Agripedia

कपाशी पिकाचे महाराष्ट्रमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. हे पीक खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक असून नगदी पीक म्हणून या पिकाची ओळख आहे. कपाशीचे उत्पादन वाढीसाठी शेतकरी विविध प्रकारचे पर्याय योजतात. यामध्ये विविध प्रकारच्या खतांचा वापर तसेच विद्राव्य खते इत्यादींचा वापर शेतकरी करतात.

Updated on 26 September, 2022 1:42 PM IST

कपाशी पिकाचे महाराष्ट्रमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. हे पीक खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक असून नगदी पीक म्हणून या पिकाची ओळख आहे. कपाशीचे उत्पादन वाढीसाठी शेतकरी विविध प्रकारचे पर्याय योजतात. यामध्ये विविध प्रकारच्या खतांचा वापर तसेच विद्राव्य खते इत्यादींचा वापर शेतकरी करतात.

परंतु यामध्ये स्टीमुलंटचा वापर हा पिकास उत्तेजक प्रेरक म्हणून केला जातो. याच्या वापरामुळे कपाशी पिकामध्ये फुल व पात्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होते. तसेच कपाशीच्या झाडाची वाढ देखील सर्वांगीण होते बोंडांचा आकार देखील वाढतो.

नक्की वाचा:कापूस दरवाढ रोखण्याचा दबाव केंद्राने झुगारला, असा राहील शेतकऱ्यांच्या कापसाला दर

स्टीमुलंटचा वापर करण्याआधी घ्यायची काळजी

 याचा वापर करताना जमिनीमध्ये पुरेसा ओलावा व अन्नद्रव्य असणे गरजेचे आहे.  जमिनीमध्ये ओलाव्याचे प्रमाण कमी असेल किंवा खतांचा वापर मोजकाच असेल तर स्टीमुलंटचा वापर करणे टाळावे.

यामध्ये कपाशीसाठी उडान,भरारी किंवा फाईट आणि एलीगझर यापैकी एक स्टीमुलंट कपाशीला पाते लागलेले असतील तेव्हा फवारणी करावी व त्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी दुसरी फवारणी घेतल्यास उत्पादनामध्ये खूप चांगल्या पद्धतीने वाढते.

एवढेच नाही तर कपाशी व्यतिरिक्त सोयाबीन, तूर आणि हरभरा पिकात देखील फुलोरा अवस्थेत याचा वापर केल्यास फायदा मिळतो.

नक्की वाचा:शेतकरी मित्रांनो तंत्रशुध्द पध्दतीने ज्वारीची लागवड करा; मिळेल अधिक उत्पन्न

बायोस्टीमुलंटचे  वेगवेगळे प्रकार व कार्य तसेच प्रमाण आहे. बरेच शेतकरी फवारणी केल्यानंतर पिक हिरवे झाले म्हणजे समाधानी होतात. परंतु यामध्ये  अशा पद्धतीची महागडी उत्पादने फक्त हिरवेपणा वाढवण्यासाठी फायदा नाही. स्टीमुलंट मुळे झाडाचा हिरवेगार पणा वाढतोच परंतु पाते व फुलांचे संख्येत देखील चांगल्या पद्धतीने वाढ होते. 

एवढेच नाही तर पाने आणि बोंडांचा आकार देखील वाढतो व पिकांची सर्वांगीण वाढ होते. परंतु याचे प्रमाण देखील माहीत असते तेवढेच गरजेचे असून काही बायोस्टीमुलंट दहा लिटर पाण्यासाठी फक्त अडीच मिली किंवा काही दहा लिटर पाण्यासाठी सात ते दहा मिली वापरण्याची शिफारस आहे.

( टीप- बायोस्टीमुलंट व्यवस्थित व खात्री असलेल्या दुकानावरून तज्ञांचा सल्ला घेऊन खरेदी करावे.)

नक्की वाचा:ठिबक वरील वांग्याची शेती आणि भरघोस उत्पन्न वाचा फायद्याची यशोगाथा

English Summary: bio stimulent is so benificial for cotton crop growth and more production
Published on: 26 September 2022, 01:42 IST