कुठलाही व्यवसाय म्हटले म्हणजे सगळ्यात पहिले डोळ्यासमोर येते ते कोणता व्यवसाय करावा? जरी व्यवसाय करणे निश्चित झाले तरी लागणारे भांडवल किती लागेल? आणि ते आपल्याकडे उपलब्ध आहे का? आणि जर नसेल तर कुठून उपलब्ध करावे या समस्या मनात निर्माण होतात.
त्यामुळे व्यवसायाच्या शोधात असणारे व्यक्ती कायमच कमीत कमी गुंतवणुकीत चांगला नफा कसा मिळेल, अशा व्यवसायाच्या शोधात असतात.
आता बर्याच जणांना माहिती आहे की कुठलाही व्यवसाय उभारायचा असेल तर त्यासाठी शासनाकडून विविध प्रकारचे योजना देखील आहेत. फक्त गरज असते ती संपूर्ण माहिती असण्याची आणि व्यवसाय सुरू करण्याचे मनातले धाडस खूप महत्त्वाचे असते.
व्यवसाय छोटा असो की मोठा याला महत्त्व नसून त्या व्यवसायला बाजारपेठेत किती मागणी आहे? याच्यावर व्यवसायाचे यशस्विता अवलंबून असते. आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका व्यवसायाची माहिती घेणार आहोत जो बाजारपेठेत कायमच मागणी असणारा व्यवसाय आहे. या व्यवसायाविषयी आपण या लेखात माहिती घेऊ.
नक्की वाचा:बिझनेस आयडिया: लक्षाधीश होण्यासाठी करा 'हा' व्यवसाय सुरु, आयुष्यात दरवळेल सुगंध
मसाले बनवण्याचा व्यवसाय
आपल्याला माहित आहेच की, असे कुठलेही किचन नाही की ज्यामध्ये मसाल्यांना स्थान नाही. देशामध्ये लाखो टन विविध प्रकारच्या मसाल्यांची उत्पादन होते.
परंतु मसाले तयार करणे तर सोपे आहे परंतु त्याची चव उत्तम असणे खूप गरजेचे असते. तुम्ही तयार केलेल्या मसाल्याची चव चांगली असेल आणि तुम्हाला मसाल्याचे बाजारपेठेचे जास्त नाही परंतु आवश्यक ज्ञान असेल तर मसाला उद्योगांमध्ये तुम्ही तुमच्या स्थान निर्माण करू शकतात.
या उद्योगात लागणारी गुंतवणूक
मसाला उद्योगासाठी लागणाऱ्या गुंतवणुकीच्या बाबतीत खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या अहवालाचा विचार केला तर आयोगाकडून एक ब्लू प्रिंट तयार करण्यात आली असून यानुसार मसाला बनविण्याचा युनिट काढण्यासाठी साडेतीन लाख रुपये खर्च येतो.
या साडेतीन लाख रुपयांमध्ये तुम्हाला युनिट उभारण्यासाठी तीनशे चौरस फूट जागेसाठी साठ हजार रुपये आणि लागणारी यंत्रसामुग्री यासाठी 40 हजार रुपये खर्च येतो. त्यानंतर अनेक छोटे-मोठे गोष्टी करायला लागतात त्यासाठीचा खर्च आणि उत्पादन सुरू होईपर्यंतचा 2 लाख 50 हजार रुपये लागतात.
भांडवल कुठून उभे करायचे?
जर तुमच्याकडे पूर्ण रक्कम नसेल तर तुम्ही हा व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून बँकेकडे कर्जासाठी अर्ज करू शकतात.
या व्यवसायासाठी पंतप्रधान रोजगार योजनेच्या माध्यमातून कर्ज मिळू शकते. तसेच पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना देखील मदतीला धावून येऊ शकते.
होणारी कमाई
जर आपण खादी आणि ग्रामोद्योग महामंडळाच्या अहवालाचा विचार केला तर वर्षाला तुम्ही 193 क्विंटल मसाल्यांचे उत्पादन घेऊ शकतात.
आता प्रति क्विंटल मसाल्याचा दराचा विचार केला तर तो पाच हजार चारशे रुपये याप्रमाणे तुम्ही एका वर्षात दहा लाख 42 हजार रुपयांची विक्री करू शकतात.
या एका वर्षातला खर्च वजा केल्यावर तुम्ही वर्षाला दोन लाख 56 हजार रुपयांचा नफा मिळवू शकतात. प्रतिमहिना या कमाईचा विचार केला तर तो अंदाजे वीस ते एकवीस हजार रुपये इतका होईल.
छोट्या गोष्टी केल्याने नफा वाढू शकतो
या अहवालानुसार विचार केला तर, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही एखादी भाड्याची जागा घेण्याऐवजी तुमच्या घरात हा व्यवसाय सुरू केला तर तुमच्या नफ्यात नक्कीच वाढ होईल.
घरात हा उद्योग सुरू केल्याने याला एक गृहउद्योगाचे स्वरूप आल्याने एकूण प्रकल्प खर्च कमी होईल आणि नफा वाढेल.
नक्की वाचा:शेतीपूरक व्यवसायातून कमवा लाखो रुपये, जाणून घ्या नेमकं करायचं तरी काय..
पॅकिंग महत्वाची
तुम्ही तुमचे मसाल्याचे उत्पादन कशा रीतीने पॅकिंग करतात यावर त्याची विक्री अवलंबून असते. त्यामुळे उत्पादन पॅकिंग करण्यासाठी तुम्ही पॅकेजिंग तज्ञाचा सल्ला घेणे गरजेचे असते.
तुमच्या आजूबाजूच्या कुटुंब आणि परिसरातील दुकाने यांच्याशी संपर्क करून तुमचे उत्पादन किती आणि कसे चांगले आहे हे पटवून देणे खूप गरजेचे आहे. हे अगदी सुरुवातीला करणे गरजेचे असून एकदा मार्केटमध्ये जम बसल्यानंतर तुम्हाला काही करण्याची गरज नाही.
त्यानंतर तुम्ही स्वतःचे एक संकेतस्थळ अर्थात वेबसाईट तयार करून यावर तुमच्या उत्पादनांची संपूर्ण माहिती देऊ शकतात किंवा एखाद्या सोशल मीडिया पेज देखील तयार करून यावर तुमच्या उत्पादनाची माहिती लोकांपर्यंत पोहोचू शकतात.
Published on: 09 July 2022, 12:15 IST