शेतकरी चांगले उत्पन्न कमविण्यासाठी नवनवीन पीक बियानांचा वापर करत असतात. चांगल्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांना बदाम शेती लागवड (Cultivation of agriculture) परवडू शकते. बदाम हे केवळ मानवाच्या आरोग्यापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे साधन बनू लागले आहे.
पूर्वी बदामाची लागवड (Almond Cultivation) फक्त जम्मू आणि काश्मीर आणि हिमाचल प्रदेश येथे केली जात होती, परंतु आता शेतीच्या (Farming) आधुनिकीकरणामुळे आणि सुधारित वाणांमुळे, बदामाची लागवड भारतात सर्वत्र केली जाऊ लागली आहे.
आपल्या राज्यात देखील अनेक शेतकरी (Farmer) बदाम लागवड करतात. काही शेतकरी व्यावसायिक स्तरावर बदामाची शेती (Commercial Almond Farming) करत आहेत आणि चांगले उत्पन्न देखील मिळत आहेत. बदामाच्या सुधारित जातीविषयी जाणून घेऊया.
हे ही वाचा
Fertilizers: शेतकरी मित्रांनो पिकांना खत देताना 'या' गोष्टींकडे लक्ष द्या; होईल फायदाच फायदा
बदामाच्या काही प्रगत जाती
नॉन-पॅरील, कॅलिफोर्निया पेपर शेल, मर्सिड, IXL,शालिमार, मखदूम, वारिस, प्रनायाज, प्लस अल्ट्रा, प्रिमोर्स्की, पीअरलेस, कार्मेल, थॉम्पसन, प्राइस, बट्टे, मॉन्टेरे, रुबी, फ्रिट्झ, सोनोरा इत्यादींचा समावेश आहे. बाजारात बदामांच्या या जातीची मोठी मागणी असते.
कृषी तज्ञांच्या मते, बदाम एकदा लागवड केल्यास तब्बल पन्नास वर्षे उत्पादन देण्यास सक्षम असतो. निश्चितच बदामाची शेती शेतकरी बांधवांना पन्नास वर्षे शाश्वत उत्पन्न देणारे साधन बनू शकते.
महत्वाच्या बातम्या
Lumpy Skin Disease: काय सांगता! 20 जिल्ह्यांमध्ये 'हा' विषाणू पसरला; 1 हजार 400 हून अधिक गुरे मरण पावली
Eknath Shinde: एक जिल्हा एक उत्पादनासाठी नियोजन सुरू; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश, जाणून घ्या
Money Transfer: चुकून दुसरीकडे पैसे ट्रान्सफर झाले तर त्वरित करा 'ही' प्रोसेस; पैसे जमा होतील खात्यात
Published on: 02 August 2022, 05:17 IST