सध्याच्या काळात प्रत्येकाला स्वतःचे काम, व्यवसाय करायचा आहे. परंतु गुंतवणुकीच्या समस्यांमुळे बहुतेक लोक व्यवसाय सुरू करू शकत नाहीत. त्यामुळे बरेच जण लहान-सहान नोकऱ्या करून स्वतःचा उदरनिर्वाह करतात. परंतु छोटी-मोठी नोकरी करत असताना देखील एखादा व्यवसाय उभारायची इच्छा असेल तर या लेखांमध्ये आपण काही व्यवसायांची यादी घेऊन आलो आहोत. ते चक्क शेणाचा वापर करून सुरू करता येतात व मोठा नफा देखील मिळवता येतो.
नक्की वाचा:ऑइल मिल व्यवसाय: अशाप्रकारे तेल व्यवसाय सुरु करा आणि कमवा बक्कळ नफा
आपल्याला माहित आहेच कि सध्या गाईच्या शेणाच्या उत्पादनांना फार मोठी मागणी आहे. बरेच लोक परदेशी उत्पादनापेक्षा स्वदेशी उत्पादनांना अधिक पसंती देत आहेत.
एवढेच नाही तर अशा व्यवसायांसाठी सरकारकडून आर्थिक मदतही केली जात आहे. म्हणून या लेखामध्ये शेनापासून बनवता येणाऱ्या अशा काही व्यवसाय कल्पना पाहणार आहोत, ज्या अतिशय कमी गुंतवणुकीत आणि कमी वेळेत जास्तीत जास्त नफा मिळवून देतील.
शेणापासून सुरू करता येतील अशा व्यवसायाची यादी
1- शेना पासून कागद निर्मितीचा व्यवसाय
2- शेना पासून पुठ्ठा बनवण्याचा व्यवसाय
3- शेना च्या पिशव्या बनवण्याचा व्यवसाय
4- शेणापासून पेन्ट निर्मिती व्यवसाय
5- शेणापासून बनवलेला मास्कचा व्यवसाय
6- शेणाचा विटा बनवण्याचा व्यवसाय
7- शेणापासून सिमेंट बनवण्याचा व्यवसाय
8- शेणापासून बनवलेल्या साबणाचा व्यवसाय
9- गोबर गॅस प्लांट चा व्यवसाय
10- शेणापासून बनवलेल्या डासांच्या कॉइलचा व्यवसाय
11- शेना पासून बनवलेल्या मूर्तीचा व्यवसाय
12- शेणापासून राखेचा व्यवसाय
13- शेणाच्या अगरबत्तीचा व्यवसाय
14- शेणाच्या लाकडाचा व्यवसाय
15- शेणाच्या गोवऱ्या चा व्यवसाय
16- शेणापासून दागिने बनवण्याचा व्यवसाय
17- शेणापासून दिवे बनवण्याचा व्यवसाय
18- शेणखताचा व्यवसाय
19- शेणापासून राखी बनवण्याचा व्यवसाय
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो शेणापासून कागद आणि लाकूड बनवण्याचा व्यवसाय करा सुरु, मिळेल बक्कळ पैसा..
Published on: 21 July 2022, 07:57 IST