Agriculture Processing

भारतीय शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये बरेच बदल केले आहेत. याठिकाणी शेतकरी पारंपारिक पिकांसोबत बागायती पिकांच्या लागवडीलाही मोठी चालना देत आहेत. बरेच शेतकरी त्यांच्या शेतात धान्य पिकांसह अनेक भाजीपाला पिकांची शेती करून चांगला नफा मिळवतात.

Updated on 16 September, 2022 3:32 PM IST

भारतीय शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये बरेच बदल केले आहेत. याठिकाणी शेतकरी पारंपारिक पिकांसोबत बागायती पिकांच्या लागवडीलाही (crop cultivation) मोठी चालना देत आहेत. बरेच शेतकरी त्यांच्या शेतात धान्य पिकांसह अनेक भाजीपाला पिकांची शेती करून चांगला नफा मिळवतात.

आज आपण मेथीच्या लागवडिविषयी (Cultivation of fenugreek seeds) माहिती जाणून घेणार आहोत. मेथी आरोग्यासाठी तर फायदेशीर ठरत आहेच, परंतु शेतकऱ्यांसाठीही चांगला नफा मिळवून देत आहे. उत्तम उत्पादन घेण्यासाठी त्याच्या सुधारित जातीच्या बियांची खात्री करणे गरजेचे असते. याविषयी आज आपण माहिती जाणून घेऊया.

शेवग्याला मिळतोय तब्बल 16 हजार रुपयांचा भाव; जाणून घ्या इतर पालेभाज्यांचे बाजारभाव

मेथीचे सुधारित वाण

पुसा कसुरी, RTM-305, राजेंद्र क्रांती AFG-2 आणि हिसार सोनाली हे भारतातील मेथीच्या शीर्ष वाणांपैकी एक आहेत. शेतकऱ्यांना हवे असल्यास, हिस्सार सुवर्णा, हिस्सार मढवी, हिस्सार मुक्ता, एएफसी-१, आरटीएम-१४३, पुसा अर्ली बंचिंग, लॅम सिलेक्शन इत्यादी वाणांसह शेतकरी लागवड करू शकतात.

महत्वाचे म्हणजे मेथी पिकामध्येही कीड व रोगांचा प्रादुर्भाव (Outbreak of diseases) कमी करण्यासाठी बियाण्यांवर प्रक्रिया करणे योग्य ठरते. यासाठी मेथी दाणे 8 ते 12 तास पाण्यात भिजवून ठेवा आणि 4 ग्रॅम थायरम, 50% कार्बेन्डाझिम (Carbendazim) किंवा गोमूत्र वापरून सेंद्रिय बीज प्रक्रिया करून रासायनिक प्रक्रिया करता येते. बीजप्रक्रिया केल्यानंतर 8 तासांनी मेथीचे दाणे शेतात लावा.

सावधान! 'या' कारणाने होऊ शकतो तुम्हाला डायबीटीस; अशी घ्या काळजी

मेथीचे उत्पादन

हिरव्या भाज्या किंवा पानांसाठी मेथी पेरल्यानंतर पीक 30 दिवसांत काढणीसाठी तयार होते. त्यानंतर दर 15 दिवसांनी हिरव्या भाज्यांचे दाट उत्पादन घेऊ शकते.

मेथीची सेंद्रिय शेती (Organic farming) करून तुम्ही प्रति हेक्टरी ७० ते ८० क्विंटल उत्पादन मिळवू शकता. मेथीची सुकी पानेही बाजारात १०० रुपये किलोने विकली जातात. त्याच वेळी, त्याच्या हिरव्या भाज्यांची किंमत देखील 50 ते 60 रुपये किलोपर्यंत आहे.

मेथी लागवडीसाठी योग्य पद्धतीचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांना प्रति हेक्‍टरी ५० हजार रुपये आणि मेथीचे सहपीक केल्यास कमी वेळेत व कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळू शकता.

महत्वाच्या बातम्या 
शेतकऱ्यांनो येत्या 10 दिवसात जनावरांचा तातडीने विमा उतरवावा; राजू शेट्टींची मागणी
'या' जिल्ह्यात हळद संशोधन केंद्र उभारले जाणार; सरकारकडून 100 कोटींचा निधी उपलब्धपितृ पक्षा दरम्यान कावळ्यांना अन्न का दिले जाते? जाणून घ्या त्याचे महत्त्व आणि कथा

English Summary: Farmers cultivate varieties fenugreek Earn 50 thousand rupees
Published on: 16 September 2022, 03:32 IST