सध्या रोजगाराचा मोठा प्रश्न आहे, अनेकांना रोजगार नाही तर अनेक लोकांना खाजगी जॉब करण्यात अजिबात रस नसतो. त्यामुळे स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असते. मात्र कोणता व्यवसाय करावा हा सर्वात मोठा प्रश्न असतो? आज आम्ही तुम्हाला याच प्रश्नाचं उत्तर देणार आहोत. आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यवसायाबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही मोठी कमाई करू शकता.
कोरफडची शेती हा व्यवसाय अगदी सहज करता येणारा आहे, सध्या देशासोबतच विदेशातसुद्धा कोरफडची मागणी वाढली आहे. अलिकडे सौंदर्यप्रसाधने व खाद्यपदार्थंमध्ये मोठ्या प्रमाणत कोरफड वापरण्याचं प्रमाण वाढलं आहे. कोरफड मध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. भारतात मोठ्या प्रमाणात कोरफडची शेती केली जाते. भारतातील अनेक लघुद्योगानंपासून ते मोठ-मोठ्या उद्योग कंपन्या कोरफडच्या उत्पादनांची विक्री करून करोडो रुपयांचा नफा मिळवत आहेत. या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात कोरफडची आवश्यकता असते. तुम्ही त्यांना कोरफड पुरवू शकता.
कोरफडची शेती हा व्यवसाय दोन पद्धतीने करू शकता. एक म्हणजे कोरफडची शेती करू शकता आणि सौंदर्यप्रसाधने बनवणाऱ्या कंपन्यांना पुरवठा करू शकता. आणि दुसरं म्हणजे कोरफडचं ज्यूस काढण्यासाठी किंवा पावडर करण्यासाठी मशीन बसवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही लाखो रुपये मिळकत करू शकता. या व्यवसायामध्ये गुंतवणूक कमी आणि मिळकत जास्त आहे.
कोरफडची शेती सुरु करण्यासाठी तुम्हाला फक्त ५० हजारांची गुंतवणूक करावी लागेल. कोरफड तुम्ही जवळच्या उत्पादन निर्मित करणाऱ्या कंपनीमध्ये किंवा मार्केटमध्ये विक्री करू शकता. त्याचबरोबर व्यवसाय वाढवण्याचा विचार असेल, तर तुम्ही प्रोसेसिंग मशीन बसवून उत्पादन निर्मितीसुद्धा करू शकता.यामध्ये तुम्ही कोरफड प्रोसेसिंग प्लान्ट बसवू शकता. त्यातून कोरफड ज्यूस, जेल, पावडर अशा विविध उत्पादनांची निर्मिती करता येईल व चांगला नफा ही प्राप्त होईल.
यासाठी तुम्हाला ३ ते ५ लाखांची गुंतवणूक आवश्यक असते. कोरफडच्या शेतीमध्ये तुम्हाला साहित्य, प्लान्ट, खाद्य, हार्वेस्टिंग, कामगार, या गोष्टींवर खर्च करावा लागतो. देशात एका वेळी कोरफडची शेती करून, त्यात ३ ते ५वर्षांपर्यंत उत्पादन घेतलं जातं. कोरफडच्या शेतीमध्ये तुम्ही ५० ते ६० हजार गुंतवूण ४ ते ५ लाखांचा नफा मिळवू शकता. त्याचबरोबर कमी पैशांमध्ये कोरफड साबणासारखा दुय्यम व्यवसायही करू शकता. ग्राहक आयुर्वेदिक अशा कोरफडच्या उत्पादनांना मोठी पसंती दर्शवतात त्यामुळे कॉस्मेटिक, मेडिकल इतर वैद्यकीय क्षेत्रात कोरफडचं वापर वाढला आहे.
महत्वाच्या बातम्या
टाटा मोटर्स करणार धमाका! 'या' दिवशी करणार 400 किमी रेंज असलेली स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च..
स्कॉटलंडच्या वैज्ञानिकाचा भारतासाठी गंभीर इशारा! येणाऱ्या महिन्यांमध्ये उष्णतेच्या बाबतीत दिला इशारा
Published on: 30 April 2022, 03:39 IST