Agripedia

आम्हा सर्वांच्या ओळखीची म्हणजेच मसाल्यांची राणी 'वेलची' हे तर प्रत्येक घरात असतेच. पदार्थाची चव आणि सुगंध वाढविण्याकरिता याचा वापर केला जातो. बिर्याणी असो किंवा पुलाव तसेच गोड पदार्थांमध्ये याचा वापर होतो. पण वेलचीचे गुणधर्म एवढ्यावरच थांबते का ? तर नाही

Updated on 28 April, 2022 7:13 PM IST

आपल्या स्वयंपाकघरातील पदार्थ स्वादिष्ट व्हावेत यासाठी वेगवेगळे मसाले आपण वापरत असतो. त्याच्या असणाऱ्या गुणधर्मानुसार या मसाल्यांचा  वापर केला जातो. त्यातल्या त्यात तुम्हा आम्हा सर्वांच्या ओळखीची म्हणजेच मसाल्यांची राणी 'वेलची' हे तर प्रत्येक घरात असतेच. पदार्थाची चव आणि सुगंध वाढविण्याकरिता याचा वापर केला जातो. बिर्याणी असो किंवा पुलाव तसेच गोड पदार्थांमध्ये याचा वापर होतो. पण वेलचीचे गुणधर्म एवढ्यावरच थांबते का ? तर नाही

अगदी चिमूटभर वापरली जाणारी वेलचीची पूड ही अनेक गुणांनीयुक्त अशी औषधी वनस्पती आहे. आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत वेलचीचे बहुगुणी फायदे. या बहुगुणी इलायचीला  भारतात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. जसं की वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असंही म्हटलं जातं. सुगंधाचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेलचीमध्ये लोह, जीवनसत्व ब गटातील एक महत्वाचा भाग, व्हिटॅमिन सी असे शरीराला आवश्यक असणारे उपयुक्त घटक आहेत. तसेच लाल पेशी वाढवण्यासाठी वेलची गुणकारी आहे.

हिवाळ्यात चहामध्ये वेलचीचा वापर केल्यास कफ आणि खोकल्याच्या आजारांपासून आपल्याला दूर ठेवण्यास वेलची मदत करते. जर कफ झाला असेल तर वेलची पाण्यात टाकून उकळून घ्यावी आणि सेवन करावं असं केल्यास कफ नियंत्रणात येतो. पित्तापासून बरेच जण ग्रस्त झालेले असतात. अशावेळी वेलची उत्तम पर्याय आहे. पित्त झाल्यास वेलची तोंडात ठेवावी. वेलचीत अॅन्टी बॅक्टिरियल गुणधर्म असल्यामुळे वेलचीचा माऊथ फ्रेशनर म्हणून देखील वापर होतो. 

शिवाय पोटातील गॅस ची समस्या दूर करण्यासाठी,अन्न पचण्यासाठी वेलची उपयुक्त आहे. अॅसिडीटीवर नियंत्रण आणायचे असेल तर वेलची फायदेशीर आहे. त्यासाठी वेलची चावून चावून खावे. चावल्याने त्यातील तेल बाहेर पडते व लाळेतील ग्रंथीत मिसळते. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.

वेलचीत सिस्टोलिक आणि डायस्टोलिक कमी करण्याची क्षमता असते. त्यामुळे रक्तदाब व्यवस्थित राहतो. वेलचीमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येते. तसेच पोटावरची चरबी कमी व्हायलासुद्धा मदत करते.  एवढंच नाही तर वेलचीची शेती सुद्धा शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळवून देणारी आहे. छोट्या दिसणाऱ्या या वेलचित पण बरेच फायदे आहेत.

महत्वाच्या बातम्या;
लाजाळूचे हे गुणधर्म तुम्हाला माहित आहेत काय?
Goat Rearing : प्रशिक्षण घेऊन शेळीपालन करण्यास सुरवात करा निश्चित होणार फायदा; वाचा कुठं घेणार प्रशिक्षण 
शेतकऱ्यांवर संकटाची मालिका कायम!! टरबूज पिकाला कवडीमोल दर मिळतं असल्यामुळे उत्पादक शेतकरी चिंतेत

English Summary: Cardamom is beneficial for health
Published on: 27 April 2022, 03:31 IST