुक्त खते व संप्रेरकांचा वापर जास्त प्रमाणात केला तर काही वाढ होऊ शकते. अशा वेळीसुद्धा फुलांची गळ होते. कयिक वाढ रोखण्यासाठी वाढ रोधकांचा फवारणीद्वारे पाते लागताना वापर करावा.  फवारणीद्वारे वॉटर सोलबल खतांचा पुरवठा केल्यास पाते बोंडे लागण्याच्या अवस्थेमध्ये डीएपी किंवा युरिया खताचे २%  २०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी, यामुळेही पातेगळ आणि बोंड होऊ शकत नाही.पातेगळ आणि बोंड गळ थांबविण्यासाठी वरीलप्रमाणे उपाय केले तर निश्चितच आपण होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून बचाव करू शकतो.


English Summary: Cotton Leaf fall, know the Reasons
Published on: 25 September 2020, 06:53 IST