Agriculture Processing

Dairy Farming: देशातील शेतकरी आता आधुनिक बनत चालला आहे. शेतीला आधुनिक यंत्रांचे खूप मोठे योगदान मिळत आहे. शेतकरी शेतीबरोबरच अनेक जोडधंदे करत आहेत. देशात दुधाचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय केला जात आहे. शेतकऱ्यांनाही अनुदानावर डेअरी फार्म चालू करता येऊ शकते.

Updated on 09 September, 2022 2:04 PM IST

Dairy Farming: देशातील शेतकरी (Farmers) आता आधुनिक बनत चालला आहे. शेतीला (Farming) आधुनिक यंत्रांचे खूप मोठे योगदान मिळत आहे. शेतकरी शेतीबरोबरच अनेक जोडधंदे करत आहेत. देशात दुधाचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय केला जात आहे. शेतकऱ्यांनाही अनुदानावर डेअरी फार्म (Dairy farm on subsidy) चालू करता येऊ शकते.

सरकार दुग्धउद्योजकता विकास योजनेला चालना देत आहे

अलीकडच्या काही दिवसांत सरकारनेही दूध उत्पादकांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. दुग्धउद्योजकता विकास योजना (Dairy Entrepreneurship Development Scheme) हा देखील असाच एक उपक्रम आहे. या योजनेद्वारे सरकार दुग्धशाळेच्या स्थापनेला प्रोत्साहन देत आहे.

डेअरी फार्म उघडल्यावर एवढी सबसिडी मिळते

या योजनेंतर्गत, नाबार्ड (NABARD) दुग्धशाळा उघडण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांना २५ टक्के पर्यंत अनुदान देते. त्याच वेळी, समान कामासाठी ST/SC शेतकऱ्यांना 33.33 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते. नाबार्डच्या या योजनेसाठी शेतकरी, वैयक्तिक उद्योजक, स्वयंसेवी संस्था, कंपन्या अर्ज करू शकतात.

Weather Update: महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये धो धो पाऊस कोसळणार; हवामान खात्याचा अलर्ट जारी

कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकतात

शासनाच्या नियमानुसार एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मात्र, अट अशी आहे की ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पायाभूत सुविधांसह वेगवेगळी युनिट्स उभारतील. या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी, प्राणी मालक स्टार्टअप इंडिया आणि नाबार्डच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

कांद्याचा वांदा! बाजारात भाव मिळेना आणि निसर्गाला बघवेना, शेतकरी मेटाकुटीला...

दरमहा लाखोंचा नफा

जर तुमच्याकडे 20 गायी असतील. या गायींपासून तुम्हाला 200 लिटर दूध मिळत आहे. जर तुम्ही ते बाजारात 50 रुपये प्रति लिटरने विकले तर तुम्हाला दररोज 10 हजार रुपये मिळू शकतात. त्यानुसार एका महिन्यात तुम्हाला तीन लाख रुपये सहज मिळू शकतात. जनावरांच्या काळजीसाठी तुम्ही 1 लाख रुपयांपर्यंत खर्च केला तरीही तुम्हाला 2 लाख रुपयांचा फायदा होईल.

महत्वाच्या बातम्या:
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून मोठी भेट! DA सह पगारही वाढणार
Gold Price: सोने खरेदीसाठी करू नका उशीर! सोने 5300 रुपयांनी स्वस्त...

English Summary: Dairy Farming: Farmers to Earn Millions of Profits Every Month
Published on: 09 September 2022, 02:04 IST