दरवर्षाप्रमाने यावर्षीही राष्ट्रीय स्तरावरील “अॅग्रो आयडॉल पुरस्कार वितरण सोहळा २०२२” आयोजित करण्यात येत आहे.कृषी विषयक व संलग्न कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक, कृषी विस्तारक व कृषी संशोधन, कृषी व्यवसाय, कृषी क्षेत्रातील कार्य करणारे मान्यंवरांचा गौरव करण्याचा मानस गेल्या १५ वर्षापासून अॅग्रोकेअर कृषीमंचचा असतो. महाराष्ट्रातील अनेक प्राध्यापक, कृषी विचारवंत, संशोधक, कृषीवेत्ता हे शिक्षणासोबतच अनेक कृषी विस्ताराचे, संशोधनाचे कार्य करीत असतात, तसेच उद्याचा कृषीप्रधान
देशाचे तरूण घडवत असतात. तसेच कृषी क्षेत्रात अनेक व्यक्ति नवनवीन व्यवसाय सुरू करून उत्तुंग भरारी घेतात,Also, in the field of agriculture, many individuals are making great strides by starting new businesses. या कार्याची दखल घेता अश्या मान्यवरांचा उचीत मान सन्मान व्हावा
नोव्हेंबर तिसरा आठवडा कापूस आणि सोयाबीन भाव बद्दल अपडेट
या उदात्त हेतुने कृषी संशोधन, कृषी विस्तार व कृषी व्यवसायमध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे, असे सर्वच मान्यवर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठा व सन्मानाचा विशेष “अॅग्रोकेअर आयडॉल पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.प्रस्ताव कोण पाठवू शकतो : कृषी विस्तारक,
संशोधक, कृषी प्राध्यापक, कृषी महाविद्यालये, कृषि विज्ञान केंद्र, कृषि संस्था शेतकरी, कृषी उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपनी, महिला / शेतकरी बचत गट, कृषी क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ति इ. राज्यातील कृषी व संलग्न विषयात काम करणारे वरीलपैकी कोणीही व्यक्ति स्वतःचा किंवा परिचिताचा प्रस्ताव पाठवू शकतात.असे पाठवा प्रस्ताव : प्रस्तावामध्ये संबंधिताचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, छायाचित्र, कार्याची माहिती व उल्लेखनीय कार्य ज्यातून समाजाला कृषी क्षेत्राला
झालेला फायदा, याआधी मिळालेल्या पुरस्कारांचीही माहितीही द्यावी. प्रस्तावावर तो कोणत्या पुरस्कारासाठी आहे, याचा स्पष्ट उल्लेख करावा. तज्ज्ञांच्या निवड समितीमार्फत पुरस्कारार्थींची निवड करण्यात येईल. हा निर्णय अंतिम आणि सर्वांसाठी बंधनकारक असेल. पुरस्काराचे स्वरूप - सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मेडल, विविध वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक मेडिया द्वारे प्रसिद्धी,आमच्या कृषि मासिकांमध्ये यशोगाथा,
आमच्या यू ट्यूब चॅनेल द्वारे आपली मुलाखत प्रसिद्धी, प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान प्रस्ताव पाठविण्याची अंतिम मुदत दि. १७ - ११ -२०२२पुरस्कार वितरण दिनांक - ०५ डिसेंबर २०२२ (जागतिक मृदा दिन)प्रस्ताव पाठवण्याचा पत्ताईमेल – agroidolawards@gmail.comअर्ज करण्याचे व अधिक महितीसाठीचे ठिकाणhttps://krushibhushan.com/landing/event Or https://krushibhushan.com
अधिक माहितीसाठी संपर्क : ७२४९३९८८२६ \ ९६२३९१०५६०
Published on: 14 November 2022, 08:00 IST