शेतकरी चांगले उत्पन्न काढण्यासाठी नवनवीन पिकांकडे लक्ष देत आहेत. सध्या आपण पाहिले तर मोती शेतीचे (Pearl farming) प्रमाण वाढत चालले आहे. बरेच शेतकरी मोती शेती करून चांगले उत्पन्न घेत आहेत.
मधमाशीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन प्रमाणेच मोती शेती देखील करता येते. यामधून अधिक नफा देखील मिळवता येतो. तर आज आपण मोती शेती बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
मोत्याची शेती हा मत्स्यपालनाचाच एक भाग आहे असे म्हणता येईल.मात्र या व्यवसायात ऑइस्टर चे पालन (Cultivation of oysters) करावे लागते. ज्यातून महागडे असे मोती मिळतात. एका दृष्टीकोनातून पहिले तर मोत्याची शेती करणे हे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरू शकते.
मोती शेतीमधील खर्च आणि उत्पन्न
तुम्ही जेव्हा मोत्याची शेती करण्यास सुरुवात करतात तेव्हा तुम्हाला तलाव, सर्जिकल हाऊस आदी साठी एक निश्चित खर्च लागत असून हा खर्च प्रत्येक वेळी येत नाही. एकवेळचीच गुंतवणूक करावी लागते. याशिवाय तलावात वेळोवेळी खत टाकून ठेवावे लागते. तलावातील मृत शिंपले वारंवार बाहेर पडत राहतात, ज्यासाठी थोडाफार खर्च करावा लागतो.
आनंदाची बातमी! 'या' योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 900 कोटींचा लाभ
मोती कसे तयार केले जातात ?
मोती ऑइस्टरमध्ये तयार होत असून हा एक नैसर्गिक रत्न आहे. ऑइस्टर (Oyster) म्हणजे काय तर गोगलगाईचे घर. गोगलगाई जेव्हा अन्न खाण्यासाठी बाहेर पडते तेव्हा नको असलेले म्हणजेच अनावश्यक परजीवी त्यांच्यासोबत चिटकून शिंपल्यात शिरतात आणि त्यापासून मुक्त होण्यासाठी गोगलगायी स्वतःवर संरक्षण कवच बनवते ते कवच नंतर मोत्याचे रूप धारण करते.
ही सर्व प्रक्रिया कृत्रिमरीत्या केली जाते तेव्हा यास मोती पालन असे म्हणतात. एका मोत्याची सरासरी किंमत ही २०० ते २००० पर्यंत असते कधी कधी मोती उच्च दर्जाचा असेल तर त्याची किंमत लाखों पर्यंत जाते.
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 हजार गुंतवून मिळवा 16 लाख रुपयांचा लाभ
अशी करा मोत्याची शेती
मोत्याची शेती करायची असेल तर २० x १० आकारमानाचा तलाव असणे आवश्यक आहे. ज्याची खोली ५ ते ६ फूट असली पाहिजे. जर तुमच्या कडे अशी सुविधा नसेल तर तुम्ही घरच्या घरी प्रगत तंत्रज्ञान वापरून टाकी बसवून मोत्याची शेती करू शकता.
मोत्यांची शेती कारण्यासाठी प्रौढ ऑइस्टरची (Mature oysters) आवश्यकता असते तर तुम्हाला हे नदी, तलाव, कालवे आदी ठिकाणांवरून गोळा करता येऊ शकते. तर तुम्ही यांची खरेदी देखील करू शकता. मात्र लक्षात ठेवा त्यांपैकी एकही ऑइस्टर मेलेला नसावा.
हव्या त्या मोत्याच्या आकारानुसार बी निवडावे लागते त्यानंतर बिया शस्त्रक्रियेने ऑयस्टरमध्ये घातल्या जातात आणि १० दिवस नायलॉन पिशवीत ठेवून त्यांची तपासणी केली जाते. या काळामध्ये ते नैसर्गिक खांद्यावर ठेवले जातात.
दरम्यान कोणतेही ऑइस्टर मरण पावल्यास त्यांना फेकून द्यावे लागते. शिंपल्यातील जीव स्वतःचे अन्न स्वतः बनवू शकत नाही त्यामुळे त्यांना बाहेरून शेणखत, केळीची साल आदी अन्न पुरवठा करावा लागतो.
महत्वाच्या बातम्या
फक्त एकदाच गुंतवणूक करा आणि मिळवा 15 हजार रुपयांपर्यंत महिना पेन्शन
सावधान! तुमचा होऊ शकतो आर्थिक तोटा, वेळीच घ्या दक्षता; वाचा आजचे राशीभविष्य
'या' शेतीची लागवड शेतकऱ्यांसाठी ठरतेय फायदेशीर; 25 लाखांपर्यंत होतोय नफा
Published on: 09 September 2022, 10:41 IST