शेतकरी आता नवनवीन पिके घेण्याकडे वळू लागले असून असे बरेच शेतकरी आहेत की त्यांच्याकडे शेतीचे क्षेत्र खूप जास्त प्रमाणात असते व ते शेती कसताना पूर्ण न कसता बाकीची पडीक पडलेली असते. अशा जमिनीवर बांबूची लागवड शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे ठरते. दुसरे शेताच्या बांधाच्या कडेला बरेच शेतकरी बांबूची लागवड करतात.
परंतु जर आपण विचार केला तर दीर्घकालीन आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणून बांबूची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. या लेखात आपण बांबू लागवड कशा रीतीने शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरते ते पाहू.
बांबूपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचे स्वरूप
1- बांबूचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हवामान सर्वसामान्य राहिले तर एक बांबू साधारणतः दुसऱ्या वर्षापासून एक किंवा दोन कोंब सोडतो व त्यांचे रूपांतर पुढे बांबूत होते. एकदा की बांबू निघायला लागला कि त्यामध्ये कुठलाही प्रकारचा खंड न पडता शेतकऱ्यांना उत्पादन मिळत राहते.
जर तुमच्याकडे पाण्याची सोय असेल व तुम्ही ओलिताखालील बांबूची लागवड केली तर तुम्हाला दरवर्षी कोरडवाहू क्षेत्रापेक्षा दीडपट अधिक उत्पादन देण्याची क्षमता बांबू मध्ये आहे.
2- दुसरे बांबू पासून मिळणारे आर्थिक उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत म्हणजे जर तुम्ही बांबू लागवड केली तर त्यामध्ये तुम्ही शेवगा अथवा कढीपत्ता सारखे आंतरपिके देखील घेऊ शकतात.
जर तुम्ही पशुपालन व्यवसाय करत असाल तर त्यामध्ये चाऱ्याची पिके देखील तुम्हाला घेता येऊ शकतात. यामुळे जमीन कायम झाकलेले राहते व मोकळ्या जागेमुळे होणारे पाण्याचे बाष्पीभवन टळते.
3- समजा तुम्हाला बांबू लागवड करायचे आहे परंतु त्यामध्ये तुम्हाला कायम मिश्र पिकांची लागवड करण्याची तुमची योजना आहे तर बांबूची लागवड करताना तुम्ही ती पाच मीटर बाय दोन मीटर अंतरावर करणे गरजेचे आहे.
मिश्र पिकांची लागवड करताना बांबू तोडणी पूर्वीच अशा पिकांची काढणी करता येईल, त्या पद्धतीने पिकांची लागवड करणे गरजेचे आहे.
बांबूचे महत्त्वाची वैशिष्ट्ये
बांबू पिकासाठी खूप कमी श्रमाची गरज असते परंतु इतर पिकाला पर्याय म्हणून याकडे कधीच बघू नये.कारण दुष्काळ जरी पडला तरी तुम्हाला हमखास उत्पन्न देणारे हे पीक आहे.
बांबूचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे समजा जर पाऊस पडला नाही तर बांबू हा सुप्तावस्थेत चालला जातो व पाऊस पडला की पुन्हा त्याची वाढ व्हायला सुरुवात होते.त्यामुळे बांबू जळण्याची भीती राहत नाही.
तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण बांबू तोडतो तेव्हा त्याचे वरचे निमुळते शेंडे जर वेगळे कापले तर त्यांना वेगळा भाव मिळतो व सारख्या जाडीच्या बांबूला वेगळा दर मिळतो.
कारखान्यांमध्ये होतो बांबूचा वापर
कोणत्याही कारखान्यांमध्ये किंवा टोपले बनवणारा उद्योग किंवा हस्तकलेचा काहीतरी व्यवसायअसेल तर या ठिकाणी बांबू लागतोच लागतो.बांधकामासाठी आपल्याला माहित आहेच कि वाढलेला बांबू मोठ्या प्रमाणात राहतो.
बांबूची विक्री करणे अगोदर जेव्हा मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये जर बांबू तोडला तर तो विक्रीसाठी पटकन बाजारात किंवा कारखान्यात जाईल याची दक्षता घ्यावी. कारण वाढलेल्या बांबू पेक्षा हिरव्या बांबूला बाजारपेठेत जास्त किंमत मिळते.
नक्की वाचा:Groundnut Crop: भुईमूग पिकावरील किडीचे करा असे नियंत्रण; मिळेल भरघोस उत्पन्न
Published on: 13 August 2022, 02:45 IST