सध्या शेतकरी पेरणी व लागवडीच्या तयारीत आहेत. रब्बी हंगामात बरेच शेतकरी (farmers) नवनवीन पिकांची पेरणी करण्यावर भर देतात. मात्र प्रामुख्याने कोणती पिके घेतली जातात? ज्या पिकांमधून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकते. त्या पिकांविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
रब्बी भुईमुगाची पेरणी सप्टेंबर (seotember) महिन्याच्या शेवटी केली तर शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरू शकते. 30 सप्टेंबरपासून पेरणी करावी अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिली आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 40 कोटींचा निधी मंजूर; येत्या 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार
भुईमूग लागवड
शेतकरी मित्रांनो भुईमूग (groundnut crops) पिकातून तुम्ही चांगले उत्पादन मिळवू शकता. यासाठी योग्य पेरणीची माहिती तुमच्यापर्यंत पोहचणे गरजेचे असते. भुईमूग लागवडीसाठी मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी, मऊ, भुसभुशीत, वाळूमिश्रित व सेंद्रिय कर्ब असलेली जमीन निवडा.
अशा जमिनीत भुईमुगाच्या आऱ्या सहज जाऊन शेंगा चांगल्या मोठ्या होतात. जमिनीमध्ये हवा खेळती राहून, मुळांना भरपूर हवा मिळते. मुळावरील नत्रांच्या गाठींची वाढ होते. मात्र भारी चिकण मातीच्या जमिनी ओलसरपणा कमी झाल्यावर कडक होतात. तसेच काढणीच्या वेळी शेंगा जमिनीत राहण्याची शक्यता कमी असते. यावेळी काळजी घ्या अशा जमिनीत लागवड करू नका.
रब्बी हंगामात भुईमुगाची पेरणी १५ डिसेम्बर च्या अगोदर करा. त्यानंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट येते. त्यामुळे पेरणी करण्यासाठी तुमच्याकडे आतापासून 2 महीने आहेत. वेळीच पेरणी चांगले उत्पादन घ्या.
नॅनो-फर्टिलायझर लिक्विड शेतकऱ्यांचे कष्ट आणि पैसा वाचवणार; जाणून घ्या वैशिष्ट्ये
या वाणाची करा लागवड
लागवडीसाठी एस.बी. - ११, टी.ए.जी. - २४, टी.जी. - २६ या जातींचे हेक्टरी १०० किलो बियांनाची गरज असेल. तर फुले प्रगती, फुले व्यास, फुले उनप, जे.एल. - ५०१, फुले भारती या जातींचे हेक्टरी १२० ते १२५ किलो बियाणे लागतात.
बिजप्रक्रिया अशाप्रकारे करा
पेरणीपुर्वी प्रति किलो बियाणास ३ ग्रॅम मॅन्कोझेब (Mancozeb) किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्माची प्रक्रिया करा. त्यानंतर २५ ग्रॅम रायझोबियम आणि २५ ग्रॅम स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करा. बीजप्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून त्वरित पेरा.
याठिकाणी मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ३० सेंमी व दोन रोपांतील अंतर १० सेंमी ठेवावे लागेल. जमीन ओलवून नंतर वापशावर पाभरीने अथवा टोकण पद्धतीने पेरणी करा. विशेष म्हणजे टोकण पद्धतीने पेरणी केल्यास उत्पादनात (production) वाढ होईल आणि कमी बियानांमद्धे लागवड होईल. टोकण पद्धतीचा आणखी एक फायदा म्हणजे जेवढे बियाणे लावेल त्याची उगवण होतेच. बियाणे वाया जात नाहीत.
महत्वाच्या बातम्या
Tur Market Price: 'या' बाजार समितीत तुरीला मिळतोय सर्वाधिक भाव; जाणून घ्या दर
मिथुन आणि तूळ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार आनंदाचा काळ; वाचा आजचे राशीभविष्य
सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत नवीन तीन नियम लागू; गुंतवणूक करण्याआधी वाचा संपूर्ण माहिती..
Published on: 28 September 2022, 10:44 IST