बरेच जण व्यवसाय उभा करण्यासाठी धडपडत असतात. आता विविध प्रकारचे व्यवसाय यांचा विचार केला तर काही व्यवसायांमध्ये अगदी काटेकोरपणे आणि बाजारपेठेचे सतत निरीक्षण करून व्यवसायात बदल करावे लागतात.
तर काही व्यवसाय हे अगदी तुम्ही घरी बसून सुद्धा करू शकतात. म्हणजे काय की, काही व्यवसायांना मागणी खूप प्रचंड प्रमाणात असते.
म्हणून तुम्ही अगदी सहजतेने बाजारपेठेमध्ये तुमचे तयार उत्पादन सहजरीत्या विकू शकतात. आता जर आपण भारताचा विचार केला तर एकंदरीतरित्या भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे शेतीला खतांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात असते.
त्यातल्या त्यात आता सेंद्रिय शेतीकडे बरेच जण वळत असल्यामुळे तसेच सेंद्रिय शेती ला केंद्र सरकारकडून देखील प्रोत्साहन असल्यामुळे गांडूळ खत निर्मिती व्यवसाय खूप चांगला नफा आणि उत्पन्न देऊ शकतो. या लेखात आपण याविषयी माहिती घेऊ.
नक्की वाचा:माफक गुंतवणुकीतून सुरू करता येणारा व्यवसाय! थोडी गुंतवणूक,जास्त नफा आणि सदैव मागणी
वर्मी कंपोस्ट अर्थात गांडूळ खत म्हणजे काय?
गांडूळांना शेणाच्या स्वरूपात अन्न दिल्यास ते खाल्ल्यानंतर कुजून तयार होणाऱ्या नवीन उत्पादनाला गांडूळ खत असे म्हणतात.
शेनाचे वर्मी कंपोस्ट मध्ये रूपांतर केल्यानंतर त्याचा वास येत नाही. तसेच माशा आणि डासांची पैदास होत नाही. एकंदरीत वातावरण स्वच्छ राहते.
गांडूळ खतामध्ये दोन ते तीन टक्के नायट्रोजन, दीड ते दोन टक्के सल्फर आणि दीड ते दोन टक्के पालाश असते. म्हणूनच गांडूळाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते.
कसा सुरू करावा हा व्यवसाय?
गांडूळ खताचा व्यवसाय तुमच्या घरातील, शेतातील मोकळ्या जागेवर सहज सुरू करू शकता. तसेच कोणत्याही प्रकारचे शेड बांधण्याची गरज नाही.
शेताच्या भोवती जाळीचे वर्तुळे करून जनावरांपासून संरक्षण करू शकता यासाठी विशेष संरक्षणाची गरज नाही. बाजारातून लांब आणि टिकाऊ पॉलिथिन ट्रापोलीन विकत घ्या आणि नंतर ते तुमच्या स्थानानुसार दीड ते दोन मीटर रुंदी आणि लांबी मध्ये कापून टाका.
आपली जमीन सपाट केल्यानंतर त्यावर ट्रीपोलीन टाकून शेन पसरावा. शेणखताची उंची एक ते दीड फूट ठेवावे. आता त्या शेणाच्या आत गांडूळे टाका.
20 बेड साठी सुमारे शंभर किलो गांडूळ लागतील. सगळ्या प्रक्रियेत एक महिन्यात कंपोस्ट तयार होईल.
खत कसे विकायचे?
तुम्ही तयार केलेले गांडूळ खत विक्रीसाठी तुम्ही ऑनलाईनपद्धतीचा अवलंब करू शकतात.यामध्ये तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या ई कॉमर्स साइट द्वारे तुम्ही तुमची विक्री वाढवू शकता.
शेतकर्यांशी संपर्क साधून तुम्ही तुमची विक्री वाढवू शकता. जर तुम्ही तुमचा गांडूळखताचा व्यवसाय वीस बेडसह सुरू केला तर दोन वर्षात तुमचा आठ लाख ते दहा लाख उलाढाल असलेल्या व्यवसाय सुरू होईल.
Published on: 22 June 2022, 06:00 IST