Agriculture Processing

ऊस पिकासाठी खूप मोठी गुंतवणूक आणि कष्ट लागतात. परंतु असे असताना देखील शेतकऱ्यांना पुरेसे उत्पन्न मिळत नाही. या पार्श्वभूमीवर सेंद्रिय गूळ निर्मिती या शेतकऱ्यांसाठी खूप चांगला पर्याय ठरू शकतो.

Updated on 27 June, 2022 10:03 PM IST

 ऊस पिकासाठी खूप मोठी गुंतवणूक आणि कष्ट लागतात. परंतु असे असताना देखील शेतकऱ्यांना पुरेसे उत्पन्न मिळत नाही. या पार्श्‍वभूमीवर सेंद्रिय गूळ निर्मिती या शेतकऱ्यांसाठी खूप चांगला पर्याय ठरू शकतो.

 बरेच शेतकरी आता शेती पद्धतीत बदल करत आहेत. पारंपारिक शेती पद्धती सोडून नवनवीन संशोधन यांच्या आधारित शेती करीत आहे.

त्याचाच एक भाग म्हणून बरेच शेतकरी दर्जेदार गुळच बनवत नाहीत तर चांगल्या दरात विकून नफा देखील मिळवत आहेत. या लेखात आपण सेंद्रिय गुळ निर्मिती व त्यासंबंधीचा व्यवसाय त्याबद्दल माहिती घेऊ.

 सेंद्रिय गुळ निर्मिती

1- कमी खर्च आणि जास्त नफा-कमी खर्चात जास्त नफा मिळत असल्याने सेंद्रिय गूळ हा शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. एक क्विंटल उसापासून 13 किलो सेंद्रिय गूळ तयार होतो.

काही शेतकरी या गुळामध्ये गुजबेरी, मर्टल, पुदिना, आले, सुंठ अशा अनेक गोष्टी टाकतात त्यामुळे त्याचा दर्जा आणखी सुधारतो.

नक्की वाचा:Organic Jaggery: सेंद्रिय गुळ आहे आरोग्यासाठी उत्कृष्ट, सेंद्रिय गूळ निर्मितीतून कमवाल चांगला नफा

2- रोजगार निर्मितीच्या संधी- सेंद्रिय गूळ यामुळे स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांसाठी रोजगाराच्या संधी देखील वाढल्या आहेत.

जर तुम्ही ते मोठ्या प्रमाणावर बनवायला सुरूवात केली तर तुम्ही तुमच्या गावातील अनेक लोकांना रोजगार देऊ शकता. गावातील लोकांना रोजगारासाठी भटकावे लागणार नाही.

यासाठी लागणाऱ्या क्रशिंग मशीन बसवण्यासाठी दहा लाख रुपये खर्च येतो. हे शेतकरी मिळून करू शकतात किंवा कर्ज घेऊन देखील हे मशीन इंस्टॉल करू शकतात.

परंतु ही एक वेळ केलेली गुंतवणूक भविष्यातील तुम्हाला चांगला आर्थिक परतावा सुनिश्चित करू शकते. साखर कारखान्यांना ऊस विकण्याऐवजी बरेच शेतकरी सेंद्रिय गूळ तयार करून त्याचा देशभरात पुरवठा करून चांगला नफा कमवत आहेत.

 सेंद्रिय गुळाचे महत्व

 हा सेंद्रिय गूळ हानीकारक आणि विषारी रसायन पासून मुक्त असून त्यामुळे शरीर मजबूत होते.

नक्की वाचा:टरबूज शेती: टरबूज लागवड करतात तर त्यावर प्रक्रिया करून 'हे'पदार्थ बनवले आणि विकले तर मिळवाल बंपर नफा

 सेंद्रिय गुळ निर्मितीची प्रक्रिया

 उसाचा रस एका मोठ्या पातेल्यात टाकला जातो ज्यामध्ये सुमारे 400 ते 500 लिटर उसाचा रस ढवळून शिजवला जातो.

उसाचा रस उकळताना त्यात अगदी कमी प्रमाणात बेकिंग सोडा टाकून साफ केला जातो. जेणेकरून उसाच्या रसातील सगळ्या अशुद्धी बाहेर पडतील.

 त्यानंतर ते फिल्टर केले जाते आणि उर्वरित अशुद्धता खत म्हणून वापरले जाते. ते पॅनमध्ये पटकन ढवळणे आवश्यक आहे. दोन तास ढवळल्यानंतर उरलेली अशुद्धता देखील काढून टाकली जाते आणि नंतर घनरूप रस कोरड्या पॅनमध्ये ओतला जातो.

नंतर ते पूर्णपणे घट्ट होईपर्यंत आचेवर वेगाने हलवले जाते. शेवटी त्यात थोडासा नैसर्गिक चुना किंवा सेंद्रिय खोबरेल तेल मिसळले जाते. या प्रक्रियेत पुरुष कुशलतेने आणि तालबद्धपणे हे द्रव्य ढवळतात. त्याचे ढेकूळ किंवा त्याला जळु देत नाहीत.

सुमारे दोन तास सतत ढवळत राहिल्यानंतर घनरूप रस जो आता अशुद्ध ते पासून मुक्त आहे, त्याला जमिनीवर बसवलेल्या दुसऱ्या कोरड्या पॅनमध्ये ओतला जातो.

दोन माणसे ज्या कौशल्याने गरम तवा आणि त्यातील सामग्रीचा एक थेंबही न सांडू देता ही प्रक्रिया करतात हे एक अप्रतिम कौशल्य आहे. ही प्रक्रिया जाड द्रव्य पावडरच्या सुसंगते पर्यंत चालू राहते.

नक्की वाचा:Top 5 Agri Bussiness Idea:हे 5 शेतीशी निगडित व्यवसाय शेती सोबत देतील शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा मार्ग

यामध्ये योग्य सुसंगतता मिळवण्यासाठी त्या मध्ये थोडेसे नैसर्गिक चुना आणि थोडेसे सेंद्रिय खोबरेल तेल घालतात. या सगळ्या प्रक्रियेद्वारे निरोगी सेंद्रिय गूळ तयार केला जातो.

यामध्ये कुठल्याही प्रकारचे हानीकारक रसायने नसतात आणि ते सर्व गुणधर्म असतात जे  परिष्करणप्रक्रिया अनेकदा नष्ट होतात.या सगळ्यामुळे आजकाल सेंद्रिय गुळाची मागणी देश आणि विदेशात वाढत असून शेतकरी त्यातून भरपूर नफा कमवत आहेत..

English Summary: making organic jaggery is so profitable business and give financial stability
Published on: 27 June 2022, 10:03 IST