अनेकजण बऱ्याच प्रकारचे निरनिराळे व्यवसाय करतात. परंतु व्यवसाय करीत असताना त्याच परंपरागत स्वरूपात व्यवसाय केला तर पैसा तर मिळतोच परंतु हव्या त्या प्रमाणात मिळत नाही. परंतु त्याच व्यवसायांमध्ये थोडीशी स्टाईल म्हणजेच वेगळेपण आणले तर नक्कीच ग्राहक वाढून पर्यायाने विक्री वाढते व चांगला नफा देखील मिळतो.
या लेखामध्ये आपण अशाच एका व्यवसायाबद्दल पाहणार आहोत, ज्याचा व्यवसाय म्हणून विचार केला तर हव्या त्या प्रमाणात प्रसिद्धी नाही. परंतु थोडीशी स्टाईल आणि वेगळेपण जर त्याच्यात आणले, तर नक्कीच दैनंदिन तुम्हाला चांगली कमाई देणारा व्यवसाय ठरू शकतो.
हटके स्टाइलने करा हा व्यवसाय
आता आपल्याला नारळ पाणी सगळ्यांना माहिती आहे. जास्त करून आपण रुग्णालयात एखाद्या पेशंटला पाहण्यासाठी जातो त्यावेळेस नारळ पाणी अर्थात नारळ नेतो.
परंतु याच नारळ पाणी ला जर व्यवसायाचे स्वरूप दिले तर एका छोट्याशा दुकानात खूप चांगली कमाई देणारा हा व्यवसाय ठरू शकतो. यासाठी तुम्हाला एक छोटेसे दुकान लागेल. नारळ पाणी आपल्या शरीरासाठी देखील खूप फायद्याचे आहे.
त्याच्यामध्ये जीवनसत्व बी,जस्त, सेलेनियम व आयोडीन तसेच सल्फर खूप जास्त प्रमाणात असते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला देखील आजारपणात नारळ पाणी पिण्याचा असतो. हे नारळातील पाणी काढून तुम्ही पेपर कप मध्ये पॅक करू शकता. तसेच छान डिझाईन केलेल्या ग्लासमध्ये देखील ठेवू शकता.
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो लखपती बनायचंय ना! तर बाजारात प्रचंड मागणी असणारा हा शेतीव्यवसाय कराच...
या व्यवसायासाठी येणारा खर्च
जर आपण या व्यवसायासाठी लागणाऱ्या खर्चाचा विचार केला तर नारळ खरेदीसाठी तुम्हाला पैसा लागेल. त्यासाठी लागणारे दुकान तुम्ही भाड्याने देऊ शकतात. जर आपण अंदाजे रकमेचा विचार केला तर पंधरा हजार रुपयात नारळ पाण्याचा व्यवसाय सुरू करता येणे शक्य आहे.
नारळ पाणी हे शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करते. इतकेच नाही तर शरीरातील पाण्याचे प्रमाण देखील पूर्ण करते. त्यामुळे प्रवास करणारे लोक किंवा कोणत्याही आजाराने ग्रस्त असणारे लोक नारळ पाण्याचा अधिकाधिक वापर करतात.
नक्की वाचा:ऑइल मिल व्यवसाय: अशाप्रकारे तेल व्यवसाय सुरु करा आणि कमवा बक्कळ नफा
दुकानांमध्ये असावे थोडेसे वेगळेपण
दुकानांमध्ये जर तुम्हाला शक्य झाले तर लोकांना बसण्यासाठी थोडीशी जागा केली तर खूप उत्तम व त्यासाठी काही खुर्च्या घ्याव्यात. त्यातल्या त्यात पंखा किंवा कुलर ची व्यवस्था करता आली तर खूपच उत्तम होईल. त्यामुळे ग्राहक देखील येथील व जास्तीत जास्त लोक तुमच्या दुकानात थांबन्याला पसंती देतील.
कारण व्यवसायाचा एक नियम आहे तो म्हणजे गर्दी पाहिली तर धंदा येतो असा एक साधारण नियम आहे. त्यामुळे या गोष्टीचा फायदा तुम्हाला या व्यवसायात खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.
इतके होऊ शकते कमाई
रस्त्याच्या कडेला जर आपण नारळ पाणी घेतले तर साधारणतः 50 ते 60 रुपये मिळते. परंतु तुम्ही ते दुकान थाटून आणि वेगळेपण ठेवले तर तुमच्याकडून एकशे दहा रुपयांना लोक ते विकत घेतील.
चांगली सेवा दिली तर ग्राहक दोन पैसे द्यायला मागेपुढे पाहत नाही असा एक नियम आहे. त्यामुळे ग्राहक चांगल्या आणि व्यवसाय जर चांगला चालला तर महिन्याला चांगला नफा तुम्ही कमवू शकतात.
Published on: 24 July 2022, 08:40 IST