शेतकरी जेव्हा शेतीमध्ये विविध पिकांची लागवड करतात तेव्हा पिकानुरूप व्यवस्थापन पद्धती देखील वेगवेगळ्या असतात. तसे पाहायला गेले तर आता शेती करण्याच्या पद्धतीत झपाट्याने बदल होत असून खूप वेगवेगळ्या पद्धती शेती क्षेत्रात येऊ घातले आहेत. आता जर आपण भातशेतीचा विचार केला तर पाण्यात केली जाणारी शेती असे जरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
हीच गोष्ट हेरून भात शेतीत मत्स्यपालन म्हणजे आपण 'फिश नाईस फार्मिंग' केली तर नक्कीच भाताचे उत्पादन तर मिळतेच परंतु त्या माध्यमातून मत्स्यउत्पादनातून आर्थिक नफा मिळवता येतो. या लेखात आपण भातशेतीत मत्स्यपालन नेमके कसे करतात? याबद्दल जाणून घेऊ.
फिश राईस फार्मिंग
आपल्याला माहिती आहे की भात या पिकाला सिंचन किंवा पावसामुळे साचलेल्या पाण्याची आवश्यकता असते. बऱ्याचदा शेतात साचलेले पाणी असते हे काही वेळा आपल्याला शेतातून बाहेर काढून टाकावे लागते.
परंतु अलीकडच्या काळामध्ये फिश राईस फार्मिंग चे तंत्रज्ञान पुढे येत असून या तंत्रज्ञानाच्या मदतीने भातशेतीत असलेले हे जास्तीचे पाणी बाहेर न काढता त्या पाण्यातच मत्स्य पालन करून जास्तीचा नफा मिळवता येऊ शकतो.
या तंत्रामध्ये भातशेतीत पाणी भरून या पाण्यात मत्स्य पालन केले जाते. सहाजिकच आहे या तंत्राची थोडीफार माहिती आणि प्रशिक्षण असणे देखील तेवढेच गरजेचे आहे.
नक्की वाचा:Prawn Fish Farming व्यवसायातून मिळेल लाखोंची कमाई, अशा पद्धतीने सुरू करा हा व्यवसाय
आपण भात पिकाची लागवड करतो त्यानंतर मत्स्यपालन किंवा मासे त्या पाण्यात किंवा शेतात टाकले जातात. त्यानंतर भातपिकाचे देखील व्यवस्थापन आणि मत्स्यपालनाचे व्यवस्थापन यांचे एक संतुलन ठेवून त्या पद्धतीची कामे केली जातात.
व्यवस्थित पाणी व्यवस्थापन केले तर शेतकऱ्यांच्या हातात भाताचे उत्पादन मिळते व माशांचे देखील उत्पादन मिळते. दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या तंत्राने भात पिकावर जे काही किडींचा प्रादुर्भाव होतो तो संपतो.
जगातील या देशात केली जाते फिश राईस फार्मिंग
जर आपण जागतिक पातळीचा विचार केला तर चीन,फिलिपाईन्स, बांगलादेश, इंडोनेशिया तसेच मलेशिया इत्यादी देशांमध्ये या तंत्रज्ञाने शेती मोठ्या प्रमाणात केली जात असून भारतात देखील या तंत्राचा वापर शेतकऱ्यांनी करण्यासाठी उद्युक्त केले जात आहे.
नक्की वाचा:दुभत्या जनावरांचे दूध वाढवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय; कमी खर्चात होईल जास्त नफा
Published on: 23 August 2022, 03:59 IST