Agripedia

शेतकरी नवनवीन पिके घेऊन चांगले उत्पादन घेत असतात. परंतु तण काढणी असो किंवा किटकफवारणी या कामासाठी लागणारी मंजूरी शेतकऱ्यांना न परवडणारी असते. तसेच वेळेत मंजूर न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील होते.

Updated on 09 August, 2022 5:13 PM IST

शेतकरी नवनवीन पिके घेऊन चांगले उत्पादन घेत असतात. परंतु तण काढणी असो किंवा किटकफवारणी (Insect spraying) या कामासाठी लागणारी मंजूरी शेतकऱ्यांना न परवडणारी असते. तसेच वेळेत मंजूर न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील होते.

यापार्श्‍वभूमीवर शेतकर्‍यांचे मजूरांवरील अवलंबत्व कमी करण्यासाठी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल इंजिनीअरिंग (Central Institute of Agricultural Engineering) भोपाळने' ई-प्राइम मूव्हर मशिन' तयार केले आहे. जे शेतकर्‍यांच्या समस्या बऱ्याच कमी होतात.

Cultivation Walnuts: अक्रोडची लागवड अशा प्रकारे केल्यास मिळेल दुप्पट उत्पन्न; जाणून घ्या सविस्तर

या यंत्राच्या सहाय्याने शेतकरी (farmers) शेतात तण काढण्यापासून ते कीटकनाशक फवारणीपर्यंतची कामे अगदी सहजतेने करू शकतील आणि त्यांचे मजुरांवरील अवलंबित्वही कमी होईल.

सेच हे उपकरण दोन क्विंटलचा भार सहज उचलू शकते. म्हणजेच शेतातून धान्य वाहून नेण्यात आणि आणण्यात हे यंत्र खूप चांगले काम करेल. या मशिनला चार्ज होण्यासाठी तीन तास लागतात, एक क्विंटल भार वाहून नेता येतो.

या मशिनचे वैशिष्ट्य म्हणजे ते सौरऊर्जेसोबतच बॅटरीवरही चालू शकते. हे डॅशबोर्ड बॅटरी मॉनिटरिंग सिस्टम (Dashboard battery monitoring system), आपत्कालीन स्टॉप स्विच, डिजिटल स्पीड इंडिकेटर, लोड करंट आणि व्होल्टेज मॉनिटरिंग सिस्टम, सेफ्टी स्विच आणि इतर सर्व सुरक्षा उपकरणांनी सुसज्ज आहे.

शेतकऱ्यांनो सर्वात कमी कालावधीचे 'हे' पीक करेल मालामाल; जाणून घ्या लागवडीविषयी

भोपाळच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल इंजिनीअरिंगच्या म्हणण्यानुसार, या मशीनच्या मदतीने दीड एकर क्षेत्रात औषध फवारणीसाठी फक्त एक तास लागेल. त्याचबरोबर हे यंत्र अवघ्या ५ तासात तेवढीच जमीन खुरपणी आणि नांगरणीचे काम करेल.

वीज नसल्यास घरातील दिवे लावण्यासाठी तुम्ही या सौरऊर्जेवर चालणार्‍या मशीनचा वापर करू शकता. सोलर पॅनेलसह (Solar panel) सोलर असिस्टेड ई-प्राइम मूव्हर मशीनची किंमत सुमारे ३.१० लाख रुपये आहे आणि सोलर पॅनेलशिवाय सुमारे १.८० लाख रुपये आहे. ऑपरेटिंग कॉस्ट ५०० रुपये प्रति तास आहे.

महत्वाच्या बातम्या 
बँक खातेधारकांसाठी महत्वाची बातमी; सलग 6 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या कारण
Ration Card Holder: 70 लाख रेशन कार्डधारकांना बसणार मोठा फटका; मोदी सरकारने घेतला 'हा' निर्णय
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! गव्हाच्या किमतीत होणार 'इतकी' वाढ; जाणून घ्या

English Summary: Agricultural Business Jalim solution found weeding field
Published on: 09 August 2022, 05:06 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)