Agriculture Processing

धेनू टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीने शेतकरी व पशुपालकांच्या दुग्धव्यवसायातील गरजा लक्षात घेऊन दुग्धव्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान म्हणजेच धेनू ॲपची निर्मिती केली आहे. धेनू ॲप हे शेतकऱ्यांना वापरण्यास अगदी सोपे असून धेनू ॲपमध्ये मंच, प्रश्न उत्तरे, पशु ज्ञान, पशु बाजार, पशु व्यवस्थापन, दररोज पशु सल्ला,ताज्या घडामोडी व तज्ञांचे मार्गदर्शन यासारखे विविध फीचर्स हे शेतकरी व पशुपालक बांधवांना प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध करून दिले आहेत.

Updated on 16 March, 2023 11:42 AM IST

धेनू टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीने शेतकरी व पशुपालकांच्या दुग्धव्यवसायातील गरजा लक्षात घेऊन दुग्धव्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान म्हणजेच धेनू ॲपची निर्मिती केली आहे. धेनू ॲप हे शेतकऱ्यांना वापरण्यास अगदी सोपे असून धेनू ॲपमध्ये मंच, प्रश्न उत्तरे, पशु ज्ञान, पशु बाजार, पशु व्यवस्थापन, दररोज पशु सल्ला,ताज्या घडामोडी व तज्ञांचे मार्गदर्शन यासारखे विविध फीचर्स हे शेतकरी व पशुपालक बांधवांना प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध करून दिले आहेत.

ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी एक दोन का होईना पशुधन उपलब्ध असते. त्यापासून निघणाऱ्या शेणावरती काहीतरी प्रक्रिया करता यावी व तयार झालेल्या उत्पादनातून महिलांना चार पैसे मिळावेत या उद्देशाने धेनू कंपनीने शेणापासून पणती निर्मितीचे नाविन्यपूर्ण दिपकार मशीन तयार केले आहे. या मशीनद्वारे महिलांना दररोज पाचशे ते हजार रुपये कमावण्याची संधी प्राप्त झाली आहे.

“इकोदीप-एक ग्रामीण उत्पादन” हा प्रकल्प सध्या महाराष्ट्रभरातील काही जिल्ह्यांमध्ये यशस्वीरित्या सुरू आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून महिला बचत गट, महिला शेतकरी, व मजुरांच्या हाताला काम देखील मिळालेले आहे. या प्रकल्पासाठी महिलांना लागणारी मशिनरी, प्रशिक्षण, कच्चामाल, कंपनीच्या माध्यमातून पुरवण्यात येतो.

मोगऱ्याची शेती आहे खूपच फायदेशीर, शेतकऱ्यांना होतोय फायदा

SubTitle- ईकोदीप निर्मिती उद्योगासाठी डॉ. लक्ष्मण प्रजापत यांचा मदतीचा हात.

प्रत्येकाकडे काही नावीन्यपूर्ण कल्पना असतात परंतु त्या नावीन्यपूर्ण कल्पना पूर्ण करण्यासाठी कोणत्या ना कोणत्यातरी व्यक्तीचा आधार लागतो. कोणतीही संकल्पना अमलात आणायची म्हटलं की आर्थिक व सामाजिक बाबी लक्षात घेऊन ती संकल्पना राबवावी लागते. धेनू कंपनीचे डायरेक्टर डॉ. गणपत दहे यांनी ईकोदीप निर्मिती ही संकल्पना व्यवसायाने कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर असलेले व सध्या अमेरिकेत स्थायिक असलेले डॉ. लक्ष्मण प्रजापत यांच्यासमोर मांडली. यावर डॉक्टरांनी या संकल्पनेला अनुमोदन व प्रोत्साहन दिले.

केमिकलचा वाढता वापर लक्षात घेता, देशी गाईंपासून तयार होणाऱ्या उत्पादनांना खूप मागणी आहे. तसेच त्या उत्पादनांचे मानवी जीवनावरती कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत ही बाब उल्लेखनीय आहे. कत्तलखान्याकडे चाललेल्या गाईचा जीव या प्रकल्पामुळे निश्चितच वाचणार आहे हे अधोरेखित झाले.

ईकोदीप हा प्रकल्प शेवटच्या घटकाशी निगडित असल्यामुळे कित्येक गरीब कुटुंबांचे संसार देखील सुखी होण्यास मदत होणार असल्याची बाब लक्षात आल्यानंतर डॉ. लक्ष्मण प्रजापत यांनी धेनू कंपनीला इकोदीप निर्मिती उद्योग असा चिरंतन सुरू ठेवावा व जास्तीत जास्त कुटुंबांना यातून रोजगार प्राप्त व्हावा याकरिता धेनू कंपनीला पन्नास हजार रुपयाची मदत देऊ केली.त्यांच्या या मदतीमुळे कित्येक शेतकरी व महिलांच्या घरी रोजगाराचा प्रकाश निर्माण झाला.

तरुणीने अभ्यासासोबतच डुकर पालनातून कमवले लाखो रुपये

ईकोदीप निर्मिती उद्योगाबाबत अधिक माहितीसाठी संपर्क- 91302 33557

पशुपालन व दुग्धव्यवसाया संबंधित अधिक माहिती व तंत्रज्ञानासाठी आजच प्ले स्टोअर वरून धेनू ॲप डाऊनलोड करा.
लिंक- https://play.google.com/store/apps/details?id=com.dhenoo.tech&referrer=LLCRNX

लेखक
श्री.नितीन रा. पिसाळ
प्रकल्प समन्वयक धेनू टेक सोलुशन्स प्रायव्हेट लिमिटेड भोसरी, पुणे
मो.बा. 8007313597

पुसा कृषी प्रदर्शनात धेनू ॲपचे आधुनिक तंत्रज्ञान ठरले पशुपालकांचे प्रमुख आकर्षण…
पुणे बाजार समिती निवडणुकीचा बिगुल वाजला, मतदार यादी प्रसिद्ध, इच्छुकांची पळापळ
उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपिटीचा इशारा, शेतकऱ्यांनो काळजी घ्या

English Summary: Ekodeep production industry is the highway of women empowerment - Dr. Lakshman Prajapat
Published on: 16 March 2023, 11:42 IST