शेतीमध्ये बरेच युवक विविध प्रयोग करत आहेत. म्हणजे एकंदरीत शेती क्षेत्राशी संबंधित असलेले हे उद्योग आहेत. पोल्ट्री, ससे पालन, मत्स्यव्यवसाय, विविध सेंद्रिय खतांची निर्मिती इत्यादी. हे जे सगळे व्यवसाय आहेत हे शेती करताना तुम्ही अगदी सहजपणे करू शकतात.
परंतु यासाठी तुम्हाला काही व्यवसायांना त्या क्षेत्रातले थोडेसे प्रशिक्षण आणि नियोजन गरजेचे असते. खरे पाहायला गेले तर एकदा कमीत कमी भांडवलात देखील असे व्यवसाय सुरू करता येतात.
आज आपण या लेखात देखील असाच शेतीचे संबंधित व्यवसायाची माहिती घेणार आहोत. या व्यवसायाच्या माध्यमातून अगदी 25 ते 30 हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून चांगला जम बसला तर महिन्याला लाखात कमावण्याची चांगली संधी आहे.
पर्ल फार्मिंग( मोत्याची शेती) एक चांगला व्यवसाय
जर आजच्या काळाचा विचार केला तर मोत्यांच्या लागवडीकडे लोकांचा कल झपाट्याने वाढत असून या मोत्यांची शेती अर्थात पर्ल फार्मिंग च्या माध्यमातून अनेक लोक खूप पैसा कमवत आहेत. असे म्हणतात की गुंतवणुकीच्या तुलनेत यामध्ये दहापट अधिक नफा मिळवता येणे शक्य आहे.
अशा पद्धतीने सुरू करावी पर्ल फार्मिंग अर्थात मोत्यांची शेती
यासाठी तुम्हाला एका तलावाची गरज आहे.ज्या ठिकाणी मोती तयार करता येतो. त्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंगची गरज असून प्रामुख्याने तीन गोष्टींवर यामध्ये लक्ष केंद्रित करायला लागते. तुम्ही यासाठी स्वखर्चाने तलाव खोदू शकता किंवा सरकार 50 टक्के अनुदान देते त्याचा देखील लाभ घेऊ शकता.
ऑईस्टर अनेक राज्यांमध्ये आढळतात. परंतु दर्जाच्या बाबतीत विचार केला तर दक्षिण भारत आणि बिहारच्या दरभंगा मध्ये ऑयस्टर चांगला मिळतो.
त्यासाठी तुम्हाला थोडा ट्रेनिंग घ्यावे लागेल, तुम्हाला मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात घेता येऊ शकते. जर मध्य प्रदेश राज्याचा विचार केला तर होशंगाबाद आणि महाराष्ट्रात मुंबई येथे मोत्यांच्या शेतीचे प्रशिक्षण दिले जाते.
नक्की वाचा:आईस क्यूब व्यवसाय: उन्हाळ्यात बंपर कमाई देईल हा व्यवसाय, धाडस करुन करा सुरु
अशा पद्धतीने करावी पर्ल ( मोती) फार्मिंग
यासाठी अगोदर ऑयस्टरला जाळ्यात बांधून दहा ते पंधरा दिवस तलावांमध्ये ठेवले जाते, जेणेकरून ते त्यांच्यानुसार त्यांचे वातावरण तयार करू शकतील.
त्यानंतर त्यांना बाहेर काढले जाते आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाते.शस्त्रक्रिया म्हणजे ऑईस्टर च्या आत एक कण किंवा साचा घातला जातो. या साच्यावर कोटिंग केल्यावर ऑयस्टरचा थर तयार होतो. ज्याचे कालांतराने मोत्यात रूपांतर होते.
लागणारी गुंतवणूक
एक ऑयस्टर तयार करण्यासाठी 25 ते 35 हजार रुपये खर्च येतो. तयार झाल्यावर एका शिंपल्यातून दोन मोती निघतात.
एक मोती किमान 120 रुपयांनाविकला जातो, मोत्याचा दर्जा चांगला असेल तर दोनशे रुपयांपेक्षा जास्त दराने देखील विकला जातो.
जर तुम्ही एक हजार ओयस्टर टाकले तर तुम्हाला दोन हजार मोती मिळतील. जरी यामध्ये सर्व शिंपले जगले नाहीत तर कमीत कमी 600 ते 700 ऑईस्टर जगतील.
जर तुम्हाला बाराशे ते चौदाशे मोती मिळतील. हे मोती दोन-तीन लाख रुपयांना विकले जातील. यामध्ये हजार मोत्यांसाठी तुमचा खर्च25 ते 35 हजार रुपये झाला आहे.
यामध्ये तलाव खोदण्याचा खर्चाचा समावेश केला नसून तो एकदाच होतो आणि त्यातही सरकारकडून 50 टक्के अनुदान दिले जाते.
Published on: 20 June 2022, 11:22 IST