नोकरी आणि व्यवसाय यामध्ये बरेच जण नोकरि ची निवड करतात. कारण प्रत्येकाचे मानसिक स्थिती असते कीएकदम आरामात टाइमिंग काम करून एका निश्चित वेळी हातात पैसा येणेकुठल्याही प्रकारची रिस्क नसने या गोष्टींना सगळेजण महत्त्व देत असल्याने साहजिकच व्यवसायाकडे कल असणाऱ्यांची संख्या कमी आहे.
परंतु असेअनेक तरुण सध्या तयार होत आहेत की ज्यांना नोकरीपेक्षा व्यवसायामध्ये खूप आवड आहे.असे तरुण कायम कमीत कमी गुंतवणुकीतून करता येण्यासारखा व्यवसायाच्या शोधात असतात.तर आज आपण या लेखामध्ये अशा व्यवसायाच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी एक चांगली व्यवसायिक कल्पना घेऊन आलोआहोत. त्याबद्दल या लेखामध्ये माहिती घेऊ.
महत्वाची व्यवसायिक कल्पना
आपल्याला माहित आहेच कि हिरवा वाटाणा फक्त हिवाळ्यामध्ये मिळतो. लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांमध्ये यांची मागणी खूप असते. नेमकेच लग्न समारंभ हे उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात असतात. तसेच अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये गोठवलेल्या म्हणजेच फ्रोजन वाटण्यापासून अनेक प्रकारच्या भाज्या व इतर गोष्टी बनवल्या जातात.
तर हीच गोष्ट लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या घरातील एका छोट्याशा रूम मधूनफ्रोजन वाटाणेचा व्यवसाय सुरू करू शकता. परंतु जर तुम्हाला हा व्यवसाय मोठ्यापातळीवर सुरू करायचा असेल तर त्यासाठी चार हजार ते पाच हजार चौरस फूट जागा असणे आवश्यक असते.
जर तुम्हाला लहान पातळीवर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला वाटाण्याच्या शेंगा सोलण्यासाठी काही मजुरांची आवश्यकता असेल. परंतु जर मोठ्या प्रमाणावर सुरुवात करायची असेल तरवाटाणे सोलण्याची मशीन तुम्हाला लागेल व त्यासोबत काही परमिशन देखील आवश्यक असतात.
या व्यवसायाची सुरुवात कशी करावी?
फ्रोझन वाटाणे अथवा मटार चा व्यवसाय सुरू करायचा असेल तर हिवाळ्यामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांकडून हिरवे वाटाणे खरेदी करून ठेवावे लागतात. साधारण प्रमाणात फेब्रुवारी महिन्यापर्यंत ताजे हिरवे वाटाणे सहज उपलब्ध होतात. तुम्ही तुमच्या घरातील एका छोट्या रूम मधूनया फ्रोजन म्हणजेच गोठवलेल्या वाटाणेचा व्यवसाय सुरू करू शकता.शेतकऱ्यांकडून वाटाणे खरेदी केल्यानंतर तुम्हाला ते सोलणे,स्वच्छ धुणे,उकळणे आणि पॅकिंग इत्यादी साठी मजुरांची आवश्यकता असते.सर्व प्रकारचे वाटाणे एकाच वेळीविकत घ्यावे लागतील असे काही नाही आपण दररोजवाटाणे खरेदी करून त्यावरप्रक्रिया करू शकता.
फ्रोजन वाटाणे कसे बनवायचे?
फ्रोजन वाटाण्या अथवा मटार बनवण्यासाठीवाटाणे प्रथम सोलले जातात.यानंतर वाटाणे 90 अंश सेंटिग्रेड तापमानात उकळले जातात. नंतर वाटाणा चे दाणे तीन ते पाच अंश सेंटिग्रेड तापमानापर्यंत थंड पाण्यात टाकले जाते. त्यामुळे त्या मध्ये आढळणारे बॅक्टेरिया नष्ट होतात. त्यानंतर वाटाणे 40 अंश सेंटिग्रेड तापमानात ठेवावे लागतात. जेणेकरून वाटण्या मध्ये बर्फ गोठतो. नंतर वेगवेगळ्या वजनाच्या पॅकेटमध्ये पॅक करून बाजारात पोहोचवल्या जातात.
फ्रोजन वाटाण्याचा व्यवसाय सुरू करून किमान50 ते 80 टक्के नफा मिळू शकतो.हिरवा वाटाणा शेतकऱ्यांकडून दहा रुपये किलो दराने खरेदी करता येतो. यामध्ये दोन किलो वाटाण्याच्या शेंगा पासून एक किलो वाटाणे बाहेरयेतात.जर तुम्हाला वाटाण्याची किंमत बाजारात20 रुपये किलो मिळत असेल तर तुम्ही यावाटाण्यावर प्रक्रिया करून 120 रुपये किलो दराने विक्री करू शकतात.
तसेच फ्रोजन वटाण्याची पाकिटे किरकोळ दुकानदारांना विकून तुम्हाला जास्त फायदा होईल.
महत्वाच्या बातम्या
Published on: 26 May 2022, 04:00 IST