Agriculture Processing

गोड ज्वारी पिकाचे लागवड केली तर जनावरांसाठी चारा उपलब्ध होतो. परंतु गोड ज्वारीच्या माध्यमातून इथेनॉल बनवण्याचा विचार जर भविष्यात केला तर इंधनाची निर्मिती तर होईलच त्यासोबतच चारा टंचाईचा प्रश्न व अन्नसुरक्षा इत्यादी प्रश्न सुटण्यास मदत होईल. इंधनाच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असल्यामुळे जैव इंधनाचा पर्याय शोधण्याची गरज आहे.

Updated on 30 July, 2022 2:00 PM IST

 गोड ज्वारी पिकाचे लागवड केली तर जनावरांसाठी चारा उपलब्ध होतो. परंतु गोड ज्वारीच्या माध्यमातून इथेनॉल बनवण्याचा विचार जर भविष्यात केला तर इंधनाची निर्मिती तर होईलच त्यासोबतच चारा टंचाईचा प्रश्न व अन्नसुरक्षा इत्यादी प्रश्न सुटण्यास मदत होईल. इंधनाच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असल्यामुळे जैव इंधनाचा पर्याय शोधण्याची गरज आहे.

तयार होणारे इंधन स्वस्तात मिळेल व पेट्रोलमध्ये मिसळून इंधन दरवाढ नियंत्रणात आणता येईल. यासोबतच खनिज तेल आयातीसाठी चे परकीय चलन खर्च होते त्यामध्ये बचत होईल.

खासकरून शेतकऱ्यांसाठी एक चांगला उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होऊन समाजातील जवळपास सर्वच घटकांसाठी फायदेशीर ठरणारे गोड ज्वारीपासून इथेनॉल निर्मिती फायदेशीर ठरेल.

नक्की वाचा:Crop Planning: विविध पिके त्यामधील आंतरपिके देतील शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी,नक्की वाचा माहिती

गोड ज्वारीचे महत्व

 राज्यातील हवामान तसेच उपलब्ध जमीन व आपल्याकडे पडणारा पाऊस या सगळ्या घटकांचा विचार केला तर गोड ज्वारी हे पीक पावसाचा ताण सहन करू शकणारे त्यामुळे अगदी कमी पावसात देखील घेता येते.

सततच्या वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे जागतिक स्तरावरील इंधन समस्या मुळे जी काही प्रदूषणाचे समस्या निर्माण होते तसेच तेल साठ्यांवर विपरीत परिणाम होतो, ते लक्षात घेता उसाबरोबर इतर पिकांपासून तसेच गोड ज्वारीपासून इंधन मिळणे जरुरीचे आहे.

जर आपण गोड ज्वारी चा विचार केला तर तिची बायोमास उत्पादन क्षमता उसापेक्षा अधिक आहे. केंद्र सरकारच्या नवीन धोरणाप्रमाणे पेट्रोलमध्ये पाच ते दहा टक्के इथेनॉलचा वापर करणे शक्य आहे त्यामुळे गोड ज्वारी सारखे पिक शाश्वत इंधनांच्या निर्मितीसाठी वापरण्यास आपल्याला संधी आहे.

नक्की वाचा:Bussiness Idea:हटके स्टाइलने करा 'हा' व्यवसाय, दैनंदिन होईल चांगली कमाई आणि मिळेल नफा

गोड ज्वारीचे उत्पादन आणि इथेनॉल

 उन्हाळी हंगामामध्ये जर आपण गोड ज्वारीची लागवड केली तर ताटांचे उत्पादन हेक्‍टरी 40 ते 45 टन एवढे मिळते.  यात ताटा पासून चरक्याने रस काढला असता 12 ते 15 हजार लिटर रस प्रति हेक्‍टर मिळू शकतो. हा रस आंबवण्याची प्रक्रिया करून आपण इथेनॉल तयार करू शकतो.

या रसामध्ये 10 ते 12 टक्के साखर असल्यामुळे ती आंबवण्याची प्रक्रियेस योग्य असते. त्यामुळे त्यापासून सहा ते सात टक्के इथेनॉलची रेकवरी मिळते. म्हणजे आपणाला 1000 ते 1200 लिटर इथेनॉल उत्पादन प्रतिहेक्टरी मिळू शकते.

सरकारी किमतीनुसार गोड ज्वारीपासून चार महिन्यात 36000 44 हजार रुपये प्रति हेक्‍टरी उत्पादन मिळू शकते.

त्यासोबतच गोड ज्वारीच्या ताटातील रस काढून जो काही चोथा उरतो तो जनावरांसाठी दर्जेदार खाद्य म्हणून वापरता येतो. त्यामुळे काही अंशी का असेना चाऱ्याची टंचाई ची समस्या आहे ती कमी होण्यास मदत होईल.

तसेच गोड ज्वारीचे दांडे साफ करण्याचे काम हे श्रमाचे असल्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात उत्पादक रोजगार निर्मिती देखील होण्यास मदत होईल.

जर आपण साखर कारखान्याचा विचार केला तर वर्षातील जास्तीत जास्त सहा महिने चालतात परंतु गोड ज्वारीपासून इथेनॉल बनवण्याची फॅक्टरी वर्षातील किमान दोनशे सत्तर दिवस सुरू होऊ शकते.

नक्की वाचा:शेतीही करा,उद्योजकही व्हा! करा गुंतवणूक दोन लाख रुपयांची अन सुरु करा 'टोमॅटो सॉस'युनिट, वाचा माहिती

English Summary: making ethanol from sweet jowar crop business is more profitable
Published on: 30 July 2022, 02:00 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)