हे युग तंत्रज्ञानाचे आहे असे म्हटले जाते. प्रत्येक क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान येऊ घातल्याने या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने खूपच असाध्य गोष्टी साध्य झाले आहेत आणि अशा प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांसाठी एक भक्कम आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत देखील निर्माण होण्यास मदत झाली आहे.
यामध्ये शेती क्षेत्र देखील मागे नाही.शेतीमध्ये देखील दररोज विविध प्रकारचे तंत्रज्ञानयेत असून या तंत्रज्ञानाचा अवलंब करीत शेतकरी त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
आता आपल्याला माहित आहेच की भारतामध्ये सध्या फुलांची लागवड फार मोठ्या प्रमाणात वाढली असून अगदी झपाट्याने हा व्यवसाय वाढत आहे.
बरेच शेतकरीफुल शेती करीत असून अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंददायी आणि उत्पन्न वाढेल असे तंत्रज्ञान विकसीत करण्यात भारत सरकारच्या नॅशनल बोटॅनिकलरिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये एक संशोधन करण्यात आले. त्याबद्दल या लेखांमध्ये माहिती घेऊ.
नक्की वाचा:भारतीय गोवऱ्या पोहोचल्या जर्मनीत, लाखोंमध्ये मिळतेय ऑर्डर, एका गोवरीची किंमत तब्बल...
वाळलेली फुले आणि पाने वाढवतील शेतकऱ्यांचे उत्पन्न
वाळलेली पाने आणि फुले यावर सरकारच्या नॅशनल बोटॅनिकल मध्ये एक संशोधन करण्यात आले असून यामध्ये काही फुले, पाने आणि बिया यांच्या वापरासाठी नवीन पद्धती विकसित केले गेले आहेत.
साधारणपणे आपल्याला माहित आहे कि वाळलेली फुले असो की पाणी शेतकरी बहुतांशी फेकून देतात.परंतु आता हेच फुला आणि पानांचा वापर करून शेतकरी त्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढवू शकता.
या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अनेक सुंदर डिझाईन,सुंदर वॉल आर्ट आणि सजावट करण्यासाठी च्या वस्तू बनवण्याची एक आधुनिक पद्धत या संस्थेने विकसित केली आहे. या तंत्रज्ञानामध्ये विशेष त्या झाडांचे जे काही भाग आपण
वाया गेले म्हणून नष्ट करतो किंवा आता काही उपयोगाचे नाहीत, असे म्हणून फेकून देतो. टाकाऊ फुलांच्या अवशेषांचे या नवीन तंत्रज्ञानाने वाळलेल्या पानांपासून वेगवेगळे आकार तयार केले जात आहेत. बदक आणि अनेक प्रकारची फुले जंगली बदाम पासून वाळवून त्यामध्ये पक्षांच्या सुंदर आकृत्या बनवल्या जातात.
त्याचबरोबर मोराची पिसे आणि विशिष्ट प्रकारचे पाणी सुखवून शुभेच्छा पत्रे देखील तयार केले जातात त्याचप्रमाणे यामध्ये रामदाना, मोहरी आणि खसखस वापरून आकार तयार केला जातो. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अशी फुले आणि पाने यांचा वापर करण्या अगोदर ते एका खास पद्धतीने वाळवली जातात.
या विशेष पद्धतीमध्ये त्यांचे नैसर्गिक स्वरूपात अबाधित रहावे हे लक्षात घेऊन ही पद्धत वापरली जाते. वाळलेल्या फुलांचे जतन करण्यासाठी ही संस्था सातत्याने कार्यरत असून साधारण तीन ते चार दिवसातही सुकलेली फुले व पाने अनेक दिवस सुंदर व सुरक्षित राहतात.
यासाठी संबंधित संस्था शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी वेळोवेळी काही कार्यक्रम आयोजित करते.कारण शेतकऱ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन शेतकऱ्यांना स्वावलंबी व्हावे आणि आपली कमाई वाढ व्हावी हा यामागचा संस्थेचा उद्देश आहे.
यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरूनअनेक सुंदर कलाकृती घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी वापरल्या जातात.शेतकऱ्यांना कमीत कमी भांडवलात कमी करण्यासाठी हे तंत्रज्ञान खूपच उत्तम माध्यम ठरू शकते.या सुकलेल्या पाने आणि फुलान पासुन बनवलेले कलाकृतींना विदेशात देखील खूप मोठी मागणी आहे.जर तुम्हाला या बाबतीत आदींची माहिती मिळवायची असेल तर तुम्ही विविध माध्यमातून या संस्थेशी संपर्क साधू शकतात.
Published on: 11 June 2022, 08:58 IST