Agripedia

शेतकऱ्यांना शेततळे वरदान ठरत आहे. आता याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. आता ही योजना बंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून याबाबत काहीही प्रक्रिया होत नव्हती. यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Updated on 09 April, 2022 10:54 AM IST

गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना शेततळे वरदान ठरत आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेततळे बांधून मोठ्या प्रमाणावर शेतामध्ये उत्पादन घेतले. यामुळे अनेक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले. असे असताना आता याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. आता ही योजना बंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून याबाबत काहीही प्रक्रिया होत नव्हती. यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आता याआधी ज्यांना मंजुरी मिळाली त्यांच्या अनुदानाचे काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काही ठिकाणी मंजुरी मिळालेल्या शेततळ्यांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. भाजप-सेना युती काळात ही योजना लोकप्रिय ठरली होती. अनेक शेतकऱ्यांनी याचा लाभ देखील घेतला होता.

मागेल त्याला शेततळे योजनेचे प्रस्ताव असले तरी, शासनाने मंजुरीअगोदरच योजना बंद केली आहे. सन 2015 साली युती सरकारच्या काळात ही योजना सुरु करण्यात आली होती. कृषी विभागाकडे कागदपत्रांची पूर्तता करुन या योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांनी घेतला. शेततळे ही काळाची गरज झाल्याने कृषी विभागकडे लाखोच्या संख्येने अर्ज दाखल होत होते तर मंजुरी मात्र शेकडोत होती. अनेकांनी संधीचे सोन केलं.

दरवर्षी अर्ज करणाऱ्यांची संख्या ही वाढत गेली होती. आता अर्जाची संख्या अधिक आणि निधीची तरतूदच नाही अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने थेट योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता नवीन शेततळ्यांसाठी अर्जही करता येणार नाही. यामुळे आता मिळणारे अनुदान बंद होऊन सगळा खर्च हाशेतकऱ्यांना करावा लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या;
बातमी कामाची! आता शेतकऱ्यांना मिळणार भाडेतत्वावर जमिनी, जाणून घ्या सरकारची योजना
'मुख्यमंत्री साहेब तुम्ही कधी कोणावर प्रेम केलंय का?'
शेतकऱ्यांनो कशाला मोठी पीक घेता, उन्हाळ्यात लावा साधी काकडी, कमी दिवसात लाखो कमवा..

English Summary: Big decision on farm scheme for him, big shock to farmers
Published on: 09 April 2022, 10:53 IST