Agripedia

भारतात मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींची शेती केली जाते. शेतकरी बांधव वेगवेगळ्या औषधी वनस्पतींच्या लागवडीतून चांगली बक्कळ कमाई करत असतात. औषधी वनस्पतींची बाजारात मोठी मागणी असल्याने या पिकातून शेतकरी बांधव बारा महिने चांगले उत्पन्न कमवीत असल्याचे बघायला मिळत आहे.

Updated on 23 May, 2022 3:23 PM IST

भारतात मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींची शेती केली जाते. शेतकरी बांधव वेगवेगळ्या औषधी वनस्पतींच्या लागवडीतून चांगली बक्कळ कमाई करत असतात. औषधी वनस्पतींची बाजारात मोठी मागणी असल्याने या पिकातून शेतकरी बांधव बारा महिने चांगले उत्पन्न कमवीत असल्याचे बघायला मिळत आहे.

हीच बाब लक्षात घेता आज आपण लेमन ग्रास या औषधी वनस्पतीच्या शेतीविषयी काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणुन घेऊया याविषयी. शेतकरी मित्रांनो खरं पाहता लेमन ग्रासची लागवड करण्यासाठी उत्पादन खर्च अवघा 20000 येतो मात्र यातून लाखो रुपयांची कमाई केली जाऊ शकते.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, लेमन ग्रास शेती विषयी देशाचे वर्तमान पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनीदेखील आपल्या मन की बात कार्यक्रमात माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मते, शेतकरी बांधव लेमन ग्रास ची लागवड करून आर्थिक सुबत्ता प्राप्त करू शकतात. एवढेच नाही तर यामुळे शेतकरी बांधव देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी देखील योगदान देत आहेत.

Mansoon Update: राज्यात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन; आज पण बरसणार 'या' भागात पाऊस

बाजारात आहे मोठी मागणी 

लेमन ग्रासपासून तयार करण्यात आलेल्या तेलाला बाजारात खुप मोठी मागणी आहे. लेमन ग्रासपासून काढलेले तेल सौंदर्यप्रसाधने, साबण, तेल आणि औषधे बनवणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणात वापरतात. त्यामुळे बाजारात याच्या तेलाला चांगली किंमत मिळत असते. या पिकाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे दुष्काळग्रस्त भागातही याची लागवड करता येते. शेतकरी बांधवांनी जर लेमनग्रासची एक हेक्टर क्षेत्रात लागवड केली तर एका वर्षात त्यांना 4 लाख रुपयांपर्यंत नफा मिळू शकतो.

Business Idea 2022: व्यवसाय सुरु करण्याच्या तयारीत आहात का? मग, कमी गुंतवणूकीत सुरु करा 'हे' व्यवसाय आणि कमवा बक्कळ

खताची गरज नाही

लेमनग्रास या औषधी वनस्पती साठी खताची गरज भासत नाही, तसेच वन्य प्राण्यांकडून याचे पीक नष्ट होण्याची भीती देखील नसते. यामुळे या पिकासाठी उत्पादन खर्च अतिशय नगण्य असतो. शिवाय एकदा पीक पेरले की ते 5-6 वर्षे सतत यापासून उत्पादन मिळत राहते.

लेमन ग्रास कधी लागवड करायचे 

शेतकरी मित्रांनो जर आपणास लेमन ग्रास लागवड करायची असेल तर आपण फेब्रुवारी ते जुलै यादरम्यान या पिकाची लागवड करू शकता. एकदा लागवड केल्यावर सहा ते सात वेळा या पिकाची कापणी केली जाते. कापणी वर्षातून तीन ते चार वेळा केली जाते. लेमन ग्रासपासून तेल काढले जाते. या तेलाची किंमत 1,000 रुपयांपासून 1,500 रुपयांपर्यंत आहे.

कधी संपेल शेतकऱ्यांमागची साडेसाती!! द्राक्ष खरेदी करण्यासाठी व्यापारीच मिळेना; बागायतदार हवालदिल

त्याची पहिली काढणी लेमनग्रास लागवडीनंतर 3 ते 5 महिन्यांनी केली जाते. लेमनग्रास तयार आहे की नाही. हे जाणून घेण्यासाठी तो फोडून त्याचा वास घ्या, जर तुम्हाला लिंबाचा तीव्र वास आला तर समजून घ्या की हे गवत तयार आहे. जमिनीपासून 5 ते 8 इंच वर कापणी करावी. त्याची उत्पादन क्षमता तीन वर्षांपर्यंत चांगली राहते. लेमनग्रासची रोपवाटिका तयार करण्याचा उत्तम काळ म्हणजे मार्च-एप्रिलचा महिना.

किती होणार कमाई 

एक हेक्टरमध्ये लिंबू गवताची लागवड केल्यास सुरुवातीला 20,000 ते 40,000 रुपये खर्च येतो. एकदा पीक लावले की ते वर्षातून 3 ते 4 वेळा काढता येते. लेमन ग्रास हे मेंथा आणि खस सारखे कुस्करले जाते. 3 ते 4 कलमांवर सुमारे 100 ते 150 लिटर तेल निघते. एका हेक्टरमधून वर्षभरात सुमारे 325 लिटर तेल निघणार आहे. तेलाची किंमत 1200-1500 रुपये प्रति लिटर आहे, म्हणजे 4 लाख ते 5 लाख रुपये आरामात कमावता येतात.

भन्नाट ऑफर! मारुती अल्टो पेक्षा कमी किमतीत खरेदी करा एर्टिगा कार; जाणून घ्या 'या' खास ऑफर विषयी

English Summary: 20 thousand rupees spent and millions earned; Lemongrass is the main crop
Published on: 23 May 2022, 03:00 IST