Agriculture Processing

महाराष्ट्रासह इतर राज्यातील शेतकरी व पशुपालकांना दुग्धव्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानाची तत्पर माहिती मिळावी व त्या अनुषंगाने आपला पशुपालन व्यवसाय आधुनिक पद्धतीने करता यावा या उद्देशाने धेनू ॲपने हे पाऊल उचलले आहे. धेनू ॲपच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे महाराष्ट्रभरातील शेतकरी व पशुपालकांचा सहभाग वाढत आहे.

Updated on 20 December, 2022 1:43 PM IST

महाराष्ट्रासह इतर राज्यातील शेतकरी व पशुपालकांना दुग्धव्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानाची तत्पर माहिती मिळावी व त्या अनुषंगाने आपला पशुपालन व्यवसाय आधुनिक पद्धतीने करता यावा या उद्देशाने धेनू ॲपने हे पाऊल उचलले आहे. धेनू ॲपच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे महाराष्ट्रभरातील शेतकरी व पशुपालकांचा सहभाग वाढत आहे.

वाढता सहभाग व त्यांना होणारा फायदा लक्षात घेता धेनू ॲपचे हे तंत्र इतर राज्यातील शेतकरी व पशुपालकांना खूप फायदेशी ठरेल या उद्देशाने आधुनिक फीचर्सह विविध भाषांमध्ये धेनू अॅप हे मध्यप्रदेशसह विविध राज्यांमधील शेतकऱ्यांना लवकरच उपलब्ध करून देणार असल्याचे धेनू कंपनीचे व्यवस्थापकीय अधिकारी नितीन पिसाळ यांनी सांगितले.

मध्यप्रदेशातील मुरैना येथे आयोजित तीन दिवसीय कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांसमवेत आयोजित केलेल्या हितगुज कार्यक्रमात ते बोल्ट होते. ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालकांना दुग्धव्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानाची तत्पर माहिती मिळाल्याशिवाय दुग्धव्यवसायाचा सर्वांगीण विकास होणार नाही याच अनुषंगाने ज्ञान, मंच, बाजार,व्यवस्थापन यांसारख्या विविध फीचर्ससह धेनू ॲपची निर्मिती केली गेली आहे.

ड्रोन विकत घेण्यासाठी सरकार 4 लाख रुपये देणार, शेती करणे होणार सोपे

धेनू ॲपची खास वैशिष्ट्ये-
• शेतकरी व पशुपालकांच्या हक्काचे डिजिटल व्यासपीठ
• पशुपालना संबंधित अडचणींच्या निराकरणासाठी- प्रश्न उत्तरे विभाग
• जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी- पशु बाजार विभाग
• जनावरांच्या डिजिटल (नोंदीसाठी) व्यवस्थापनासाठी- पशुव्यवस्थापन विभाग

• ग्राहक ते थेट व्यावसायिक जोडले जाण्यासाठी- बिजनेस सबस्क्रिप्शन विभाग
• तज्ञांचे मार्गदर्शन व पशुपालकांच्या यशोगाथा जाणून घेण्यासाठी- धेनू इंडिया यूट्यूब चैनल
• ताज्या घडामोडींसाठी- धेनू बुलेटीन / वार्ता
• पशुधनाच्या काळजीचा सल्ला- दररोज धेनू पशु सल्ला

'शेतकरी कर्जाच्या ओझ्याने कोलमडला आहे, दररोज तीन आत्महत्या होत आहेत, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा'

दुग्धव्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच प्ले स्टोर वरून धेनू ॲप डाऊनलोड करा आणि आपला दुग्धव्यवसाय दुपटीने वाढवा...
नितीन रा. पिसाळ
प्रकल्प समन्वयक
धेनू टेक सोल्यूशन्स प्रा. लि. पुणे

महत्वाच्या बातम्या;
इकोदीप निर्मिती उद्योगामुळे महिलांना मिळणार रोजगार
आता पुढाऱ्यांना कमी पैशात कारखाने विकत घेता येणार नाही, तोट्यातील कारखाने सरकारच खरेदी करणार, सहकाराचा गाडा नीट चालणार
वन्यप्राण्यांपासून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी केला जुगाड! शेतकरी ठरले शास्त्रज्ञांवर भारी

English Summary: The new step of Dhenu App states including Madhya Pradesh, women are benefiting from lakhs at home...
Published on: 20 December 2022, 12:40 IST