Agriculture Processing

आपल्याला माहित आहेस की भाजीपाला आणि फळे हे नाशवंत असल्यामुळे जास्त दिवस टिकत नाहीत. एवढेच काय तर काही विशिष्ट हंगामातच त्या येतात. त्यामुळे एकाच वेळेत बाजारात आवक जास्त वाढली तर त्यांचे दर पडतात शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते.

Updated on 28 April, 2022 1:55 PM IST

 आपल्याला माहित आहेस की भाजीपाला आणि फळे हे नाशवंत असल्यामुळे जास्त दिवस टिकत नाहीत. एवढेच काय तर  काही विशिष्ट हंगामातच त्या येतात. त्यामुळे एकाच वेळेत बाजारात आवक जास्त वाढली तर त्यांचे दर पडतात शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते.

जर साठवणूक करून अशा भाज्यांची आणि फळांचा  पुरवठा वर्षभर बाजारपेठेत करता आला तर? खुपच छान होईल. त्यासाठी अशा फळांची व भाजीपाल्याची हाताळणी आणि टिकवणे या दोन्ही गोष्टींना खूपच महत्त्व आहे. या लेखामध्ये आपण भाजीपाला व फळे जास्त काळ टिकावे त्यासाठी कुठल्या पद्धती आहेत की ज्या जास्त काळ साठवण्यासाठी उपयोगी पडू शकतील, त्याची माहिती घेऊ.

 फळे आणि भाजीपाला जास्त काळ टिकवण्यासाठी उपयोगी पद्धती

1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे फळे व भाज्या तील असलेल्या पाण्याचा अंश कमी करणे महत्त्वाचे असते त्यासाठी फळे व भाजीपाला यांना सूर्यप्रकाशात किंवा वाळवणी यंत्रात वाळवणे फार महत्वाचे असते.

2- फळे व भाज्या मधील जर विद्राव्य घटक आहेत त्यांचे प्रमाण कृत्रिमरीत्या वाढवणे, यासाठी प्रामुख्याने साखरेचा वापर केला जातो. जेली, जाम, मुरांबा इत्यादी पदार्थांमध्ये सुमारे 70 टक्‍क्‍यांपर्यंत एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण ठेवले जाते.

3- तसेच साखर आणि आम्ल यांचा विशिष्ट प्रमाणात योग्य वापर करणे महत्त्वाचे असते. उदाहरणच घ्यायचे झाले तर फळांपासून तयार होणारी पेय, सिरप त्यामध्ये साखरे सोबत योग्य प्रमाणात सायट्रिक आम्ल वापरतात. तर टोमॅटो केचप, आंब्याची चटणी इत्यादीमध्ये व्हिनेगार  वापरतात.

4- जास्त उष्णता देऊन देखील फळे व भाजीपाला टिकवता येतो. उदाहरणच द्यायचं झालं तर  फळांच्या फोडी, रस इत्यादी डब्यात किंवा बाटल्यांमध्ये हवाबंद करून त्या उकळत्या पाण्यात तीस मिनिटे बुडवून ठेवणे. तर काही भाजीपाला शंभर अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाचा म्हणजेच पाण्याच्या वाफेचा उपयोग करून टिकवणे. उदा. मटार हवाबंद करून टिकवणे

5- पोटॅशिअम मेटाबायसल्फाईट तसेच सोडियम बेंजोएट या परीरक्षकांचा फळे व भाजीपाला पदार्थांमध्ये ठराविक प्रमाणात ( फळ पदार्थ नियमावली दिलेल्या प्रमाणानुसार ) काळजीपूर्वक वापर करणे.

6- मिठाचा वापर करून कच्च्या फळांचे किंवा काही फळ पदार्थांचे आयुष्य वाढवता येते. उदा. कच्चा आंब्याच्या फोडी पंधरा ते वीस टक्के मिठाच्या द्रावणात साठवता येतात तसेच कोकम रसात 15 ते 20 टक्के मीठ वापरून तयार होणारा कोकम आगळ हा पदार्थ चांगला टिकून ठेवता येतो.

7- लोणच्यामध्ये मोहरी, इतर मसाल्याचे पदार्थ, मीठ आणि गोड तेल वापरल्याने ते टिकते.

8- तापमान जर अतिशय कमी केले तर फळे व भाज्या जास्त काळ टिकतात. उदा. फ्रीजिंग, डीप फ्रीजिंग आणि क्रायोजनिक फ्रीजिंग या पद्धतीने टिकाऊ फ्रोजन फळे व भाज्या तयार करता येतात.

9- आंबवण्याच्या क्रियांमुळे फळांच्या मूळ घटकात आमूलाग्र बदल होतो. या गोष्टींचा उपयोग फळे आणि भाज्या वेगवेगळ्या स्वरूपात टिकवण्यासाठी होतो.

10- क्ष-किरणे आणि गॅमा किरणे यांचा काळजीपूर्वक ठराविक प्रमाणात उपयोग करून फळे भाज्या तसेच पदार्थ टिकून ठेवता येतात.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Expert Views:कृषीतज्ञांच्या या 'टीप्स'ठरतील पपई लागवडीतून भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी उपयोगी

नक्की वाचा:ऊस उत्पादनवाढीत मेन फॅक्टर आहे गंधक; ठरेल ऊस उत्पादन वाढीतील महत्त्वाचा घटक

नक्की वाचा:दिलासादायक निर्णय! आता दीड लाख शेतकऱ्यांना मिळणार प्री-पेड मीटर

English Summary: this is method is so useful for storage of vegetable and fruit long duration
Published on: 28 April 2022, 01:55 IST