शेतकरी आपल्या शेतीमध्ये (agriculture) नवनवीन प्रयोग करून चांगले उत्पादन घेत असतात. मात्र आता शेतीबाबत एक आगळीवेगळी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आयआयटी कानपूर याच्या इनक्यूबेटेड कंपनी एलसीबी फर्टिलायझरने गव्हाचे नॅनो कोटेड पार्टिकल बियाणे तयार केले आहे.
याचा शेतीमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. कारण या बियानांच्या (seed) पेरणीनंतर तब्बल 35 दिवस पाणी लागणार आहे. विशेष म्हणजे कडक उन्हातही पीक खराब होणार नाही असे संशोधकांचे म्हणणे आहे. एलसीबी कंपनीने नुकताच या गव्हाच्या बियाण्यांवर प्रयोग केला असून, तो यशस्वी झाला आहे.
त्यामुळे यंदा उत्तर प्रदेश राज्यातील तब्बल 35 जिल्ह्यांमध्ये या बियाणाची पेरणी प्रयोग होणार आहेत. हे फील्ड प्रयोग यशस्वी होणार असल्याचा दावा संस्थेचा आहे. यात गव्हाच्या (wheat) बियाण्यावर नॅनो कण आणि सुपर शोषक पॉलिमरचा लेप लावला आहे.
वजन आणि पोटाची चरबी कमी करा 'या' महत्वाच्या टिप्सने; जाणून घ्या सविस्तर
कंपनीचे इनक्यूबेटर तज्ञ अक्षय श्रीवास्तव यांनी याबाबत सांगितले की, गव्हावरील हा पॉलिमर लेप 268 पट जास्त पाणी शोषून घेतो. परिणामी 35 दिवसांपर्यंत या पाण्याचा उपयोग करून पिकाची जोमदार वाढ होईल.
या 'पाच' राशीच्या लोकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य
याव्यतिरिक्त याला जिवंत जीवाणूंचे संयोजनदेखील दिलेले आहे. यामुळे कंपोस्ट (fertilizer) खत तयार होऊन पुन्हा-पुन्हा पिकाला खत देण्याची गरज भासणार नाही. या बियाण्यांचा (seed) वापर केल्यास उत्पादनात 15 टक्के वाढ होईल. तसेच 33 टक्के कमी सिंचन पाणी आणि खर्चात तब्बल 48 टक्के बचत होते.
महत्वाच्या बातम्या
ऐन दिवाळीत सर्वसामान्यांना महागाईचा फटका; भाज्यांचे दर तेजीत, जाणून घ्या किमती
सणासुदीनंतर बाजारात खळबळ; 10 ग्रॅम सोन्या-चांदीचा भाव किती बदलला? जाणून घ्या
‘या’ तारखेनंतर राज्यात धो-धो पाऊस कोसळणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
Published on: 26 October 2022, 02:48 IST