Agriculture Processing

आजकाल बरेच लोक नोकरीच्या धकाधकीच्या जीवनाला कंटाळले आहेत. अशा परिस्थितीत आज काल अनेक तरुण व्यवसायाकडे अधिक वळत आहेत. अशीच एक बिझनेस आयडिया आम्ही तुम्हाला देत आहोत.

Updated on 08 July, 2022 3:53 PM IST

आजकाल बरेच लोक नोकरीच्या धकाधकीच्या जीवनाला कंटाळले आहेत. अशा परिस्थितीत आज काल अनेक तरुण व्यवसायाकडे अधिक वळत आहेत. अशीच एक बिझनेस आयडिया आम्ही तुम्हाला देत आहोत.

ज्यामध्ये माफक गुंतवणूक करून बंपर कमाई करता येते. आपण फुलांच्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत. हे असे उत्पादन आहे ज्याला गावापासून शहरापर्यंत प्रचंड मागणी आहे. एखादा कार्यक्रम घ्यायचा असेल तर त्याची मागणी आणखी वाढते.

 फुलांचा व्यवसाय जितका मोठा तितका त्यात नफा जास्त. हा व्यवसाय कोणीही करू शकतो.अगदी कमी गुंतवणुकीत तुम्ही याची सुरुवात करू शकता. जसजसे उत्पन्न वाढेल तसतसे तुम्ही ते मोठे करू शकता.

नक्की वाचा:Agri Bussiness Idea: सेंद्रिय खत विक्रीचा व्यवसाय देईल आर्थिक समृद्धी, उत्तम नियोजन चांगला नफा

कसा सुरु करावा हा व्यवसाय?

 फुलांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 1000 ते 1500 चौरस फूट जागा लागेल. यानंतर फुले कायम ताजी ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटरची देखील आवश्यकता असेल. फुलांचे पॅकिंग, डिलिव्हरी यासाठी लोकांची गरज भासू शकते.

यामध्ये शेतकऱ्यांकडून फुले खरेदी करण्यासाठी एका व्यक्तीचीही गरज भासू शकते. वेगवेगळ्या प्रसंगी विविध प्रकारच्या फुलांना मागणी असते.

अशा परिस्थितीत तुम्हाला अनेक प्रकारची फुले ठेवावी लागतील. फुले तोडणे, बांधणे आणि पुष्पगुच्छ बनवणे इत्यादीसाठी अनेक साधने देखील आवश्यक असतील.

 विक्रीसाठी धोरण

आपल्या देशात साधारणपणे प्रत्येक घरात सकाळची पूजा केली जाते. प्रत्येकाला फुलांची गरज असते. अशा परिस्थितीत तुम्ही काही घरांशी संपर्क साधा आणि त्यांना सांगा की तुम्हाला ताजी फुले मिळतील.

ताजी फुले मिळाल्यावर क्वचितच कोणीही ते नाकारू शकेल. येथूनच तुम्ही तुमचे ग्राहक तयार करण्यास सुरुवात कराल त्यांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईनचाही आधार घेऊ शकता.

तुम्ही सोशल मीडियावर प्रचार करून ऑर्डर मिळवू शकता. तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुकचीही मदत घेऊ शकता.

नक्की वाचा:Kvp Scheme: पोस्टाच्या 'या'योजनेत करा गुंतवणूक आणि करा पैसे दुप्पट,वाचा या योजनेविषयी सविस्तर माहिती

इतकी होऊ शकते कमाई

फुलांच्या किमती बदलतात. गुलाब आणि झेंडूच्या फुलांच्या किमती प्रमाणेच वेगळी जर 50 हजार रुपयांची गुंतवणूक केले असेल तर तुम्हाला त्यात चांगला परतावा मिळू शकतो. शेतकऱ्यांकडून ज्या किमतीत फुले खरेदी केली जातात.

ते बाजारात दुप्पट किमतीत विकले जातात.एखादे फुल 3 रुपयांना विकत घेतले असेल तर ते बाजारात 7-8 रुपयांना सहज विकले जाईल. त्याच वेळी विशेष प्रसंगी हे फूल 10 रुपयांपेक्षा जास्त विकले जाईल. अशा परिस्थितीत किती पैसे कमवता येतील याचा अंदाज बांधता येतो.

नक्की वाचा:'या' योजनेच्या साथीने शेळीपालन व्यवसाय घेईल उंच उंच भरारी, या योजनेचा घ्या लाभ, फुलवा शेळीपालन व्यवसाय

English Summary: flower business is so profitable and give more financial income
Published on: 08 July 2022, 03:53 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)