सध्या नोकऱ्यांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात घटल्यामुळे चांगले शिक्षण घेऊन देखील युवकांना वणवण भटकण्याची पाळी आली आहे. त्यामुळे बरेच युवकांच्या मनात एखादा व्यवसाय करण्याचे चाललेले असते. परंतु कोणता व्यवसाय करावा हे डोक्यात येत नाही. त्यासाठी आपण या लेखामध्ये कृषीक्षेत्राशी संबंधित चांगले व्यवसायांची माहिती घेणार आहोत. जे व्यवसाय कमी खर्चा मध्ये चांगला नफा देऊ शकतात.
1- गांडूळ व सेंद्रिय खत उत्पादन- गांडूळ खत व इतर सेंद्रिय खतांचे उत्पादन सध्या परिस्थितीत एक चांगला व्यवसाय असून खूप नाममात्र गुंतवणूक करणे गरजेचे असून यासाठी लागणारी जमिनीची आवश्यकता देखील कमी असते.
या व्यवसायाची जर तुम्ही सखोल माहिती आणि उत्पादन प्रक्रिया तसेच मार्केटिंग इत्यादी व्यवस्थित जाणून घेतले तर तुम्ही हा व्यवसाय खूप चांगल्या रीतीने सुरू करून नफा मिळवू शकतात.
2- कृषी फार्म- तुमच्याकडे शेतीयोग्य जमीन असेल तर तुम्ही खूप वेगवेगळ्या कल्पना च्या माध्यमातून शेती करणे सुरू करू शकतात. या माध्यमातून तुम्ही स्थानिक वस्तू उत्पादित करून त्या स्थानिक बाजारपेठेत विकू शकतात. एवढेच नाही तर अनेक दुर्गम भागांमध्ये देखील तुम्ही मार्केटिंगच्या माध्यमातून अशा उत्पादनांची पूर्तता करू शकतात.
3- सेंद्रिय फार्म ग्रीन हाऊस- सध्या सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असून सेंद्रिय उत्पादनांची मागणी देखील भरपूर प्रमाणात वाढलेली आहे.
यासाठीचा ग्रीनहाऊस व्यवसाय केला तर त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता व यशस्वी होऊन चांगला नफा मिळण्याची शक्यता अधिक आहे. सेंद्रिय शेतीचा ग्रींहाऊस व्यवसाय लहान, अगदी कुटुंब स्तरावर चालवलेल्या शेतात केला जातो. त्यामुळे सेंद्रीय शेतीसाठी गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे.
नक्की वाचा:भावांनो 'या' मशरूमची लागवड करून व्हाल लखपती! बाजारात असते बाराही महिने मागणी
4- पोल्ट्री व्यवसाय- सध्या बाजारपेठेमध्ये चिकनची मागणी खुप असून जगभरात कोंबडीपालन तीन दशकांपासून परसातील ते शेतीच्या स्थितीपासून तंत्र व्यवसाय उद्योगात रूपांतर झाले आहे.
कुक्कुटपालन ची शेती व शेती व्यवसायातील वेगाने विकसित होणारे क्षेत्र आहे.
5- मशरूम फार्मिंग- मशरूम शेती अलीकडे फार वेगाने आणि झपाट्याने प्रगती करीत असून अगदी कमी भांडवल गुंतवून मशरूम शेती आपल्याला कमी वेळात खूप मोठा नफा मिळवून देऊ शकते. अगदी घरात तुम्हाला या व्यवसायाची सुरुवात करता येते यासाठी खूप कमी जागा लागते.
Published on: 30 July 2022, 01:51 IST