Agriculture Processing

Business Idea: जर तुम्ही सोडण्याचा विचार करत असाल आणि व्यवसाय सुरु करण्याच्या विचारत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण आज तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल सांगणार आहोत ज्याला वर्षभर सतत मागणी असते. या व्यवसायातून तुम्ही करोडोंचे मालक बनू शकता. आज तुम्हाला आले शेतीविषीयी सांगणार आहोत.

Updated on 03 August, 2022 11:37 AM IST

Business Idea: जर तुम्ही सोडण्याचा विचार करत असाल आणि व्यवसाय सुरु करण्याच्या विचारत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण आज तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल (Business) सांगणार आहोत ज्याला वर्षभर सतत मागणी असते. या व्यवसायातून तुम्ही करोडोंचे मालक बनू शकता. आज तुम्हाला आले शेतीविषीयी (Ginger farming) सांगणार आहोत.

ज्याचा वापर चहापासून भाज्या, लोणच्यापर्यंत केला जातो. वर्षभर मागणी चांगली ठेवण्याबरोबरच भावही चांगला मिळतो. हिवाळ्यात त्याला मोठी मागणी असते. त्यामुळे वर्षभर मागणी चांगली राहते. यामध्ये तुम्ही नोकरीपेक्षा जास्त नफा कमवू शकता. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे याच्या लागवडीसाठी केंद्र सरकारकडूनही मदत (Central Assistance for Ginger Cultivation) मिळणार आहे.

आल्याची लागवड कशी करावी?

आल्याची लागवड (Cultivation of ginger) पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. आल्याची लागवड पपई आणि इतर मोठ्या झाडांच्या पिकांसोबत करता येते. एक हेक्टरमध्ये पेरणीसाठी 2 ते 3 क्विंटल बियाणे आवश्यक आहे. आल्याची लागवड बेड तयार करून करावी. याशिवाय मधोमध नाले करूनही पाणी सहज वाहून जाईल याची सोय करावी.

आल्याची लागवड पाणी साचलेल्या शेतात करू नये. आले लागवडीसाठी 6-7 pH असलेली माती चांगली मानली जाते. आल्याच्या आधीच्या पिकाचे कंद वापरले जातात. एका तुकड्यात दोन ते तीन कोंब राहतील अशा प्रकारे मोठ्या आल्याचे तुकडे तोडून घ्या.

पावसाची बातमी! या राज्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस; IMD चा इशारा

आले कसे लावायचे

आले लावताना ओळीपासून ओळीतील अंतर 30-40 सेंमी आणि रोप ते रोप अंतर 25 ते 25 सें.मी. याशिवाय मधले कंद चार ते पाच सेंटीमीटर खोलीवर लावल्यानंतर त्यांना हलकी माती किंवा शेणखताने झाकून टाकावे.

सोने खरेदीदारांसाठी खुशखबर! 10 ग्रॅम सोने खरेदी करा फक्त 30156 रुपयांना; पहा नवे दर...

किती खर्च येईल

आले पीक तयार होण्यासाठी 8 ते 9 महिने लागू शकतात. एका हेक्टरमध्ये आल्याचे उत्पादन 150 ते 200 क्विंटलपर्यंत असते. एका हेक्टरमध्ये आले लागवडीसाठी सुमारे 7-8 लाख रुपये खर्च होऊ शकतात.

तुम्ही किती कमवाल

जर आपण आल्यापासून कमाईबद्दल बोललो, तर एका हेक्टरमध्ये आल्याचे उत्पादन 150-200 क्विंटल असू शकते. आले बाजारात 80 रुपये किलोने विकले जात आहे. ६० रुपये प्रति किलो असा विचार केला तर एक हेक्टरला २५ लाखांपर्यंत सहज उत्पन्न मिळेल. यातील सर्व खर्च उचलूनही 15 लाख रुपयांपर्यंत सहज नफा मिळेल.

महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांनो पावसाळ्यात करा या फळपिकाची लागवड आणि कमवा आयुष्यभर भरघोस नफा! जाणून घ्या...
पेट्रोल डिझेलच्या दरात दिलासा! जाणून घ्या तुमच्या शहरातले ताजे दर...

English Summary: Do this business and become an owner of crores
Published on: 03 August 2022, 11:36 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)