Agriculture Processing

जर आपण विविध तीर्थक्षेत्रांच्या विचार केला तर देशभरातील नद्यामध्ये दररोज सुमारे एक हजार टन फुले वाहून जातात. त्यामुळे नद्यांचे पाणी प्रदूषित तर होतेच.

Updated on 11 July, 2022 3:00 PM IST

 जर आपण विविध तीर्थक्षेत्रांच्या विचार केला तर देशभरातील नद्यामध्ये दररोज सुमारे एक हजार टन फुले वाहून जातात. त्यामुळे नद्यांचे पाणी प्रदूषित तर होतेच.

परंतु दररोज कितीतरी फुले कचरा म्हणून देखील टाकले जातात त्यामुळे कचरा वाढत जातो. परंतु आपल्या देशातील काही तरुणांनी  पाश्चिमात्य देशातून सर्वोत्तम काहीतरी फुलांपासून बनवण्याची कल्पना मांडली आहे. आपण जे मंदिरात फुले आपण करतो.

ते त्यानंतर वाया जातात. परंतु नवीन इनोव्हेशन च्या माध्यमातून टाकाऊ  फुलांचा वापर करून अगरबत्तीचा व्यवसाय देखील सुरू करता येणे शक्य आहे. या लेखामध्ये आपण टाकाऊ फुलांपासून अगरबत्ती कशी बनवता येते ते पाहू.

 टाकाऊ फुलांपासून अगरबत्ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य

 टाकाऊ फुलांपासून अगरबत्ती बनवण्यासाठी तुम्हाला ताजी किंवा कचरा म्हणून फेकलेली फुले, लाकडी काड्या आणि पावडर बनवण्याची मशीन आवश्यक आहे.

नक्की वाचा:समृद्धीकडे नेणारा व्यवसाय: योग्य नियोजन आणि मार्केटिंग राहिली तर हा व्यवसाय देईल आर्थिक स्थिरता

 टाकाऊ फुलांपासून धुप कसा बनवायचा?

 सर्वप्रथम आता वापरात नसलेली फुले गोळा करणे त्यासाठी आवश्यक असून आपण मंदिरात अर्पण केलेली फुले यासाठी वापरू शकतात. यासाठी….

1- फुलांमध्ये सेंद्रिय द्रावणाची फवारणी करा, त्यामुळे फुलांमधील हानीकारक किटाणू काढून टाकण्यास मदत होते.

2- त्यानंतर गोळा केलेल्या फुलांची क्रमवारी लावणे गरजेचे असून त्यातून खराब फुले आणि धागे काढून टाका.

3- आता वेगळे काढलेले फुलांची पाने काढून उन्हात वाळवा.

नक्की वाचा:Profitable Bussiness!कमी जागेत,कमी गुंतवणुकीत मिळवा जास्त नफा, सुरु करा हा व्यवसाय अन मिळवा चांगला नफा

4- त्यानंतर वाळवलेल्या फुलांच्या कळ्या मशीन मध्ये ठेवाव्यात. त्यानंतर त्या पिसल्या जाऊन पावडर मध्ये त्यांचे रूपांतर होईल.

5- त्यानंतर या बनलेल्या पावडर मध्ये लाकडी काठी  लाटून तिला अगरबत्तीचा आकार द्या. त्यानंतर तुमच्या अगरबत्ती तयार होते.

 यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही बनवलेला अगरबत्तीच्या विक्रीसाठी या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे पॅकेजिंग हे होय.

ज्याच्या आधारावर तुमच्या उत्पादनाची विक्री अवलंबून असते. तुम्ही आकर्षक आणि डिझाइन केलेले पॅकेट बनवू शकता. त्यानंतर तुम्ही त्या पॅकेजिंगसाठी 10-10 अगरबत्ती चे बंडल बनवा व त्यानंतर ते बाजारात विकले जाऊ शकते.

नक्की वाचा:शेतकऱ्यांनो काळजी घ्या, आता बनावट कीटकनाशके बाजारात, अशी करा खात्री...

English Summary: making insence stick from waste flower is so profitable business
Published on: 11 July 2022, 03:00 IST