कलिंगड फळ खाण्याने किंवा ताजा रस पिल्याने आरोग्यासाठी फायदे होतात कलिंगडाच्या सेवनाने शरीराला शीतलता प्राप्त होते आणि अति घामामुळे निर्माण झालेला थकवा दूर होऊनउत्साह निर्माण होतो.
कलिंगडा पासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविता येतात. कलिंगडा पासून प्रक्रियायुक्त पदार्थ रस कलिंगडाचे तुकडे करून त्यापासून रस काढावा. कलिंगडाची हिरवी साल आणि आतील गराचे पातळ तुकडे ज्यूसर मध्ये घालून त्याचाही रस काढावा. यामुळे कलिंगड रसाची गोडी थोडीशी कमी होते, मात्र कलिंगडाच्या सालीमध्ये व पांढऱ्या गरामध्ये ही आरोग्यासाठी उपयुक्त घटक असतात. सिरप कलिंगडाचे बारीक तुकडे करून फुड प्रोसेस द्वारे रस काढावा हा रस मोठ्या व जाड तळ असलेल्या भांड्यामध्ये मध्यम आचेवर तापत ठेवावा. भांड्यातील रस ढवळत राहावे खालील बाजूस करपणार नाही याची काळजी घ्यावी. रस आवश्यकते इतका घट्ट झाल्यानंतर चाळणीतून गाळून घ्यावा.
यापासून मऊ लाल कलिंगड पाक आणि घट्ट कलिंगड गर अशी दोन उत्पादने तयार करता येतात. गट्टा कलिंगड गराला कलिंगड लोणी असेही म्हणतात.याचा वापर ब्रेडवर लावून खाण्यासाठी होतो. शीतपेय कलिंगडाच्या बारीक कापलेल्या फोडी, साखर, व्हॅनिला रस आणि मीठ फुड प्रोसेसर किंवा ब्लेंडर मधून बारीक करून घ्यावे. मिश्रण काहीवेळ ढवळल्यानंतर रेफ्रिजरेटर मध्ये थंड करावे.
वापरावेळी या रसामध्ये आवश्यक तितक्या तीव्रतेपर्यंत क्लब सोडा किंवा सेल्टझर मिसळावे. माउसी कलिंगडाच्या गराचे तुकडे फूड प्रोसेसर मध्ये टाकून प्युरी तयार करून घ्यावी. एका भांड्यामध्ये दोन कप प्युरी करून घ्यावी. पाव कप वेगळ्या भांड्यात ठेवावे भांड्यातील दोन कप प्युरीला मध्यम आचेवर उकळी द्यावी. दुसऱ्या भांड्यातील पाव कप प्युरी मध्ये जिलेटिन चांगले मिसळून घ्यावे. उकळी आलेल्या द्रावणामध्ये जिलेटिन मिसळलेली प्युरी चांगली मिसळून त्यातील जिलेटिन ला गाठी येणार नाहीत याची काळजी घ्यावी.त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस आणि अर्धा कप साखर मिसळावी. चांगले मिसळल्यानंतर मिश्रण थंड होऊ द्यावे. अंडा मिश्रणावर मलई पसरावी. तयार कलिंगड माउसीच्या छोट्या वाट्यांमध्ये लहान भाग करून फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवून द्यावे. यासाठी साधारणपणे दोन तास किंवा अधिक वेळ लागतो. कलिंगड सालींची भाजी कलिंगड सालीला काकडी प्रमाणे एक कुरकुरीतपणा असतो. उष्णता दिल्यानंतरही तो टिकून राहतो. त्यामुळे तो शिजल्यानंतरही उत्तम चव देतो.साली मध्ये विविध मसाले चांगल्या प्रकारे मुरतात. भाजी करण्यापूर्वी जाड हिरव्या साली काढून टाकाव्यात. आरोग्यासाठी फायदे.
1) कलिंगडातील लायकोपेन आरोग्यासाठी उपयुक्त असते. विशेषत: मुक्त कणांमुळे हृदयाला होणाऱ्या हानीपासून वाचवण्यासाठी मदत करते.लायकोपेन यूक्त आहारामुळे अतिनील किरणांपासून त्वचेला इजा पोहोचत नाही. सूर्यप्रकाशामध्ये सातत्याने काम केल्यामुळे येऊ शकणाऱ्या सुरकुत्या आणि त्वचेच्या कर्करोगालाही ते दूर ठेवते.
2) कलिंगडामध्ये सेंट्रलीन हे अमिनो आम्लं मुबलक प्रमाणात असते. सेंट्रलीन रक्तवाहिन्यांवरील आणि अति कष्टामुळे स्नायू मध्ये आलेला ताण कमी करते. तसेच हृदय विकार दूर ठेवण्यास मदत करते.
3) व्यायामापूर्वीकलिंगडाच्या रसाचे सेवन केल्यास दाह कमी करते. त्यातील फ्लॅव्हेनॉईड, कॅरोटीनॉईड, यासारखे घटक दाह निर्माण करणाऱ्या ट्रीटेरपेनॉइड घटकांशी लढतात.
4) कलिंगडामध्ये अधिक प्रमाणात क जीवनसत्त्वआणि अल्प प्रमाणात ब जीवनसत्व असते. यामध्ये असलेल्या बिटा कॅरो टीनचे शरीरामध्ये अ जीवनसत्व रूपांतर केले जाते. यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम ही खनिजे असतात.
कलिंगडाच्या बियामध्ये लोह आणि जस्ताची पातळी अधिक असते.
नक्की वाचा:मागेल त्याला शेततळे योजनेबाबत मोठा निर्णय, शेतकऱ्यांना मोठा धक्का
5) कलिंगड रस मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतो.त्याच्या बियाही मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेसाठी उपयुक्त असतात.
6) कलिंगडाची साल चेहऱ्यावर चोळल्याने चेहऱ्यावरील तजेलपणा वाढण्यास मदत होते.उष्णतेमुळे डोळ्यांची, तळपायांची आग होत असल्यास कापलेल्या टरबुजाची साल त्या भागावर ठेवावी. (स्रोत-अग्रोवन)
Published on: 09 April 2022, 11:46 IST